धार्मिक-साहित्य

देह देवाचे मंदिर.

Submitted by Suyog Shilwant on 9 September, 2016 - 17:37

लहान असल्यापासुन ते म्हातारं होई पर्यंत आपल्या धर्मामधे इतक्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी लहान असताना माझ्या आईने एक श्लोक शिकवला होता. जेवायला बसलो कि म्हण असं ती म्हणायची तेव्हा मी कटकट करायचो. काय तो तोच तोच श्लोक म्हणायचा मला इथे भुक लागलेय समोर घोडा का शेरा दिसतोय पण आई आपली म्हणतेय अम्म्म्म पहिले म्हण आई हातावर फटका मारुन श्लोक म्हणवुन घ्यायची.

" वदनी कवलं घेता नाम घ्या श्री हरी चे,
सहज हवन होते नाम घेता फुका चे||
जिवन करी जिवित्वा अन्न हे पुर्ण ब्रह्म ,
उदर भरणं नोहे, जानियेजे यज्ञ कर्म || "

गणेश उत्सव आणि देखावे

Submitted by मध्यलोक on 6 September, 2016 - 06:38

गणेश उत्सव आणि देखावे ह्यांच्या संबंध ह्यावर्षी तब्बल १२५ वर्ष जूना होतोय. ह्या देखाव्यांनी काय नाही केले, समाज एकत्र आणला, इंग्रजाना पळवून लावले, मदत कार्य केले, मनोरंजन केले आणि अनेक विधायक कार्य केले त्यातीलच अजुन एक महत्वाचे कार्य म्हणजे समाज प्रबोधन.

झाडे वाचावा, पाणी वाचावा, पौराणिक ते वैज्ञाणीक, व्यक्ति विशेष, कधी शिक्षण तर कधी खेळ किती ही विविधता. यंदा ही असे अनेक विविधांगी देखावे आपल्याला बघायला मिळणार ह्याची खात्री आहे मला.

|| आरती श्रीहनीसिंगची ||

Submitted by A M I T on 10 August, 2016 - 04:29

|| आरती श्रीहनीसिंगची ||

जय देव जय देव जय हनीसिंग, हो यो यो हनीसिंग |
तुमच्या गाण्याची चढलीया झिंग, जय देव जय देव || धृ. ||

गळा दाव्याइतुकी जाड चेन |
मस्तकी टोपी शोभे इच्चीबेणं |
केसांची लावूनी वाट तू छान |
गल्लोगल्ली रूढ केली फॅशन || जय देव जय देव || १ ||

तुमचिया मुखे रॅप जन्मला |
बॉलीवुडी मोठा आनंद झाला |
वस्त्रे त्यागूनी थिरकती बाला |
तयांमध्ये शोभे हनी सावळा || जय देव जय देव || २ ||

ग्रॅमी आणण्याची भाषा तू केली |
मग कशी, कुठे माशी शिंकली ?
आम्हां पामरांची कर्णे निमाली |
ऐकूनी तुमचिया भजनांत गाली || जय देव जय देव || ३ ||

आज ब्लु है पानी पानी पानी पानी |

तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण....

Submitted by पुरंदरे शशांक on 19 July, 2016 - 00:06

तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण....

आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥अभंगगाथा ३०२||

अल्पावधीत साडी कशी फेडावी?

Submitted by केदार on 12 July, 2016 - 15:52

त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा कॉलेजग्रूप नाटक करणार आहे. महाभारतावर ! अन मी दु:शासन !

फुल्ल टू दंगा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी पुरूषोत्तमच्यावेळी आणि नुकतेच फिरोदिया मध्ये केले होते. यण्दा हा मान चक्क कान्सने पटकावला आहे. पण एक गोची आहे.

विनवणी

Submitted by पुरंदरे शशांक on 1 July, 2016 - 00:05

विनवणी

क्षणाक्षणाला पडतो खाली
उठुनी पुन्हा उचलतो पाऊली

नसे साथीला दिसे कुणीही
रणरण अवघी नसे सावली

बघुनी सारे राजमार्ग ते
वाटबिकटशी हीच निवडली

तुम्हासारखे दिग्गज कोणी
कधी चालले याच दिशेनी

केशर-बुक्का खुणा पाहुनी
दिशा हीच ती नाही चुकली

गाथेमधल्या शब्दांना मी
कधी मस्तकी उरी सांभाळी

त्या बोलाच्या साथीने तर
चालतोच ही वाट निराळी

आळी पुरवा एक एवढी
करी विनवणी माथा लवुनी

नसेल उत्कट भाव तरीही
घ्या ओढूनी घ्या हो जवळी
-------------------------------

अवघे सावळ

Submitted by पुरंदरे शशांक on 29 June, 2016 - 02:44

अवघे सावळ

उतरले पूर्ण | तुकोबा जीवन | यथार्थ दर्शन | गाथेमाजी ||

चिंतनी मननी | भक्तांसी तुकोबा | नवल विठोबा | करीतसे ||

अभंग तुक्याचे | निरखी विठ्ठल | मनी कुतुहल | फार दाटे ||

कैसी ही आगळी | भक्तिची माधुरी | शब्दी खरोखरी | सामावेना ||

मिटूनी नयन | बैसे स्वस्थचित्त | श्रीहरि एकांत | भोगतसे ||

तुकोबा तुकोबा | गजर अंतरी | आनंद सागरी | देव बुडे ||

विठ्ठल का तुका | तुका कि विठ्ठल | अवघे सावळ | एकरुप ||

मन । कुठे आणि काय ?

Submitted by महेश ... on 23 June, 2016 - 06:52

फारच गमतिशिर प्रश्न आहे. जे आपल्या शरीराला कायम ताब्यात ठेवत, ज्याला आपण कधीच कंट्रोल करू शकत नाही। आणि जे सतत आपल्याला वेगवेल्या भावनेत अडकवून ठेवत। तेच हे मन.

ज्याच्यावर आपली सगळी सुख दुख अवलंबून असतात किंवा जे ह्य सगळ्यांचा उगम स्थान आहे. ते मन.
ज्याचा आपण साधा विचारही करात नाही. (हे माझ्याचसाठी होतं) जिम , योग, डान्स इतर अनेक प्रकार केले पण मन साठी काय.

*********************
पण हे मन नक्की असता कुठं ? माझ्या शरीरात माझा मन नक्की कुठे आहे ?
***************************************************

उत्सव दोन वर्षांचा

Submitted by घायल on 3 June, 2016 - 11:18

एकदा आठवडी बाजारात एक मनुष्य घोडा विकत घ्या, घोडा असे ओरडत होता. त्याच्या समोर काही ग्राहकही दिसत होते आणि घासाघीस करत होते. लोक त्या दृश्याकडे पाहून हसत होते. काही तसेच पुढे जात तर काही तिथे रेंगाळत.यातल्या काहींना शांत बसून गंमत पहायची होती तर काही मात्र न राहवून विचारत होते कि

"अहो घोडा कुठेय इथे ? "
त्यावर त्या विक्रेत्याने अतिशय तुच्छ कटाक्ष टाकत सोबतच्या चतुष्पाद प्राण्याकडे अंगुलीनिर्देश केला. त्याबरोबर प्रश्नकर्ता खो खो हसू लागला. विक्रेत्याबरोबरच आधीपासून असलेले ग्राहक आणि इतर लोक चिडून त्याच्याकडे पाहू लागले .

शब्दखुणा: 

शनी, परंपरा आणि मी

Submitted by नानबा on 3 April, 2016 - 15:51

ह्या सगळ्या बातम्या ऐकून जरा नाराजच झाले मी.
म्हणाले त्यांना,
'देवा , न्यायप्रीय म्हणून तुमची ख्याती.
तुमच्यावर किती विश्वास आमचा!
आणि तुमच्या देवळातही , केवळ शारिरीक फरकावरून तुम्ही आम्हाला प्रवेश नाकारावा!'
त्यावर ते हसले, म्हणाले,
'बेटा, तुला खरच असं वाटतय का की प्रवेश नाकारणारा मीच आहे?
असं असतं तर पेटवल का असतं मी हे रान माझ्याच ठेकेदारांविरुद्ध?
मी न्यायाची खात्री देतो, पण संघर्षाशिवाय तो मिळावा/मिळेलच, असं कुठे आहे?
असं स्वत्वाकरता लढताना माणूस जसा झळाळून निघतो ना, तीच माझी खरी कृपा असते.
न्याय मग आपसूकच पदरात पडतो'.

परंपरेची फारशी काळजी मी आताशा करत नाही.

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य