तुष्टवावया इंद्रियांसी । तुवां जन्मावें म्लेंछवंशी ।

Submitted by moga on 24 December, 2015 - 06:51

१. माझ्या लग्नाला सुमारे आठ वर्षे होऊन गेली. मी मुंबईत नव्यानेच आलो होतो. नोकरी होती. बायकोही गावाकडचीच . सुमारे महिनाचभर सुखाचे दिवस पाहिले. तदनंतर तिला नोकरी लागली आणि सगळा बट्ट्याबोळ झाला. तिच्या बापाला असलेल्या अनेक मुलींपैकी एक रिकामट्व्कडी तिची बहीण व तिचा रिकामटेकडा नवरा याना सगळा पगार देणार , त्याग करणार या हट्टाने घरात भांडणे सुरु झाली... माहेरी पगार द्यायला माझा विरोध नव्हता. पण भविष्यात होणार्‍या आपल्या मुलाला चार पैसे तरी ठेवावेत हीच माझी इच्छा होती. उरलेली रक्कम सुमारे ७० % तिने रिकामटेकड्याना द्यावेत ही माझी अपेक्षा होती.

पण व्हायचं तेच झाले. रिकामट्व्कड्याना संपुर्ण पगाराचा सुटलेला मोह आणि त्यांच्यासाठी सर्व सुखाचा त्याग करणे हे कर्तव्य आहे या बायकोच्या आंधळ्या भीष्मभक्तीत माझा सगळा संसार नासून गेला.

पगाराला वारस नको म्हणुन त्यानी एक अ‍ॅबोरशनही केले. मी काहीही करु शकलो नाही.. दिवसा आठ ते रात्री आठ नोकरी करुन रिकामटेकड्यांचे पोट भरु शकत असताना रात्री आठनंतर माझी बायको , मुलाची आई , नराची मादी या भुमिका पार पडायला तिला कोणता भीष्म आणि कोणती मीराबाई अडवत होती हे ती आणि तिचा त्यागवादी हिंदू धर्मच जाणे !

त्यानंतर काही काळाने ती पुन्हा परतली . अशा बायका धड रहातही नाहीत आणि जातही नाहीत , हे मला ठाउक होते.

पुन्हा प्रेग्नन्सी , यावेळी मात्र श्रीकृष्णाची पुजा सुरु केली ! मुलगाच हवा !!!!!!!! आणि मग एक दिवशी ते भयाण विचार मी ऐकले ! ... मुलगा हवा ... कृष्णासारखा ! जन्माला माझ्या घरात येऊन नंतर तिच्या बापाकडे जायला हवा ! मुलगा मुलगा करत मुली काढत सासर्‍याचे स्पर्म संपले ! आता माझे स्पर्म ! वा रे धर्म !

मी तेंव्हा खुप चिडायचो. कुढायचो. रडायचो. आणि एक दिवस तो दिव्य प्रकाश माझ्या आयुष्यात आला. Proud माझ्या एका मित्राने मला दुसर्‍या एका कामासाठी भेटायला बोलावले. पत्ता होता. माउंटमेरी स्टेप. बांद्रा. मी चुकुन रिक्षावाल्याला माउंटमेरी इतकेच बोललो. त्याने डायरेक्ट चर्चजवळ नेले. सकाळी सकाळी घरी मुलगाच हवा यावरून भांडण झाले होते. मीही चर्चसमोर बोललो ... मला मुलगी हवी.. तीहीएकुलती एक ... !

पुढे डिलिवरीला आमचे पूज्य सासरेबुवा तिला घेऊन गेले ... त्यानंतर माझे फोन टाळणं , मला भेटू न देणं , हे सगळे प्रकार सुरु झाले. अर्थ अगदी उघड होता. बायकोला संसारातून उठवून तिला बाकींच्याचा भीष्माचार्य करणे आणि त्यानंतर पुढच्या पिढीत त्या पुढच्या मुलाला भीष्माचार्य करणे.

हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण झाला तो त्याचमुळे ! सासर्‍याचा बाप वीस एकर शेताचा मालक होता . त्याने ढीगभर मुले काढून पुढची पिढी चार एकरवर आणली. सासर्‍यानेही तोच कित्ता गिरवून चार मुलीना एक एकरवर आणून बसवलं ! आणि यातून सुटकेचा मार्ग काय ? तर माझा आणि माझ्या संततीला भीष्माचार्याच्या गुवात ढकलून देणे !

पण ! मुलगी झाली हो ! Proud

माउंटमेरी पावली . मी तिला किमान बघायला तरी जाणारच होतो . आणि चारच दिवसात हिंदू कर्मविपाकाचे मांजर नशीबाच्या आडवे गेले. मला अपघात झाला. डाव्या पायाची तीन हाडे मोडली.

त्यानंतर बायको व माहेरच्याना नवीनच पंख फुटले ... आता बायको नोकरी करेल. मी जन्मभर लंगडा होऊन माझ्याच घरात बसेन. आणि माझी मुलगीही त्यांच्याकडेच.

पण नाही ! Proud जगात अजुन एक धर्म आणि देव बाकी होता .

दशरथापासून ते पेशव्यापर्यंत हिंदूंचे संसार ही फाटक्या संसाराची व गृहकलहाची कथा आहे.

अपत्यशोकातला दशरथ.
संसारसुख सोडलेला राम
बायको नसलेला लक्ष्मण.
पोरं नदीत फेकुन नवराही सोडून गेलेली नदीमैय्या
राधा व मीरा असल्या वार्‍यावर उधळलेल्या बायकांचे नवरे.
मग्रुरपणे पुरुरव्याला सोडलेली उर्वशी
ऋषीबरोबर अर्धवट संसार करुन मुलीसह पळ काढलेली ती कुणी अप्सरा.
पैसा वारस यातून साक्षात नवर्‍याला विष घातलेली ती कुणी बाई
बायकोच्या माहेरच्यांच्या कारस्थानाला बळी पडलेला तो कुणी धर्मवीर.
धृवबाळ व त्याचा बाप.
सुखाची वाटणी न देता नुसत्या युद्धात मरायला ठेवलेला भीष्म , घटोत्कच आणि तो मस्तानीपुत्र

..

संसार म्हणजे हिंदू कहाण्यांचा उकिरडा होऊन गेला होता.

...

ही संधी साधुन समस्त हिंदु धार्मिक साहित्य माझ्यासमोर येऊन पडले होते. पण माझ्यावर उपचार करायला त कुचकामी होते. कधीतरी कुणी तरी बोलले म्हणून गुरुचरित्र १४ वा अध्याय वाचायचो. पण त्यातही तीच रडकथा .... मुसलमान सुलतान व दरिद्री ब्राह्मण कथा.

पावणे दोन वर्षे झाली . पायात फारशी प्रगती नव्हती. काठी , वॉकर , भिंत धरुन चालणे. एकदा मुलीला अट्टाहासाने भेटुन आलो. पण तेही वारंवार जमणार नव्हतं.

१४ वा अध्याय सुरुच होता.

आणि एक दिवस गुरुचरित्र ९ व्या अध्यायात गेलो. अगदी सहज , नकळत...................

२. नववा अध्याय आहे एका धोब्याचा. गंगा नदीच्या काठी धुणी धुणारा धोबी एक दिवस नदीत नावेत बसून मजा करत असलेल्या एका राजाला पहातो आणि त्याला प्रश्न पडतो...

धन्य राजयाचे जिणें । ऐसे सौख्य भोगणे ।
स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे । कैसा हा भक्त ईश्र्वराचा ॥ २१ ॥
कैसें याचे आर्जव-फळ । कवण देव आराधिला ।
कैसा गुरु असें भेटला । मग पावला हें पद ॥ २२ ॥ 

याने कोणता देव पूजला अन हा राजा झाला ?

तिथे दत्तगुरु येउन उत्तर देतात ...

तुष्टवावया इंद्रियासी / तुवा जन्मावे म्लेंछवंशी //

तो राजा मुसलमान आहे. तूही मुसलमान हो व ते सुख मिळव !

मला उत्तर मिळाले. Proud

घर में जिहाद का ऐलान किया ! मैं मुसलमान ! मेरा अल्ला मेहेरबान !

३. त्यानंतर माझा पाय एक महिन्यात बरा झाला. परत मुंबई गाठली. एक नोकरी मिळाली. संसार नव्हताच म्हणून दुसरे हस्पिटल सहज चौकशी करायला गेलो तर तिथेही नाइट जॉब मिळाला.

मला दोन नोकर्‍या. रोज हट्टाने मुलीसाठी सासुरवाडीला फोन करायचो. अखेर एकटं रहाणं हे परवडणार नाही हे उमगून आमची स्मिता पाटील परत आली. उंबरठा सिनेमात नवर्‍याचे सदन वार्‍यावर सोडून इतर बायकांचा उद्धार करत गगन सदन तेजोमय करत बोंबलत फिरत असते. अखेर ती संसारात परत येते.

आमची स्मिता पाटील प्रेमाने बोलली... कुलदेवतेला जाऊन येऊ मग सुरु करु... मी म्हटलं .. बाई , तू स्वतःच एक मोठा नरसोबा आहेस. त्याग व भोग यांच्या उंबर्‍यावर बसलेला ! घरात जायचं की बाहेर जायचं हा गोंधळ सात वर्षात तुला सोडवता आला नाही ! आता दुसरा नरसोबा कशाला ?

फिर भी वो नरसोबा को सलाम वालेकुम बोलके आया .

Proud

बायको व मुलगीच्परत आल्यावर आधी चर्च गाठले. मुलीला माउंटमेरी व चर्च दोन्ही आवडले.

सध्या अकबर जोधा व प्रिन्सेस मजेत आहेत. आणखी एक गुड न्युज आली. मला डिप्लोमा एच आय व्ही स्पॉन्सरशिप मिळाली. आता रोज बापलेक अभ्यासाला बसतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी Proud

हि स्टोरी आधीपण वाचलेली आहे बहुतेक. तुम्हीच जामोप्या ना?
तुम्ही ऑफिशिअली (ऑन पेपर) मुसलमान धर्म स्वीकारलात का?

माहेरी पगार द्यायला माझा विरोध नव्हता. पण भविष्यात होणार्‍या आपल्या मुलाला चार पैसे तरी ठेवावेत हीच माझी इच्छा होती. उरलेली रक्कम सुमारे ७० % तिने रिकामटेकड्याना द्यावेत ही माझी अपेक्षा होती. पण व्हायचं तेच झाले. रिकामट्व्कड्याना संपुर्ण पगाराचा सुटलेला मोह आणि त्यांच्यासाठी सर्व सुखाचा त्याग करणे हे कर्तव्य आहे या बायकोच्या आंधळ्या भीष्मभक्तीत माझा सगळा संसार नासून गेला.

>> हेच जर का पुरुष करत असेल तर त्या बाईने कोणता धर्म स्वीकारावा हे पण सांगा.

मोगा, तूमची कहाणी तुटक तुटक माहीत होती. आज मन मोकळे केलेत, छान झाले. तूम्ही आता सुखी आहात हे वाचून खुप बरे वाटले. तूमची लेक तूम्हाला परत भेटली यापेक्षा बापासाठी जास्त काय सुखाचे असणार ?

कालच मी द बूक थीफ नावाचा अप्रतिम चित्रपट बघितला. लेक किती जीव लावते.. त्यासाठी तरी अवश्य बघाच.

पैचान कौन ?

>> जागोमोहनप्यारे आणि मग काऊ आणि आता मोगा. इतकंच माहित आहे मला.
ते आंबा का कोण ते पण तुम्हीच होतात का माहित नाही.

मग माझ्या प्रश्नांची उत्तरे पण द्या ना.

१. तुम्ही ऑफिशिअली (ऑन पेपर) मुसलमान धर्म स्वीकारलात का?
२. ... हेच जर का पुरुष करत असेल तर त्या बाईने कोणता धर्म स्वीकारावा हे पण सांगा.

मोगा, तुमची कहाणी खरी आहे, माहित आहे.
पण ज्या पत्नीसोबत सध्या आनंदाने रहाताय तिला असे काही चारचौघांत बोलणे अज्जिबात आवडले नाही.
दुसरे म्हणजे संसारातला एक पार्टनर किंवा त्याच्या घरचे लोक जरा विचित्र असले की घरात असंतोष माजणे हे काही कुणा एका धर्मामध्ये किंवा धर्माच्या शिकवणुकीमध्ये असते असे नाही. प्रत्येक धर्मात असे अतिरेकी लोक असतात.
त्यामुळे तुम्ही या कारणाकरिता तुमच्या जुन्या धर्माला नावे ठेवणेही आवडले नाही.

असो. तुम्हाला पुढिल वैवाहिक आणि व्यावसायिक वाटचालीला शुभेच्छा!

नक्की काय सांगायचे आहे ?
तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारला म्हणुन तुम्ही सुखी झालात असेच का ?

स्वताला डॉक्टर म्हणवणारे लोक अमुकतमुक केले आणि लगेच पाय बरा झाला म्हणतात आणि हेच इतर म्हणतात तेव्हा त्यांना बुरसटलेले अंधश्रद्ध म्हणतात. चांगले आहे. नवीन धर्म पावला म्हणायचे.

आता माबोवर पण धर्मप्रचार सुरु का?

बाकी सातीशी सहमत.

ऑफिशियली मी अजुन हिंदू ब्राह्मण आहे... उपनयन केले की दुसरा जन्म मिळतो... अल्लाचे नाव घेऊन मी त्रिज म्हणजे तिसर्‍या जन्मात गेलो.

माझे डिस्कशनचे मुद्दे अजुन बाकी आहेत...

१. भारतीय इतिहासात सुखी संसार , मोठे राज्य व इतके असुनही दीर्घ्हायुष्य हा सन्मान फक्त मुसलमान व ख्रिस्चनानाच का मिळालेला आहे ? हिंदू या बाबत कम नशिबी का आहेत ?

२. भारतीय इतिहासात मुस्लिम महिलांचा इतिहास का शिकवला जात नाही ? मुमताजमहल व जोधाबाई ही नावेही सिनेमांमुळे माहीत आहेत.

३. मोघलांच्या मुली व सुना पर्शियाशी संबंधित होत्या. त्या मुली दोन्ही देशांच्या भाषा व लिप्या शिकून दोन्ही घराण्याना मदत करत होत्या. मुलीचा माहेरचा हक्क व नवर्‍याकडून असलेली तिची हक्काची मिळकत हे दोन्ही फंड त्या स्वतःच म्यानेज करत होत्या असे ऐकून आहे. पण हे करत असताना त्या संसारकर्मात कुठेही दुर्लक्ष करत नव्हत्या.

४. संसार कर्त करत मुस्लिमानी मोठी मोठी राज्ये संभाळून दाखवली. मग हिंदु लोकाणाच संसार नसलेले , संसार सोडलेले , लग्नातून पळालेले , ब्रह्मचारी असे आदर्श का आवडतात ?

५. संसार , सुख हे व त्याग भक्ती कर्तव्य यांना हिंदु धर्मात विरुद्धार्थीच का स्थान आहे ?

६. दत्तगुरुनी ते वाक्य ११ व्या शतकात उद्गारले आहे. म्हणजे प्य्ढच्या काळात मुस्लिम व ख्रिस्चन सुखात रहाणार , ही त्यानी भविष्यवाणीच केली होती का ?

७. पुढे तो धोबी बहामनी सल्तनतमध्ये अल्लाउद्दीन २ या नावाने कर्नाटकात बिदर येथे जन्मला... तो हिंदू व मुसलमान दोन्ही धर्मियाना सन्मानाने वागवत असे , याचे सविस्तर वर्णन गुरुचरित्र अध्याय ५० मध्ये आहे. मी त्याचा वाडा व कबर बघायला एकदा जाणार आहे. Happy

आज दत्तजयंती, ईद व उद्या ख्रिसमस हा मुहूर्त साधून तिन्ही धर्मांना एकत्र ओवणारा धागा लिहीला आहे असे वाटले. दुसरा धर्म स्वीकारण्याची युक्ती गुरूचरित्र वाचताना मिळाली हा अलभ्य लाभ.

मोगा,

धर्म ही एक जीवनपद्धती असते. जी जीवनपद्धती तुम्ही स्विकारणार तसे आयुष्य जगणार. यामागे आणखी कसलेही सायन्स वा चमत्कार नाहीये. देव ईशू अल्लाह भगवान तर मुळीच नाहीये.

जर आपण आपल्या धर्मात सुखी समाधानी नसू तर याचा अर्थ ती जीवनपद्धती आपल्याला मानवत नाही नाहीये, तेव्हा बदलणेच योग्य.

ज्या पत्नीसोबत सध्या आनंदाने रहाताय तिला असे काही चारचौघांत बोलणे अज्जिबात आवडले नाही.>>>>> अगदी अगदी.त्यांचा उल्लेख ज्या भाषेत केला आहात ते तर निंदनीय आहे.
बाकी तुम्ही श्रद्धा किती धर्मांवर (दिव्य प्रकाश ते म्लेंछ) ठेवता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.

A converted is more catholic than Pope.अर्थात बाटग्याची बांग मोठी! तेव्हा चालू दे.

मोगा, कर्म भोग कोणाला सुटले आहेत? पण तुम्हाला तुमच्या मुलीविषयी असलेली माया, कळकळ यामुळे ती परत तुमच्या जवळ आली आणी पत्नी पण आता तुमच्या बरोबर सुखाने सन्सार करत आहे, हे वाचुन खरच बरे वाटले. तुमचा सन्सार असाच सुखाने चालो ही सदिच्छा.

आणी अशा रिटे लोकान्बद्दल बोलाल तर ते प्रत्येकाच्या नशीबात असतात. कोणाला ते मेव्हणी तर कोणाला ते दिराच्या/ भावाच्या रुपात मिळतात. पण त्यातुन खम्बीरपणे आपणच मार्ग काढावा लागतो. लोक दोन्हीकडुन बोलतात हे खरे. पण बायकोला ठामपणे सर्व काही विश्वासात घेऊन सान्गावे आणी आपल्या भविष्यातल्या योजना आपणच साम्भाळाव्यात हे खरे.

बाकी सातीला अनुमोदन. तुम्ही सगळ्या धर्माना फॉलो केलेत तरी शेवटी सुत्र एकच असते की माणुस हा प्रेमाचे प्रतिक आहे. पण एकट्या हिन्दु धर्माला दोष देताना आता जगात बघा कोण सुखी आहे ते. आपणच आपल्या सुधारणा कराव्यात, जग आपोआप आपल्या मागे येते.

माझे दोन प्रतिसादः

पहिला, जो मी हे वाचून कोणत्याही व्यक्तीला प्रामाणिकपणे दिला असता तो:
==================

तुमचे वैयक्तीक प्रश्न आणि धर्म ह्यांची सांगड घालणे पटले नाही. पत्नी नीट नांदणारी नसणे व अपघात हे वाचून फार वाईट वाटले. नेहमी पतीच अरेरावी करतो हे चित्र पूर्ण खरे नाही हेही दिसून आले. मात्र ह्या एका उदाहरणावरून काढलेले निष्कर्ष किंवा नंतर प्रतिसादात विचारलेले प्रश्न हे सगळे थोडेसे न पटण्यासारखे वाटले.

(पहिला प्रतिसाद समाप्त)
================

दुसरा मायबोलीवर आणि विशिष्ट मानसिकतेच्या टोळक्याच्या भाषेतील प्रतिसादः (हीच भाषा मूळ धाग्यातही सर्वत्र दिसत असल्याने ह्या प्रतिसादाचे फारसे वावगे मानले जाऊ नये अशी आशा)
================

कैच्याकै निष्कर्ष! आता समजले कश्यातही धर्म कसा ओढून ताणून आणायचा हे विचार समाजात कसे तयार होतात. हिंदू धर्म एक सोप्पे टार्गेट आहे. काही दुर्दैवी घडले किंवा आपल्या मनगटात दम नसला की हिंदू धर्माला शिव्या देऊन दुसरा धर्म स्वीकारल्याचे सांगून स्तुतीसुमने झेलायला आणि विविध लाभ मिळवायला तयार! स्वतःच्या जिभेचे आणि इंद्रियाचे चोचले पुरवायचे म्हणून धर्म बदलणार आणि हिंदू धर्माने बायको बांधून ठेवली नाही असे बोंबलत फिरायला तयार!

आजचे सुविचार
१. आपले ते मित्रमंडळ दुसर्‍याचे टोळके.
२. आपले ते (सद्)विचार, दुसर्‍याचे गरळ.

२. ... हेच जर का पुरुष करत असेल तर त्या बाईने कोणता धर्म स्वीकारावा हे पण सांगा.

<<

पियू,

हेच पुरुषांनी करावे काय? का करावे? का करू नये? याबद्दल :

लग्न ही संस्था बेसिकली (वडिलोपार्जित) संपत्तीचे वाटप कशा प्रकारे व्हावे हे ठरवण्याचे व दुसर्‍या टप्प्यात प्रत्येक कमावत्या/प्रजननक्षम नर/मादीस जोडीदार मिळावा, हे पहाण्याचे काम करते.

हा दुसरा भाग सोडून दिला, तरी आई-बापांच्यासाठी स्वतःच्या कमाईतून खर्च करणार्‍या (न करणार्‍याही) पुरुषाला त्यांच्या इस्टेटीत वारसाहक्क मिळत होता. मुलीला हा हक्क मिळण्याची तरतूद अत्यंत नवी आहे. (माझ्या आठवणीप्रमाणे १९९५ नंतर लग्न झालेल्या मुलींसाठीच ती लागू आहे. नक्की आठवत नाही. मुलालाही पालकांना 'पोटगी' देणे अनिवार्य असल्याबद्दलचा निर्णय तसाच रिसेंट आहे. मला वाटतं मुलींनाही त्यातून सूट नाही.) तेव्हा त्या मोबदल्यात पुरुषाकडून पालकांची देखभाल करवून घेण्यात हिशोबाबाहेरचे काही दिसत नाही.

वर जामोप्यांनी म्हटल्याप्रमाणे ७०% कमाई देऊन टाकायला त्यांची हरकत नव्हती, थोडे स्वतःसाठी ठेव असे सांगत होते, असे दिसते.

माझ्या माहितीतल्या अनेक घरांतून (माझ्याही) मुलीकडच्या आई-वडिलांचीही तितकीच काळजी घेतली गेलेली पाहिली आहे. तेव्हा अगदी माहेर टाकूनच दे असे म्हणत असतील असे नव्हे. असो.

*प्रतिसाद फक्त व फक्त पैशाबाबत आहे. इतर शारिरीक/नमानसिक संबंधाबद्दल नाही, याची नोंद घ्यावी.*

हाही मुद्दा लिहायचा होता. पुरुषप्रधान स्म्स्कती असल्याने लग्नानंतर स्त्रीची मिळकत पुरुषाच्या घरीच येते. स्त्रीच्य माहेरच वंचित रहातात. तीन भावंडानी वाटून घ्यायचे म्हणून ७० तिकडे व ३० तिला हा साधा हिशोब होता. जर १० भावंडे अस्ती तर ९० - १० असेही मी केले असते.

........

बेफिकिर , ते टायटलचे वाक्य दतगुरुंचे आहे. इतिहासात त कुठे क्ठ लागु होते ते पहा... ५०००० लोक आले होते... तुमची चर्फड होत होती .... मला ते वाक्य आठवत होते.

Proud

मोगा,
>>पण ज्या पत्नीसोबत सध्या आनंदाने रहाताय तिला असे काही चारचौघांत बोलणे अज्जिबात आवडले नाही.
दुसरे म्हणजे संसारातला एक पार्टनर किंवा त्याच्या घरचे लोक जरा विचित्र असले की घरात असंतोष माजणे हे काही कुणा एका धर्मामध्ये किंवा धर्माच्या शिकवणुकीमध्ये असते असे नाही. प्रत्येक धर्मात असे अतिरेकी लोक असतात.
त्यामुळे तुम्ही या कारणाकरिता तुमच्या जुन्या धर्माला नावे ठेवणेही आवडले नाही.>> +१००

माझ्या नात्यात आणि ओळखीत ना धड डिवोर्स ना धड संसार, अपत्यापासून ताटातूट , वर छळ केला म्हणून तक्रार करु ही धमकी अशा परीस्थितीत अडकलेले पुरुष आहेत त्यामुळे जे काही लिहिले आहे ते मधल्या काळातील मनःस्तापामुळे हे समजू शकते. तुम्ही आता सुखात आहात हे वाचून बरे वाटले.

रच्याकने माउंटमेरीला मी लहान असताना बाबांबरोबर जायचे. त्या चर्चशी निगडीत खूप छान आठवणी आहेत. Happy
>>संसार , सुख हे व त्याग भक्ती कर्तव्य यांना हिंदु धर्मात विरुद्धार्थीच का स्थान आहे >>
असहमत! हिंदू धर्माबद्दल बोलायचे तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्याचा तोल संभाळून संसार करावा ही अपेक्षा आहे. अगदी लग्नात सप्तपदीच्या निमित्ताने देखील तिसर्‍या पावलावर चांगल्या मार्गाने धनसंपदा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याचे वचन आहे. सप्तपदीत पती पत्नी हे एकमेकांची ताकद बनून सुखी वैवाहिक जीवनासाठी एकत्रीत प्रयत्न करु अशी शपथ घेतात.

बाकी पती-पत्नीच्या एक्सटेंडेड फॅमिलीतील मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी जी काही त्यागाची, कर्तव्याची सोइस्कर व्याख्या बनवून नात्यात दुरावा, ताण निर्माण करतात तो वेळीच ओळखून अशा लोकांकडून स्वतःच्या कुटुंबाचे शोषण होवू द्यायचे नाही हे ठरवून सातत्याने करावे लागते. मग धर्म कुठलाही असो.
इथे अमेरीकेत वर वर दिसताना एकत्र कुटुंब पद्धती नाही तरीही आई-वडील, भांवडे इतकेच नव्हे तर एक्स वाइफ/ हजबंड , झालेच तर खुद्द चर्च देखील आर्थिक, मानसिक शोषण करुन नात्यात दुरावा आणतात हे पाहीले आहे. भारतातली मुस्लिम मैत्रीणीचे तिच्या कुटुंबातील स्थान, तिच्या नवर्‍याचे वर्तन जवळून पाहिलेय. सतत धाकात असायची. दुसर्‍या मुस्लीम मैत्रीणीच्या सासरच्यांच्या मागण्या पुरवताना माहेरच्यांना कर्ज काढावे लागे.

वर जामोप्यांनी म्हटल्याप्रमाणे ७०% कमाई देऊन टाकायला त्यांची हरकत नव्हती, थोडे स्वतःसाठी ठेव असे सांगत होते, असे दिसते.

>> पण असा श्रावणबाळही असू शकतो ना ज्याचे नातेवाईक *रिकामटेकडे* आहेत आणि त्यांना पुरुषाच्या *पगाराचा संपुर्ण मोह* पडलेला आहे आणि *त्यांच्यासाठी सर्व सुखाचा त्याग करणे हे कर्तव्य आहे अशी पुरुषाची आंधळी भीष्मभक्ती* आहे. आणि अश्या लोकांच्या हावरटपणामुळे *संसार नासत आहे*.

यावर तुमची पोस्ट समाधानकारक उत्तर देते असे वाटत नाही. यात वडीलोपार्जित संपत्तीचा वाटा वै. चा संबंध कळला नाही. आणि काही संबंध असलाच तरी तो स्त्री-पुरुष दोघांना इक्वली अ‍ॅप्लिकेबल असावा असे वाटते. (त्याला हे ७०:३० चे गुणोत्तर अ‍ॅप्लीकेबल नाही का?)

* हे शब्द मूळ लेखातले आहेत. माझ्या पदरचे नाहीत.

हेच पुरुषांनी करावे काय? का करावे? का करू नये? याबद्दल :

>> माझा प्रश्न हे पुरुषांनी करावे का करु नये याविषयी नव्हता. असा *आंधळ्या भिष्मभक्तीवाला* नवरा असेल तर त्या बाईने कोणता धर्म स्वीकारावा म्हणजे तिलाही शांतता/ सुख/ समाधान (जे काही मोगा म्लेंच्छ स्वीकारल्यावर मिळेल असे म्हणत आहेत ते) मिळेल असा प्रश्न होता.

हिंदू धर्माबद्दल बोलायचे तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत.

......

हे थेअरीत अ. प्रत्यक्षात अर्थ व काम हे त्यागणे जास्ती ग्लॅमरस मानले गेले.

चार पुरुषार्थ ते शेरोशायरी मी सगळे कळवळुन बोलायचो.

दो इंतजार मे बीत गये दो आरजू मे बीत गये.

हा शेर शेकडो वेळा बोलून झाला.

मोघलांचा अभ्यास करताना कळले की तो शेर अखेरचा मोघल सम्राट बहाद्दूरशहा जफरचा अहे.

Happy

बाकी पती-पत्नीच्या एक्सटेंडेड फॅमिलीतील मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी जी काही त्यागाची, कर्तव्याची सोइस्कर व्याख्या बनवून नात्यात दुरावा, ताण निर्माण करतात तो वेळीच ओळखून अशा लोकांकडून स्वतःच्या कुटुंबाचे शोषण होवू द्यायचे नाही हे ठरवून सातत्याने करावे लागते. मग धर्म कुठलाही असो.

>> यू सेड इट Sad

>>हे थेअरीत अ. प्रत्यक्षात अर्थ व काम हे त्यागणे जास्ती ग्लॅमरस मानले गेले.>>
भारताची लोकसंख्या आणि भ्रष्टाचार करुन मिळवली जाणारी संपत्ती बघता मलातर वाटते अर्थ आणि काम त्यागणे याला ग्लॅमर हे फक्त बोलण्यापुरते आणि दुसर्‍याला उपदेश करण्यापुरते!

Pages