स्त्रियांनी अस करणे खरच जरुरी आहे का?

Submitted by Swara@1 on 30 January, 2016 - 01:29

कालपासून तिकडे सचिन पगारेंच्या 'लिंबू - मिरची' च्या लेखावर जोरदार चर्चा चालू आहे आणि आज सकाळी ऑफिस मध्ये आल्यावर माझ्या मैत्रिणीने तिच्याबाबतीत घडलेला एक किस्सा मला सांगितला.

हा, तर किस्सा असा आहे कि तिच्या सासूने मसाला करायला घेतला होता आणि माझी मैत्रीण सध्या periods मध्ये आहे आणि चुकून तिचा हात मसाल्याला लागला त्यावरून तिच्यात आणि तिच्या सासूत प्रचंड वादावादी झाली. तिच्या सासुच म्हणन अस होत कि आता तिचा हात लागला म्हणून सगळा मसाला खराब होईल (आणि हे फक्त मसाल्यांच्या बाबतीतच नव्हे तर लोणच्यांच्या बाबतीतही लागू होत म्हणे )

तर मला जाणकारांना हेच विचारायच आहे कि खरच अस असत का ? स्त्रियांनी त्यांच्या 'त्या' दिवसात नवीन बनवायला घेतलेल्या मसाल्याला किंवा लोणच्याला हात लावला तर ते टिकत नाही किंवा खराब होत.

खरच अस आहे का? आणि असेल तर त्यामागे काय (शास्त्रीय) कारण आहे ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सासुबाई मसाला (किंवा इतरही काही) करत असताना कशाला हात लावायचा म्हणते मी? बघत बसायचं मस्तपैकी. वर म्हणायचं आई तुमच्या हातासारखी चव कुठेच नाही हो.

वर म्हणायचं आई तुमच्या हातासारखी चव कुठेच नाही हो.>>>>> Lol
खरच अस आहे का>>>>माझ्या मते, अजिबात नाहीये.
कालच टी.व्ही वर बातमी पाहिली,,मुंबईतल्या एका मुलीने मासिक पाळीच्या त्रासाला कंटाळुन गळफास लावुन घेतला..फार वाईट वाटल. Sad पुढची चर्चा एकली नाही

अंधश्रधेचा एक प्रकार ..

तुझ्या मैत्रिणिला सांग चुकुन हात लागला तेंव्हा तिच्या अंगात देवी संचारली होती व देविचीच इच्छा होती मसाल्याला हात लावायची
.

अंधश्रधेचा एक प्रकार ..

तुझ्या मैत्रिणिला सांग चुकुन हात लागला तेंव्हा तिच्या अंगात देवी संचारली होती व देविचीच इच्छा होती मसाल्याला हात लावायची
.<<<<< Lol Lol

>>>> कि आता तिचा हात लागला म्हणून सगळा मसाला खराब होईल <<<<
हा सरासर मूर्खपणा व ही (अनेक श्रद्धांमधिल) अंधश्रद्धा आहे.
(जे श्रद्धाच मानत नाहीत, त्यांना प्रत्येकच श्रद्धा अंधश्रद्धा असते त्यापैकी मी बोलत नाहीये)
बरेचदा, देवादिकांच्या नावाखाली सूनेला छळण्याचे, वा सुनेपेक्षा आपले वेगळेपण जपण्याच्या मानसिक गरजेतुन "अशा प्रथांचा जन्म होतो" व त्या देवादिकाच्या नावावर "खपविल्या" जातात.
खूप वर्षांपूर्वी अगदी कदाचित "स्वच्छता व दुर्गंध व जोडीने लज्जा" हे देखिल अशा प्रथांना कारणीभूत ठरले असतीलही, पण सध्याच्या काळात स्वच्छता व दुर्गंध ही कारणे देणेही मी गैरलागु समजेन.
मी असले भिकार सोवळेओवळे मानित नाही.

३३ कोटी देव पोटात घेऊन, गाय तेवढी पवित्र,
'त्या' दिवसात जन्मदात्री माय, कशी झाली अपवित्र.
९ महिने त्याच रक्तात वाढला,
२ वर्ष पान्हा तोडला
तिच्या कष्टावर उभा राहिला,
तरी 'स्त्री' म्हणून अपवित्र?
-- Satyashodhak

लिं.टिं. शी सहमत

पूर्वी जेव्हा सॅनिटरी नॅपकिन वगैरे प्रकार नव्हते तेव्हा कदाचित असे असू शकेल. आत्ता नक्कीच नाही.

खरोखर जाम डोक्यात जाते हे " हात नको लाऊ प्रकरण" अस वाटत सांगूच नये सासूला .. periods आलेत म्हणून Sad

सासुबाई मसाला (किंवा इतरही काही) करत असताना कशाला हात लावायचा म्हणते मी? बघत बसायचं मस्तपैकी. वर म्हणायचं आई तुमच्या हातासारखी चव कुठेच नाही हो. <<< Lol

अस वाटत सांगूच नये सासूला .. periods आलेत म्हणून>>>>>>> ऑ? मी तर म्हणते नसले आले पिरीयडस तरी *अश्या सासुला आलेत असं सांगावं आणि मस्त आराम करावा, बाहेर फिरुन यावं.:हाहा:

(अश्या म्हणजे जी सासु ' ह्याला हात लावु नको, त्याला हात लावु नको, देवघरात जाउ नको, मसाला शिवु नको, ढमकं-फलाणं सांगत असते आणि स्वतःला कितीही काम पडलं तरी चालेल पण सुनेचा विटाळ चालत नाही ती.)

सस्मित.. आमच्याकडे असं होतं सुरुवातीला.. :वावा:
मग सगळ्यांना मला पाण्याच्या पेल्यापासुन जेवणाच्या ताटापर्यंत सगळं आयतं हातात देण्याचा कंटाळा आला. Sad

तिचा चुकून हात लागला (वर तस मी नमूद पण केल आहे )
<<
सासूला हात लावा. ती बिघडल्याची बरी होईल एखाद वेळेस.

>>>> मग सगळ्यांना मला पाण्याच्या पेल्यापासुन जेवणाच्या ताटापर्यंत सगळं आयतं हातात देण्याचा कंटाळा आला <<<<
ही देखिल दुसरी बाजु आहे.
पण तरीही, देवाला कैतरी विटाळ होतो म्हणुन हे नको.
शुद्ध वैद्यकीय कारण, वा विश्रांती हविच त्या दिवसात या निमित्ताने बसवा की बाजुला... त्या करता शिवाशिवीची थेरे कशासाठी? मूर्खपणे आचरटपणे भरलेत या कित्येक हिंदू धर्मियांच्या समजुतीत.
त्यातुन घरच्या "पुरुषांना " सगळे आयते हातात नेऊन वाकुन वगैरे वाढायची/द्यायचि पद्धत तर खतरनाक अस्ते.
आमच्या कडे त्या वेळेस चाळिस पन्नास वर्षांपूर्वीही कडक शिस्त होती, आईकडे पाणी बिणी देखिल मागायचे नाहीच, जर बसल्या जागी मागितले, तर बापाकडुन कानठाळीत पडलीच समजा.... हात पाय मोडले का तुझे? स्वतः घे हा खाक्या. जेवायला बसायचे तर पाटपाणी घ्यायचेच, जेवण झाल्यावर उष्टे खरकटेही करायचे. एकटी बाई किती करेल, हा हिशोब असायचा. अन तो माझ्या आजुबाजुच्या सर्वच कोब्रांमधे मी बघितलाय. बाकीच्यांचे माहित नाही.

निनाद अशी शक्यता आहे. कारण आमच्या घरातल्या पुरुषानचे पण बायका माहेरी गेल्या तरी काहीही अडत नाही, कारण सगळ्याना उत्तम स्वयम्पाक येतो. सासर्‍यान्ची ताकीद होती की मला काही येत नाही किन्वा येणार नाही असे बाई आणी पुरुष दोघानीही म्हणू नये. प्रत्येक वेळेस हॉटेल परवडेलच असे नाही.

मग सगळ्यांना मला पाण्याच्या पेल्यापासुन जेवणाच्या ताटापर्यंत सगळं आयतं हातात देण्याचा कंटाळा आला. >> +१ पियू.. समदुःखी गं आपण. Sad

लोणचं आणि मसाले खराब होतात ही समजूत हा मूर्खपणा असावा. 'कपडे वगैरे धुतलेले ओले हात' आणि 'त्या दिवसात हात लावणे' याची गफलत होऊन हा समज कधीतरी प्रूव्ह झाला असावा काय?
आता हात लावून झालाच आहे तर मसाले खराब न झाल्यावर सासूला प्रूफ म्हणून नक्की दाखवावे. अर्थात सासूने हे भांडायला निमीत्त म्हणून काढले असले तर दाखवून पण समजूत पटणार नाहीच.

लोणच्याला योग्य प्रमाणात मीठ अथवा तेल जर पडले नाही तरी ते नासते/ त्याला बुरा येतो किन्वा ते काळे होऊन खराब होते. आणी सतत हलवावे लागते. म्हणजे वर खाली हलवुन ठेवावे लागते. पण काही लोक त्याचा पिरीएडशी सम्बन्ध लावत असतात हाच बेसिकमधला लोचा आहे.

बाहेरून विकत आणलेल्या लोणच्याला तर कोणा कोणाचे हात लागलेले असतील . ती लोणची कशी नाही बिघडत बरे?

मासिक पाळी म्हणजे अपवित्र असे मानले की कुठल्याही बिघडलेल्या गोष्टीचे खापर त्यावर फोडायला मोकळे. यात लोणचं/मसाला खराब होणे, तुळस मरणे वगैरे काहीही भंकस चालते.

पादुकानंद,
बाहेरच्या लोणच्यात सोडिअम बेंझोएट, पोटॅशियम सॉर्बेट अशी विविध प्रिझर्वेटीव वापरलेली असतात आणि चांगला दिड इंच वर येईल असा तेलाचा थर असतो.

आणि रेडीमेड लोणची पण बिघडतात.
मिरचीचं आयतं लोणचं बरेच दिवस कमी प्रतीच्या प्लॅस्टिक बरणीत ठेवा, तुम्हाला घाण वास येणारे अल्कोहोल सदृश काहीतरी मिळते. घरची जास्त लवकर खराब होतात कारण आपण प्रिझर्वेटिब्व्ह वापरत नाही.

मस्तपैकी. वर म्हणायचं आई तुमच्या हातासारखी चव कुठेच नाही हो >>

मला वाटायचं की फक्त सीरीयलमधेच डावपेच असतात.
बहुतेक सूनेने सीरीयल पाहून एकटीनेच चतुरा बनू नये म्हणून सासूही सीरीयल्स बघत असणार किंवा उलट.

स्वराताई,

तुमच्या घरी ही शिवाशिवीची पध्दत पाळतात का? जर नसतील पाळत, तर त्यामुळे कधी लोणची-मसाले बिघडले आहेत का? का तुम्ही लोणची-मसाले घरी बनवत नाही? विकतच आणता का? मग विकत आणताना चेक करता का की कोणी बनवले आहेत व कधी? जर नसाल करत तर कधी अचानक मसाला खराब झालाय वगैरे अनुभव आला आहे का? ही उत्तरं तुम्हाला आपली आपणच मिळतील.
अजून एक आयडिया- हा प्रयोग घरी करुन बघता येईल- मुद्दाम पिरियडसच्या काळात लोणचं बनवून बघायचं- एखादी सोप्पी लोणचं/मसाला कृती नेटवर मिळेल-हाकानाका!

दुसरं- 'जाणकारांचं' म्हणजे नक्की कोणाचं मत हवंय? ते लिहा. इथे जाणकार म्हणजे घरी मसाले/लोणची बनवणार्‍या स्त्रिया का? की गायनॅकॉलॉजिस्टचं मत हवंय पिरियड्सबद्दल?

Pages