धार्मिक-साहित्य

ज्ञानदेवा॥

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 November, 2019 - 12:56

*******

मागतो तुजला
एकच मी दान
कृपेचे कवन
करि मज ॥
जरा हे शब्दांचे
तेज मावळून
घडू दे दर्शन
गाभ्यातले ॥
मागतो चांदणे
चकोराच्या चोची
प्रभा निरभ्राची
दिसो मज ॥
थिल्लराचे जीणे
नको नको आता
व्हावा मी वाहता
महा ओघ ॥
परी घडे सारे
तव कृपा बळे
एवढेच कळे
मज लागी ॥
म्हणूनिया पायी
ठेवी सदा माथा
सांभाळ विक्रांता
ज्ञानदेवा॥
***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.com

शब्दखुणा: 

कविता आणि स्तोत्रांची आवड

Submitted by सामो on 12 October, 2019 - 07:01

अमा यांचा, डिटॉक्स (https://www.maayboli.com/node/13515?page=3#comment-4436683) हा छानसा धागा वाचला आणि माझ्या स्तोत्र वाचनाच्या छंदाची आठवण आली. कविता आणि स्तोत्रवाचन दोन्ही विरंगुळा आणि बॅटरी रिचार्ज करण्याची साधने. दोन्हींची अतोनात आवड आहे मला. या विषयावरती लेख लिहीलेले आहेत ते इथे पुनर्प्रकाशित करते आहे.
_________________________________________________________________

आध्यात्मिक आणि धार्मिक पुस्तकांची लायब्ररी आहे का?

Submitted by कोहंसोहं१० on 11 October, 2019 - 11:00

आजच्या जगात सर्वच विषयांवर विपुल साहित्य पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. अध्यात्मिक किंवा धार्मिक विषय त्याला अपवाद नाहीत. आज मराठीतून किंवा हिंदी आणि इंग्रजीतून अध्यात्मिक विषयांवर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत (फक्त बुकगंगा वर या विषयाची ९००० च्या आसपास पुस्तके आहेत). अध्यात्मिक आणि धार्मिक पुस्तके वाचण्याचा छंद असल्यास (खास करून जेष्ठ नागरिकांसाठी) आवडीच्या विषयातील पुस्तक निवडण्यापासून ते विकत घेऊन वाचण्यापर्यंतचा प्रवास खुप मोठा असतो. तसेच आर्थिक मर्यादांमुळे सर्वच पुस्तके विकत घेऊन वाचता येत नाहीत.

देव्युपासना-बंगाली कविता-ओळख

Submitted by सामो on 6 October, 2019 - 13:28

चित्रे जालावरुन साभार. जरी माझ्याकडे पुस्तक असले तरी, कविता गूगल करुन शोधुन टाकलेल्या आहेत.
.

शेगावीचा राणा

Submitted by @गजानन बाठे on 20 September, 2019 - 11:44

||शेगावीचा राणा||

खूप जाहले व्याप जगाचे,
उसंत आता व्हावी थोडी,
कुठवर नेईल मज प्रपंचे,
तुज नामाची लागो गोडी.

तू विठ्ठल तू समर्थ माझा,
तिर्थनगरी मज शेगावी,
मी बंकट तू माझा राजा,
मुर्ती तुझी मज डोळा न्हावी.

पुष्पसूमने मी तुज अर्पितो,
निरंकार तू माझ्या देवा,
विनासये तू मजसी देतो,
भक्ती तुझी मज अमूल्य ठेवा.

उभ्या संकटा तारुणी नेसी,
स्मरण तुझे मज ऊर्जा देते,
पामर मी, तू ह्रृदय निवासी,
तू गण गण गणात बोते...

गजानन बाठे

एका फूलवेलीचे मनोगत

Submitted by सामो on 19 September, 2019 - 12:58


............................................................................................................................
निबिड या व‌नी तुवा, कृपेची आस‌ म‌न्म‌ना,तुझ्या च‌र‌णी वाह‌ते हृद‌य‌सुम‌न‌ ही उमा
उघ‌डी न‌य‌न‌ श‌ंक‌रा, प्र‌स‌न्न‌ व्हावे ईश्व‌रा
च‌राच‌रात फुल‌त‌से व‌स‌ंत‌ आज‌ साजिरा.
.
त‌पोनिधी नि:स‌ंग‌ तू ज‌री असे मी जाण‌ते, त‌व‌ च‌र‌णी ईश्व‌रा धुळीचे स्थान माग‌ते
क‌ळे ज‌री म‌ला तुझी अप्राप्य‌ताही मोह‌वे

गूढ, अद्भुत तरीही विलोभनीय ....गिरनार (भाग १)

Submitted by आशिका on 17 September, 2019 - 02:32

पार्श्वभूमी:

काफीरकी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 August, 2019 - 12:59

काफीरकी
********
कासया मी जाउ
आता कुण्या दारी
भार तुजवरी
दत्तात्रया

होवो माझे भले
होवो नच जरी
जातो ना माघारी
येथूनिया

तुझ्या दारी नाही
असे जगी काही
दिसत ते नाही
मज दत्ता

जरी का उपाशी
राहिलो मी इथे
मिळणार कुठे
काही नाही

सरली ही कथा
माझ्या यातनांची
आता कृपा तुझी
खरी ठरो

अन्यथा होईल
जगात नाचक्की
व्यर्थ काफीरकी
केली ऐसी

शब्दखुणा: 

रुक्मिणी आणि राधा एकच होत्या का?

Submitted by सप्रस on 24 August, 2019 - 01:03

भगवान कृष्णाचे नाव घेतलं की राधेचा उल्लेख हा आपोआपच येतो, इतकं राधाकृष्णाचं नातं एकरूप झालेलं होतं. राधा ही कृष्णाची निस्सीम भक्त होती. परंतु श्रीकृष्णाने लग्न केलं ते रुक्मिणीशी. काहीजणांच्या मते रुक्मिणी आणि राधा ह्या एकचं व्यक्तिरेखा आहेत. खरोखरच ह्या व्यक्तिरेखा एक होत्या की वेगवेगळ्या?

दत्त धावतो गर्दीत

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 15 August, 2019 - 09:49

दत्त धावतो गर्दीत
दत्त दिसतो वर्दीत
दत्त उगाच गुर्मीत
जाब मागे

दत्त घुसतो डब्यात
दत्त राही लटकत
दत्त चाले ढकलत
दाराकडे

दत्त सिग्नली धावतो
दत्त भिक्षेकरी होतो
दत्त दत्ता धुत्कारतो
गूढ मोठे

दत्त दप्तरी दाखल
दत्त वाहतोय माल
दत्त हप्त्याचा दलाल
रोज ठाम

दत्त दत्ताला ओळखी
दत्त दत्ताला नाकारी
दत्त दत्ताची चाकरी
करू जाणे

दत्त विक्रांत मनात
दत्त व्यापून जगात
दत्त सागर थेंबात
सामावला

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य