धार्मिक-साहित्य

तू माझी माऊली .....

Submitted by पुरंदरे शशांक on 8 December, 2015 - 22:10

तू माझी माऊली .....

हे ज्ञानदेवा, हे ज्ञानराजा,

तुमचे -माझे नाते तरी काय आहे बरे नेमके ? का तुमच्या नावाने, आठवाने ह्रदयात कालवते, डोळ्यात आसवं दाटून येतात ? एक मराठी भाषिक म्हणून ? का तुमच्या ज्ञानदेवीने वेड लावलेला कोणी एक सामान्य रसिक म्हणून ? का तुमच्या तत्वज्ञानाची भूल पडलेला कोणी एक अभ्यासक म्हणून ? का अजून काही ??

तुम्ही खरे तर योगीयांचे योगी, ज्ञानीयांचे देव, प्रत्यक्ष श्रीविष्णूंचा अवतार...

तडका - असहिष्णूतेच्या वादात

Submitted by vishal maske on 1 December, 2015 - 21:39

असहिष्णूतेच्या वादात

कुणाला दिसली नाही
कुणाला थोडी वाटली
असहिष्णूतेच्या वादामध्ये
अनेकांनी ऊडी घेतली

असहिष्णूतेचा अर्थ देखील
कुणा-कुणाला ज्ञात नाही
पण फाटक्यात पाय घालण्याची
सवय त्यांची जात नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - "देवा"च्या नावाखाली

Submitted by vishal maske on 30 November, 2015 - 08:54

देवाच्या नावाखाली

देवाच्या नावाखाली
अंधश्रध्दा चालतात
अनिष्ठ रूढी-परंपरा
आत्मियतेने पाळतात

माणसांना धारेवर
माणसंच धरतात
देवासाठीचे नियम
माणसंच करतात

चुक झाली माणसांची
तर देवाला घेऊ द्या सुड
पण करु नये माणसांनी
ऊगीच मध्ये-मध्ये लुडबूड

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

ऊठ बाई तु जागी हो,...

Submitted by vishal maske on 28 November, 2015 - 23:20

~!!! उठ बाई तु जागी हो,... !!!~

का वैचारिक प्रगतीची
अजुनही दिरंगाई आहेस
समाजही सांगतो आहे
की बाई तु बाई आहेस

बाईला समानता देणं
गलिच्छ मानलं जातंय
तुझं बाई पण आजही
का तुच्छ मानलं जातंय

का बाईकडे पाहताना
समाज झालाय आंधळा
बाईविना खरं तर हा
समाज होईल पांगळा

आजही नाकारलं जातं
बाई तुझ्या स्वातंत्र्याला
आजही बंदी आहे तुझ्या
त्या मंदीरातील प्रवेशाला

घरा-घरात बसली आहेस
थोडसं बाहेर येऊन बघ
प्रश्न आहे तुझ्या हक्काचा
सावित्रीची लेक होऊन जग

बाई तु समानतेचा लढा दे
पुरोगामित्वात सहभागी हो
दुसर्‍यांची वाट पाहूच नको
आता ऊठ बाई तु जागी हो

विशाल मस्के

तडका - आमचे संविधान

Submitted by vishal maske on 25 November, 2015 - 22:03

आमचे संविधान

स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान

धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सहिष्णूतेसाठी

Submitted by vishal maske on 25 November, 2015 - 09:54

सहिष्णूतेसाठी

संभ्रमात मन घूटमळल्यास
मुद्दा पटत नाही पटणाराही
बोलणार्‍याचं बोलणं ऐकताना
भानावर असावा ऐकणाराही

तेव्हाच मनातील गैरसमज
भुर्रर्र करत उडुन जातील
अन् देशभरात सहिष्णूतेचे
वातावरणही घडून येतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - ऐका जरा

Submitted by vishal maske on 24 November, 2015 - 20:20

ऐका जरा

ज्यांना जायचे असेल
त्यांना खुशाल जाऊ द्या
ज्यांना रहायचे असेल
त्यांना बिंधास्त राहू द्या

त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर
विनाकारण वादंग बडवू नये
आपल्या वागण्यानेच देशात
असहिष्णूता घडवू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

एक दिवा भविष्याचा २०१५

Submitted by मी दुर्गवीर on 20 November, 2015 - 06:43

Joy Of Happiness 2015.…

एक दिवा भविष्याचा……
काही तरी वेगळे नाही पण भविष्यात त्याचा उपयोग होईल या उद्दिष्टाने काम केले पाहिजे .
दीपावळी म्हणजे अंधारातून उजेडा कडे जाण्याचा एक मार्ग. दिवाळीच्या दिवसात प्रत्येकाच्या घरात असंख्य दिवांच्या ज्योती प्रज्वलीत होतात , सर्वत्र उत्साह आणि आनंददायी वातावरण असतेच .

तडका - भाऊबीज

Submitted by vishal maske on 12 November, 2015 - 20:06

भाऊबीज

ऊत्सव साजरे करताना
आनंद उतप्रोत असतो
प्रेम आणि आपुलकीचा
ऊत्सव हा एक स्रोत असतो

करायचे म्हणून करायचे
नको नुसतेच नावाला
भाऊबीज साजरे करण्या
बहिण जपावी भावाला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तुम्ही लक्ष्मीपूजन कसे करता?

Submitted by वारी on 11 November, 2015 - 10:05

नमस्कार,
दिवाळीच्या शुभेच्छा.
सध्या मी कामानिमित्त अमेरिकेत आलो आहे. दरवर्षी घरी आईवडीलांबरोबर लक्ष्मीपूजन केल्याने सगळ्या गोष्टी आणून देण्याशिवाय पुजा मांडण्यात फार कधी लक्ष घातले नाही. सध्या त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही आहे. तुम्ही लक्ष्मीपूजन कसे करता ते सांगाल का किंवा फोटो टाकाल का?

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य