केदारनाथचा चमत्कार ! देव रागावले ?

Submitted by ढंपस टंपू on 18 June, 2023 - 09:49

केदारनाथ मंदीरात एका भाविकाने दिलेल्या रत्नजडीत सोन्यातून मंदीराच्या भिंतींना सोन्याचा पत्रा लावण्याचे काम झाले होते. मंदीर आतून बाहेरून सोन्याचे केले होते.

पण चमत्कार झाला आहे. गर्भगृहातील ४० किलो सोन्याचे पितळ झाले. सोन्याचे रूपांतर पितळेत का झाले याचे कारण कळले नाही.
देवाची ही नाराजी आहे का ? देव रागावले आहेत का ?
रागावले असतील तर कशामुळे ?
काही वर्षांपूर्वी देवाच्या रागावण्याने प्रचंड प्रलय आला होता. भूकंपात हानी झाली होती.
त्यापाठोपाठ त्या ही पेक्षा भयानक ही घटना आहे.
त्यामुळे भीतीचे वातावरण आहे.

या दरम्यान मंदीराचे पुजारी त्रिवेदी आणि मंदीर समितीचे विश्वस्त तिवारी यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पुजार्‍याच्या आरोपामुळे बदनामी होत असल्याने मंदीर प्रशासन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवाला पितळ आणि सोने दोन्हीही सारखेच. दोन्हीही त्याचीच अपत्ये आहेत. त्यात सोने पितळ करून कसे चालेल ?
त्यामुळे रागावल्यावर कधी कधी पितळेचे पण सोने होईल.

आज नवीन च बातमी वाचली केदार नाथ मंदिरात एक महिला पैसे उधळत होती आणि तेथील पुजारी मंत्र म्हणत होते.
देवाचा पण बाजार मांडला आहे

४० किलो सोने देणार्‍याची ED/ IT/ CBI चौकशी होते का? हे पैसे राजमार्गाने कमावलेले असतात का?

ज्यांना दान करायचे आहे त्यांना करा पण आधी रितसर टॅक्स भरा.

कसली लिंक हवी आहे? तिकडे जावेदखान यांनी ट्विटरची लिंक/ व्हिडिओ दिलेली आहे...

केदारनाथ मंदिरातल्या सोन्याबद्दल? मंदिरात पुरोहित आणि मॅनेजमेंट यांचे दावे वेगळे आहेत.
https://www.esakal.com/desh/kedarnath-temple-controversay-gold-turned-in...

https://indianexpress.com/article/india/kedarnath-priest-temple-scam-867...