वरदायिनी कालिका

Submitted by Mandar Katre on 18 December, 2014 - 04:45

वरदान काळकाई ऊर्फ वरदायिनी कालिका ह्या देवी चे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर जवळ मुंबई-गोवा हायवे नजीक धामणी गावी आहे . या देवस्थानाला सुमारे 1000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास असून या मंदिरानजीक असलेल्या पुरातन शिल्पात काही सांकेतिक चिन्हे कोरलेली आहेत ,ज्यायोगे असे सिद्ध होते की हे देवस्थान हिमालयातील कटरा vaishnodevi च्या खालोखाल जागृत आहे. परंतु आजतागायत ते प्रसिद्धीस आलेले नसून प्रसिद्धी-पराङ्ग्मुख आहे. या देवळानजिक एक नयनरम्य धबधबा असून पावसाळ्यात जुलै -औगस्ट महिन्यात अतिशय नयनरम्य निसर्गसौंदर्य पाहावयास मिळते . देवीची मूर्ति चतुर्भुज असून सिंहासनाधिष्ठित आहे . या ठिकाणी 1995-1997 दरम्याने सहस्रचंडी सारखी अद्भुत अनुष्ठाने झालेली आहेत . हे देवस्थान अतिशय जागृत असून फाल्गुन शुद्ध द्वादशी आणि वटपौर्णिमा तसेच नवरात्रात या देवीचा उत्सव असतो . जिज्ञासू भाविकांनी जरूर लाभ घ्यावा.1546233_616670285068779_1066505941_n.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mandar Katre,

छान माहिती. त्या सांकेतिक चिन्हांचे प्रचि टाकता येतील का इथे? शक्योचित असल्यास टाकावे ही विनंती. Happy

आ.न.,
-गा.पै.