लिंग-भैरवी यंत्र.

Submitted by हतोडावाला on 30 December, 2014 - 01:48

Yantra.jpg

आमच्या ओळखितल्या एका व्यक्तीने वर्षभरा आधी कोएंबतोर वरुन लिंग-भैरवी नावाचे एक यंत्र आणले होते. त्या यंत्राची किंंमत ऐकून मी चाट पडलो होतो. कारण त्या यंत्राची एक्स-शोरुम प्राईस (कोएंबतोर आश्रम प्राईस) होती रु. ५,००,०००/- ( पाच लाख) व यंत्राचे वजन १६५ किलो, आणि साईज साधारणपणे तीन बाय तीनचा. त्यामुळे चांगले चार पैलवान मिळून हे यंत्र उचलताना हासहुस करुन दमले होते. अशा वजनदार यंत्राची डिलिव्हरी टाटा पिकअपने दिली जाते. त्यामुळे डिलिव्हरी चार्जेस पण चांगलेच पडतात. थोडक्यात साडेपाच सहा लाखाचा चुन्ना लावणारे हे यंत्र आहे.

आता वर्षभरातील एकून घडामोडी पाहता त्या व्यक्तीला या यंत्रपासून लाभ होत असल्याचे जाणवू (किमान वरवर तरी) लागले आहे. त्या शेजार्‍याची प्रगती होत असेल तर मला आनंदच आहे पण ईकडे माझ्या सौ. ला त्या यंत्राचा मोह होत असल्याचे पाहून मला घाम फुटू लागलाय.

हे भगवान मुझे बचाले

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे वा.. खुपच चांगले यंत्र आहे की हे.

हे यंत्र पुर्ण पृथ्वीसाठी वापरता येईल का? असे काहीतरी झाले तर उत्तम होईल. जी काही भरभराट व्हायची ती सगळ्यांची एकत्रच होऊदे.

या यंत्रा बदल अजून काही माहिती मिळेल का; कारण आपण दिलेल्या लिंक वरून त्याची माहिती आणि उपयोग व्यवस्थित कळत नाही; या यंत्रा वर काही तांत्रिक अनुष्ठान वैगरे केली आहेत किव्वा करावी लागतात का?
नक्की कुठल्या भरभराटीशी या यंत्राची उपयुक्तता आहे काही माहिती मिळेल का?

याची फ्रँचाईजी मिळेल का? कारण यंत्र विकत घेण्यापेक्षा तयार करून विकलं तर भरभराट जास्त होईल असं वाटतंय.

तरीच जड ईतके.. पण आपण लाकडाचेच बनवू आणि वरतून दगडाचे पाणी मारू.

अवांतर - हे पण पहा - मध्ये - शनिवारी केस का कापत नाहीत - असा धागा दिसतोय. मी आजपर्यंत केस न कापायचा वार सोमवार समजायचो Sad

भम!
Happy

>>>>मी आजपर्यंत केस न कापायचा वार सोमवार समजायचो <<<<

जगात काहीजण चुकून सोमवारला शनिवार असे म्हणतात. त्यामुळे तुमचे चुकले आहे असे समजू नका.

अतिअवांतर-
ऋन्मेष, सोमवार हा केस न कापण्याचा वार आहे. म्हणजे (दुसर्‍यांचे) केस कापणारे या दिवशी दुकाने बंद ठेवतात, केस कापत नाही.

शनीवार हा केस कापून न घेण्याचा वार आहे. म्हणजे (स्वतःचे) केस कापायला /कापून घ्यायला लोक या दिवशी तयार होत नाही.

>>याची फ्रँचाईजी मिळेल का? कारण यंत्र विकत घेण्यापेक्षा तयार करून विकलं तर भरभराट जास्त होईल असं वाटतंय.<< =+१००१.
मामी, पार्टनर हवाय का ? मी तयार आहे...पुणे विभागात तुमचा पार्टनर व्हायला ह्या धंद्यात Happy

(कोएंबतोर आश्रम प्राईस) होती रु. ५,००,०००/- ( पाच लाख)
बाबौ

या पाच लाखात कित्येक लोकांचा लाभ झाला असता कि,
आजकाल फार यंत्रे निघालीत राव ल़क्ष्मी यंत्र काय , लिंग यंत्र काय ...................... काही वर्षांनी गाड्या आणि कारखाने पण याच यंत्रावर चालतील बुआ.

अवांतर
माझ्या सौ. ला त्या यंत्राचा मोह होत असल्याचे पाहून मला घाम फुटू लागलाय

पाच लाख खर्च करण्यापेक्षा सौ ला पन्नास हजाराचा एखादा दागिना करा .... खात्री आहे यंत्र विसरुन जातील Happy

मी लहानपणापासून कसल्या न कसल्या दिव्य वस्तूंबद्दल ऐकलेय ज्या घरात आणल्यावर अचानक परिस्थिती बदलून भरभराट सुरु होते. त्याबरोबर हेही ऐकलंय कि अशा वस्तूंची एक expiry डेट असते. 5 वर्षे 7 वर्षे अशी. त्या कालावधीनंतर अचानक आलेली भरभराट अचानक लुप्त होते आणि माणसाची आधीपेक्षाही वाईट गत होते. कोकणात एक विशिष्ट शब्द आहे असल्या गोष्टींसाठी. नेमका आठवत नाहीये आता.

५ लाख जर यंत्राचे देउ शकतो त्याचे भाग्य आधीच फळफळले असेल. अजुन किती. ?
उद्या बिल गेट्स अंबानी यांना कोणी यंत्र दिले तर अजुन किती श्रीमंत होतील ?

Pages