शिया आणि सुन्नी यांच्यातील ईराक, ईराण आणि सिरीया या देशातील अंतर्गत युद्धात भाग घेण्यासाठी ३०,००० सैनीक तयार केले जायचे होते. त्यातले काही तरुण या अगोदरच ईराक मध्ये पोहोचले आणी त्यांनी
प्रत्यक्ष युद्धात भागही घेतला. अश्या ३०,००० तरुणाना तयार करण्यासाठी किती मोठी यंत्रणा राबवली गेली असेल याची कल्पना आताच हाती लागलेल्या ईसीस ( ISIS ) च्या ट्वीटर खात्याचा भारतीय सुत्रधार पकडल्यामुळे झाली आहे. ह्या सुत्रधाराच नाव आहे "मेहदी मसरुस बिश्वास". वयाने २९-३० असलेला हा तरुण पश्चीम बंगाल मधुन बंगळुरु येथे आला होता. ISIS च ट्विटर अकौंट तो बेंगळूरू मधुन चालवत असे, त्याला जगभरातील २० - २५ हजार तरुण फॉलो करत होते. आणि त्यातले बरेच लोक ईसीसला येउन मिळणार होते. याचा अर्थ ईतक्या लोकां चा तो "ब्रेन वॉश: करत होता. ह्या मेहदीला जेंव्हा परदेशी पत्रकारांनी विचारल की तु ईराकला लढायला जायला तयार आहेस का? त्यावर त्याच उत्तर होत नाही !! कारण माझ्या पालकांची जवाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि मी ती सोडून ईराकला जाणार नाही. त्या वर त्या पत्रकारांने विचारल की तु खरा मुसलमान आहेस का ? त्यावर ह्या मेहदीच उत्तर होत मी खरा मुसलमान नसेन ही पण मला काही फरक पडत नाही. त्यावर त्या पत्रकारांने विचारल की तु ईतक्या लोकांना ईसीस ला जॉईन करण्यास प्रवृत्त करत आहेस, हे तुला पटत का ? त्या वर मेहदी म्हणतो की ते लोक जे ट्वीटरला फॉलो करतात ते अगोदर प्रवृत्त असतात त्याला मी जवाबदार नाही.
आताच एका तरुणाला भारत सरकारने ईराकहुन परत आणले आहे. किती यातना त्यांला मिळाल्या याची कोठेही मिडियात वाच्यता नाही. ह्या गोष्टी मिडीयात जर आल्या तरच ईतर तरुणांना या धर्म युद्धाच्या सत्यते बाबत कळेल. .
http://www.iraqinews.com/arab-world-news/urgent-30000-indians-volunteer-...
http://timesofindia.indiatimes.com/india/2-Thane-boys-among-18-Indians-w...
http://www.loksatta.com/desh-videsh-news/bangalore-police-detain-pro-isl...
सिडनी येथील लिंट कॅफे नावाच्या हॉटेल / कॅफे तील ५०-६० लोकांना अतिरेक्यांनी आज सकाळ ५.०० वाजल्या पासुन ओलिस धरुन ठेवलय . १२ तास व्हायला आलेत.