Generation Gap

Submitted by प्रतिनिमि on 6 June, 2015 - 01:18

शाळा सुटल्याची बेल वाजली. सर्व मुले धावत बाहेर पडत होती पण सोहम मात्र रेंगाळतच शाळेबाहेर पडला. खरं तर त्याला घरी जाण्याची सुद्धा इच्छा नव्हती.
"सोहम, जरा थांब, माझी मम्मा आज तुला पण घरी सोडणार आहे" पाठीमागून शर्वरी बोलत होती. "अग कशाला, ड्राइव्हर काका आले आहेत."
"अरे हो पण मम्मानेच सांगितल आहे, तुला सांगायला. ती सोडणार आहे आज"
"अग पण....."
"ते काही नाही, तू ड्राइव्हर काकांना सांग तुम्ही पुढे जा"
"सोहम, मी बोलले आहे तुझ्या ड्राइव्हर काकांशी ते गेलेत घरी, चल आपण पण निघू" - सारिका टीचर बोलल्या.
सारिका टीचरच शर्वरी ची आई होती. सहावीच्या वर्गावर इतिहास शिकवायची. फार प्रेमळ सगळ्या विध्याथ्यांची आवडती टीचर. सोहम आणि शर्वरी सहावीलाच होते. एकाच वर्गामध्ये आणि एकाच सोसायटीमध्ये राहत होते. लहानपणापासून चे मित्र होते.
तिघे कार जवळ आले.
" शर्वरी, आज तू मागे बस, आज सोहम माझ्या सोबत पुढे बसणार आहे." - सारिका
" ओके मम्मा" - शर्वरी मागे जाऊन बसली. सारिका कार चालवत होती आणि सोहम तिच्या शेजारी पुढे बसला होता.
"काय सोहम, कसं चालू आहे?" - सारिका
" छान" - सोहम
"मग तू आज काल बोलत का नाहीस" - शर्वरी
" बोलतो तर आहे" - सोहम
"नाही सोहम, तू पहिल्या सारखा नाही बोलत आज काल, खूप शांत राहतोस" - शर्वरी
"---" - सोहम
"काही प्रोब्लेम आहे का सोहम, तुझं वर्गात सुद्धा लक्ष नसत आज काल" - सारिका
"नाही टीचर, मी ठीक आहे" - सोहम
"सोहम, शाळा आता सुटली आहे आणि आता मी तुझी टीचर नाही, मग तू बिंदास बोल काही असेल तर सांग" - सारिका
"----" - सोहम
"बरं जाऊ दे, शर्वरी मला बोलली तू खूप छान गोष्टी सांगतोस, तुझ्या आजोबांनी सांगितलेल्या. मला पण सांग न एखादी"
हे ऐकून सोहम जोरजोरात रडू लागला.
सारिका ने कार एका बाजूला घेतली. सोहम ला शांत केल. शर्वरी ने त्याला पाणी दिला. समोरच आइस -क्रीम च दुकान होतं. सारिका ने त्यांना आइस -क्रीम घेतली. आणि तिघे शर्वरीच्या घरी आले.
सोहमला सारिका ने बसवलं आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला विचारलं. आता पर्यंत सोहम सावरला होता.
"काकी, मला घरी नाही जायचं, मला आजी-आजोबांकडे जायचं आहे" - सोहम
"अरे पण तुझे आजी आजोबा तुमच्या सोबतचं राहतात न" - सारिका
"नाही काकी, राहत होते, पण आता नाही राहत" - सोहम
"सोहम, काय बोलतोस तू २-४ दिवसापूर्वीच मी तुझ्या घरी आले तेव्ह्या तर होते ते" - शर्वरी
"पण आता नाहीये" - सोहम
"सोहम, काय झालं, मला नीट सांग" - सारिका
"आई-बाबांनी आजी आजोबाना वृद्धाश्रमात टाकले आहे" - सोहम
"काssयss" - सारिका
"हो, आणि मला त्यांची खूप आठवण येते, मी नाही राहू शकत त्यांच्या शिवाय, मला आजी आजोबांसोबत च राहायचा आहे, Please काकी मला त्यांचा कडे घेऊन चला ना, please " - सोहम कळकळीने बोलत होता.

सोहम चे आई - वडील एका नामांकित कंपनी मध्ये उच्च पदावर कामाला होते. सोहम चे आजी - आजोबा हे जास्त शिकलेले नव्हते. सोहम चे आजोबा साधे कारकून होते. सोहमचे वडील राहुल हे एकुलते एकच होते. परिस्तिथी फारशी चांगली नव्हती. तरी आजी - आजोबांनी राहुल ला जीवाचा रान करून वाढवलं, मोठं केल. त्याच्या शिक्षणासाठी खूप खस्त्या खाल्या. प्रसंगी स्वत एका वेळच जेऊन त्यांनी राहुलच्या शिक्षणाच्या फ़ीस भरल्या. राहुल सुद्धा खूप हुशार होता. त्याने खूप शिक्षण घेतलं. आणि एका नामांकित कंपनी मध्ये नोकरीला लागला. हुशारी वर तो उच्च पदावर पोहोचला आणि कॉलेज मध्ये असताना प्रेम असलेल्या एका सुंदर, हुशार आणि श्रीमंत असलेल्या सायलीशी लग्न केलं. त्यांना सोहम झाला. सोहम हा सुद्ध्या राहुल - सायली चा एकटाच मुलगा होता. त्यांनी मुलाला फार प्रेमाने वाढवला पण ते ऑफिस ला असताना आजी-आजोबांनी त्याला मायेने सांभाळला. त्याचा वर चांगले संस्कार केले. दिवसभर आई -बाबा घरी नसल्याने सोहमला आजी - आजोबांचा लळा लागला. सोहम आजी - आजोबांशी खूप जवळचा होता. पण जस - जसे त्याच्या वडिलांना राहुल ला उच्च पद मिळू लागले तस तसे ते आपल्या आई - वडिलांशी लांब जाऊ लागले. त्यांना त्यांचा अशिक्षित आई - वडिलांची लाज वाटू लागली. आणि त्यात सायली हि एका श्रीमंत आणि उच्च शिक्षित कुटुंबातली असल्याने तिला तर तिचे सासू सासरे डाऊन-मार्केट वाटत होते. तिला त्यांची अडगळ वाटत होती. ती त्यांची सारखी अपमान करायची आणि राहुल सुद्धा काहीच बोलत नव्हता. पहिले पहिले त्याने तिला खूप समजावल. पण आता त्याला सुद्धा त्याचा हायक्लास सोसायटी मध्ये आई - वडील नको होते. तो आता त्यांना कचरा समजू लागला होता. त्याच्या डोक्यात जनारेशेन ग्यप चा फंडा होता. रोज राहुल आणि सायली त्यांना अपमानित करायचे, घालून पडून बोलायचे. त्यांना घर सोडणास प्रवृत्त कराचे. बिचारा सोहम हे बघून बावरून जायचं. त्याला खूप वाईट वाटायचे. पण तो लहान होता, बोलू शकत नव्हता. तो आपल्या आजी - आजोबांवर खूप प्रेम करायचा, त्यांना आई - बाबा काही बोलले कि नंतर त्यांच्या कडे जाऊन त्यांना हसवायचा, त्यांचा दुख कमी करण्याचा पर्यंत करायचा. सोहम मुळे आजी - आजोबा आपले सर्व दुख, मान-अपमान विसरायचे. पण आता सायली ला राहुलच्या आई-वडिलांचा जास्तच तिटकारा येऊ लागला. त्यात सोहम सोबत ची त्यांची नजदिकी, सोहम च त्यावर असलेलं प्रेम यामुळे तिने त्यांना वृद्धाश्रमात टाकण्याचा निर्णय घेतला. आणि राहुल ने हि तिला विरोध केलं नाही. सोहम यामुळे फार खचला, अबोल झाला.

सारिका एकच सोसायटीमध्ये राहत असल्याने राहुल आणि सायली ला चांगली ओळखत होती. त्यांची विचारसरणी तिला माहित होती. तिला राहुल-सायली च आजी -आजोबांसोबतच वागणं माहित होतं, तिने या बाबत सायलीला मैत्रीण आणि माणुसकी या दोन्ही नात्याने समजावण्याचा पर्यंत पण केला होता पण व्यर्थ. सायली ने आजी - आजोबाची रवानगी वृद्धाश्रमात केली या वर तिला जरासा धक्का बसला. तिला वाटलं सोहम साठी तरी सायली अस काही करणार नाही. सारिका ने सोहमला समजावून घरी पाठवलं आणि त्याला मदत करण्याचा वचन दिलं. सोहमला आता बरं वाटलं. त्याला सारिका टीचर वर विश्वास होता. तो निश्चित झाला.

सारिकाने या वर खुप विचार करत होती. तिला आजी -आजोबांसाठी फार वाईट वाटत होतं. शर्वरी चे वडील - सारिकाचा नवरा अतुल हा मानसतज्ञ होता. तिने त्याला सोहम च्या आजी-आजोबा बद्दल सांगितले.

दुसऱ्या दिवशी अतुल ने राहुलला फोन करून त्याचा कडे 'मुलांची पार्टी आहे तर सोहम ला घरी पाठव' असे सांगितले. त्यानुसार सोहम शर्वरी कडे आला. खरतर आजी-आजोबा नसल्याने त्याच पार्टी ला येण्याचं मनच नव्हतं पण सायली ला पार्टी वैगरे फार आवडायची म्हणून तिने त्याला जबरदस्ती पाठवलं होतं. सोहम शर्वरी च्या घरी आला आणि बघतो तर पार्टी वैगरे ची काहीच नव्हती. त्याने शर्वरी कडे या बाबत विचारणा केली तर अतुल ने 'एक surprise पार्टी असून बाहेर जायचा आहे' अस सांगितलं. चोघे हि निघाले.
एक खूप मोठा बंगल्या सारखा दिसणाया ठिकाणी अतुल ने गाडी पार्क केली. तिकडे खूप सारे आजी -आजोबा होते. कोणी बागेत फिरत होते, कोणी गप्पा मारत होते, कोणी काही काम करत होते तर कोणी नुसतेच बसले होते. पण तरी त्यांचे चेहरे उदास वाटत होते. अतुल ने सोहमला एका खोलीमध्ये नेले तिकडे त्याचे आजी -आजोबा सोहमच्या गोष्ठी आठवत बसले होते. आजी-आजोबांना बघताच सोहम हमसाहमशी रडू लागला. आजी-आजोबांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले, त्याला कुठे ठेऊ न कुठे नको असा झाला त्यांना. नंतर त्यांनी अतुल-सारिका चे आभार मानले. थोडा वेळ आजी-आजोबा सोबत मस्त मस्त गप्पा मारून चौघेही निघाले.
आज सोहम खूप खुश होता. बरेच दिवसांनी तो एवढा आनंदी दिसत होता.
"सोहम, तू तुझ्या आजी-आजोबांवर किती प्रेम करतोस" - अतुल
"खूप" - सोहम
"खूप म्हणजे किती?" - अतुल
"खूप म्हणजे खूप, भरपूर, सगळ्यात जास्त, आई-बाबांपेक्षा जास्त" - सोहम
"मग तुला त्यांच्या सोबत राहायला आवडेल?" - सारिका
"हो, मी आता सुद्ध्या त्याच्या सोबत वृध्श्रमात राहायला तयार आहे, मी त्यांच्या सोबत कुठेही राहायला तयार आहे" - सोहम
"सोहम, तू किती नशीबवान आहेस रे, जे तुला आजी-आजोबा आहेत" - शर्वरी
"नाही शर्वरी, मी मुळीच नशीबवान नाही, असते तर माझे आजी-आजोबा आमच्या सोबत राहत असते" - सोहम
"सोहम, अरे आयुष्यामध्ये सगळंच आपल्या मनानुसार नाही होत" - सारिका
"पण ते होण्यासाठी आपण पर्यंत करू शकतो" - अतुल
"या मध्ये आपण काय पर्यंत करणार अतुल, सायली काही माझं ऐकणार नाही, मागे पण मी तिला समजावण्याचा पर्यंत केला होता पण ती नाही समजू शकत" - सारिका
"सोहम, तुला खरच आजी-आजोबांसोबत राहायला आवडेल" - अतुल
"ऑफ - कोर्स काका" - अतुल
"मग तू त्या साठी काय करशील?" - अतुल
"मी काय करणार, माझं कोण ऐकेल" - सोहम
"हे बघ सोहम, तुला वाटलं तर तू खूप काही करू शकशील, आहेस का तयार" - अतुल
"मी माझ्या आजी-आजोबाना घरात आणण्यासाठी माझा जीव पण दयायला तयार आहे" - सोहम
"सोहम्म्म" - शर्वरी ओरडलीच
"सोहम, हे काय काही पण बोलतोस, अस बोलू नये बाळा" - सारिका
"हे बघ सोहम, मी आता तुला काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक" - अतुल
अतुलने सोहम ला काही गोष्टी नीट समजून सांगितल्या आणि त्या प्रमाणे करण्यास सांगितले. सोहम पहिले ते ऐकून थोडासा बावरला. पण आजी-आजोबांसाठी तो आता काहीही करणार होता, त्याने मनाची तयारी केली. अतुल काकांनी सांगितल्या प्रमाणे आता त्याला करायचा होत.

दुसऱ्या दिवशी सकाळी सायली सोहमच्या रूम मध्ये आली, तो झोपला होता, तिने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होती तेवढ्यात राहुल सुद्ध्या तिकडे आला. तो ही त्याचा गोंडस सोहम कडे बघत होता. दोघे झोपलेल्या सोहमचे कौतुक करत होते. त्यांच्या आवाजाने सोहमला जाग आली,
"काय आहे ओ, किती गप्पा मारता, तुमचा रूम मध्ये जाऊन नाही का बोलता येत तुम्हाला, सकाळी सकाळी झोप मोड केलीत माझी," - सोहम चिडचिड करत बोलला. दोघानापण धक्का बसला. सोहम आज पर्यंत अस कधीच बोलला नव्हता.
"सोहम, अरे गप्पा नव्हतो मारत. तुझेच कोड-कौतुक चालू होते" - सायली
"काय कटकट आहे, स्वतच्या खोलीमध्ये जाऊन करा काय ते कौतुक" - असा बोलून सोहम कुस बदलून झोपून गेला.
दोन आठवडे झाले होते तरी सायली-राहुल सोहम शी बोलले नव्हते, कारण दिवसभर ते ऑफिस मध्ये असायचे आणि जेव्हा घरी यायचे तेव्हा सोहम झोपलेला असायचा आणि जरी जागा असला तरी तो अभ्यासामध्ये गर्क असायचा. दोघे त्याच्याशी बोलायला गेले तरी तो त्यांना अभ्यासामध्ये व्यत्यय आणला म्हणून त्याच्यावर ओरडायचा, चिडचिड करायचा. रविवारी पण तो अभ्यास करायचा किवा बाहेर खेळायला निघून जायचा, जेवताना त्याच्याशी बोलालायला गेले तर 'जेवताना बोलणे हि खूप वाईट सवय आहे, काही कळता का तुम्हाला' असं काहीसं त्यांना तोडून बोलायचा. राहुल-सायली ला सोहमची फार काळजी वाटू लागली. त्याचा अश्या वागण्याने त्याच्या मनावर तणाव येऊ लागला.
सोहमचा वाढदिवस होता. सायली - राहुल ने खूप दिवसापासून सोहमच्या वाढदिवसासाठी बरयाच गोष्टी प्लान केल्या होत्या. रात्री बरोबर बारा वाजता राहुल-सायली सोहमच्या रूममध्ये आले त्याला शुभेच्या देण्यासाठी. पण तेव्हा सुद्ध्या सोहम झोप खराब केली म्हणून त्याच्या वर खूपच चिडला, तो त्यांना एवढा बोलला कि दोघांचा डोळ्यामध्ये पाणी आलं. तेवढ्यात शर्वरीचा फोन आलं सोहमला शुभेच्या देण्यासाठी. सोहम खूप खुश होऊन तिच्या सोबत बोलत होता, त्याने तिला एवढ्या रात्री शुभेच्या दिल्याबद्दल आभार मानले आणि सगळ्यात आधी तिनेच विश केल्याच सांगितलं. आपला एवढासा सहावीला असलेला मुलगा आतापासूनच आपल्याशी असा वागतो याचा त्यांना प्रचंड तणाव आला. वाढदिवसाच्या दिवशी सोहमला आजी-आजोबांची खूपच आठवण येत होती. दरवर्षी तो सकाळी उठल्यावर देवाच्या, आजी-आजोबांच्या, आई-वडिलांच्या पाया पडायचा. नंतर सगळे बाहेर फिरायला जायचे, राहुल-सायली त्याच्यासाठी खास सुट्टी घ्यायचे. खरतर सायलीला आजी-आजोबा त्यांच्या सोबत नको असायचे पण फक्त त्या दिवशी सोहमसाठी ती त्यांना सोबत घायला तयार व्हायची. संध्याकाळी झकास पैकी पार्टी असायची. आज हि सायली ने मस्त प्लान केला होता, पण सोहम ने त्यांच्या सोबत येण्यास नकार दिला. मित्रासोबत बाहेर जाणार असल्याचे सांगितले. राहुल-सायली ने त्याला आपण एकत्र जाऊया असे खूप समजावले. पण त्याने नाही ऐकले आणि तो बाहेर निघून गेला. या वर्षी सर्व काही बदल होतं, पहिल्यांदा असं झाला होतं कि सोहमच्या वाढदिवसाचा दिवशी ते सगळे एकत्र नव्हते. संध्याकाळी पार्टी होती. बरेच पाहुणे आले होते, सोहम साठी खूप मस्त केक राहुल ने आणला. पण सोहम ला तो मुळीच आवडला नाही, त्याने केक कापला तेव्ह्या सायली ने त्याचा गोड गोड पापा घेतला तर सोहम सगळ्यांसमोर खूप चिडला. पार्टी मध्ये हि तो शर्वरीच्या कुटुंबासोबतच जास्त होता. आई-वडिलांची दखलसुद्धा घेतली नाही.
राहुल-सायली सोहमच्या वागण्याने फार दुखी होते. अखेर दोघांनी सोहमशी बोलण्याचा निर्णय घेतला.

सोहम खेळून आला आणि सरळ रूमवर निघाला. राहुलने त्याला थांबण्यास सांगितले पण तो त्याकडे दुर्लक्ष करून तसच निघून गेला. आता खरच दोघे चिडले. ते सरळ सोहमच्या खोलीमध्ये गेले.
"तुम्हाला कितीवेळा सांगितला, क्नोक करून या म्हणून, आधी विचारायला काय होतं" - सोहम
"सोहम, तू कोणाशी बोलतोस कळत का तुला" - राहुल
"कळत, तुमच्याशी बोलतोय" - सोहम
"सोहम, हि पद्धत आहे का वडिलांशी बोलायची" - सायली
"वडीलच तर आहेत न त्यात काय झालं मग" - सोहम
राहुल ला काहीतरी जाणीव होता होती, त्याला बहुतेक समजायला लागला होतं. त्याचा चेहरा पडला. ते सोहमच्या अश्या वागण्याने नाही तर हे सर्व आधी झाला होतं म्हणून. राहुलच्या आई-वडिलांच्या बाबतीत. राहुल सेम असाच वागायचा त्याच्या आई-वडिलांसोबत.
"सोहम्म्म, तू काय बोलतोस कळत का तुला? होश मध्ये आहेस का? अरे, तुझं वय काय, तू बोलतोस काय?, अजून मिसरूड फुटल नाही तुला, आतच असा बोलतोस मग पुढे काय पांग फेडशील रे" - सायली चा तोल आता सुटला.
"आई, please पकाऊ नकोस ना मला, खूप बोर होतंय ग" - सोहम
"काय झालंय सोहम तुला, तू असा नव्हतास आधी, कोणी शिकवलं रे तुला असं बोलायला? हेच संस्कार केलेत का आम्ही तुझ्यावर" - सायली
"तुम्हीच तर शिकवलत, तुमचेच संस्कार आहेत माझ्यावर" - सोहम
"सोहम्म्म" - सायली ओरडली.
"बघितला ना मी कसे वागायचे बाबा त्यांच्या वडिलांशी, त्यांचाच मुलगा आहे ना मी, तसाच तर वागणार" - सोहम
राहुल कळूनचुकला होता. सायली सुद्धा जाणीव होऊ लागली.
सोहम रूम मधून बाहेर आला आणि हळूच त्याने अतुल काकांना फोन केला.
राहुल-सायली हताश होऊन बसले होते. काय बोलाव, काय कराव त्यांना समजत नव्हतं. तेवढ्यात अतुल आलाच. दोघांचे चेहरे उतरले होते. अतुल ने ' काय झालं?' अशी विचारणा केली पण दोघे थागापत्ता लागू देत नव्हते. अखेर अतुलने मूळ मुद्द्यालाच हात घातला.
"राहुल अरे बोल यार, खूप वर्ष ओळखतो मी तुला, आणि मी एक मानसतन्य आहे. सो मला समजत हे कोणाच्या मनात काय चालू आहे. तुमच्या चेहर्यावरूनच समजत आहे" - अतुल
राहुल आणि सायली ने त्याला सोहमच वागणं सांगितलं. सोहम हि तिकडेच बसला होता. तो गाल्यातल्या गालात हसत होता.
"अरे मग काय चुकीचा वागला रे तो" - अतुल
"अतुल, हे तू असा बोलतोस? अरे, शर्वरी अशी वागली तर चालेल तुला? आमच्यावर काय होत आहे ते आम्हालाच माहित, राहू दे तू या भानगडीतच पडू नकोस." - सायली तिरसटपणे बोलली.
"हेच तर, जेव्ह्या ज्याच्यावर परिस्थिती येते तेव्हाच त्याला समजत ....... त्यावर काय होत हे त्यालाच माहित नाही का? राहुलच्या आई-बाबांवर पण काय झालं ते त्यांचाच माहित, बरोबर न राहुल?"
"---" - राहुल वरमाला. त्याला त्याची चूक उमगली.
"म्हणजे काय म्हणायचा आहे तुला" - सायली
"हेच कि तुम्ही सुद्ध्या असच वागत होतात आई-बाबांशी." अतुल पुढे म्हणाला "मला एक सांग सायली तू एक चेंडू या समोरच्या भिंतीवर मारलास तर काय होईल?"
"तो चेंडू भिंतीवर आपटून पुन्हा माझ्याकडे येईल" - सायली निरागसपणे बोलली.
"ex-actually , आपण जे करू न तेच आपल्यकडे परत येत सायली, आपण जस वागू, बोलू तसच आपल्याला फेडावं लागतं, आपली मुल तेच आपल्या सोबत करतात. आज तुम्ही दोघ आई-बाबांशी वाईट वागलात, उद्या तुमची मुलं तुमच्याशी तसच वागणार"
"sorry " - आता सायली ला हि तिची चूक समजली.
"sorry अतुल, I am really very sorry , मी खरच खूप वाईट वागलो, मी असा कसा झालो ते माझं मलाच समजला नाही रे. पण खरच सोहम आता माझ्याशी जसा वागला मी पण तसच त्यांच्याशी वागायचो. त्यांची लाज वाटायची मला, मी त्यांचा सोबत बाहेर जायचो नाही, त्यांना टाळायचो. खरं तर मला माझी लाज वाटायला हवी. आता जेव्हा सोहमशी मला बरेच दिवस बोलायला मिळाला नाही तेव्हा मला समजलं, मला ते नकोसे वाटायचे म्हणून टाळायचो मी त्यांना. जेव्ह्या आता मी सोहम शी बोलण्यास तरसलो तेव्हा मला समजलं ते किती तरसले असतील, एकाच घरात राहून मी कित्येक दिवस त्यांना तोंड दाखवत नव्हतो. माझं कुटुंब जणू फक्त सायली आणि सोहमच होते. त्याचा विचार मी कधीच केला नाही. जेव्हा ते मला भेटायला यायचे, माझ्याशी बोलाव असं त्यांना वाटायचा तेव्हा मात्र मला ती कटकट वाटायची. मी खरच चुकलो" - राहुल बोलत बोलत रडत होता. सोहम ला फार वाईट वाटल त्याने एऊन राहुलचे अश्रू पुसले.
"राहुल, अरे मला काय sorry बोलतोस, बोलायचं असेल तर तुझ्या आई-बाबांना बोल. आणि एक सांगू राहुल, सायली, please राग मानून घेऊ नका, पण हे सर्व करण्यात माझाच हात होता, सोहम खूप गोड मुलगा आहे. तो असं वागला ते माझ्या सांगण्यावरून, मीच सांगितला त्याला असं वागायला, तुला जाणीव करून दयायला, असं वागणं खरच जरुरी होता अरे. मला माफ कर मित्रा. मला खरंच माफ करा - अतुल हात जोडून बोलला. राहुलने त्याने जोडलेल्या हातांवर हात ठेवला. आणि म्हणाला -
"यार आतुल, तू सच्चा मित्र आहेस आपला. तुला खरच धन्यवाद, तू फार मोठं माझं पाप माझ्या उघडकीस आणला आहे"
"मी खरं तर अपराधी आहे आई - बाबांची, माझ्यामुळेच राहुल असं वागला, खरतर मी प्रवृत्त केला त्याला......... राहुल, please मला आई-बाबांकडे घेऊन चल. मला त्यांची माफी मागायची आहे. खरतर मी त्यांना तोंड दाखवण्यास पण लायक नाही पण त्यांनी मला माफ केल्याशिवाय मला बरं नाही वाटणार" - सायली
अतुल ने दोघांना समजावले आणि त्यांनी आई-बाबांना घरी आणले. एवढं होऊन हि आई-बाबा मुळीच रागावले नाही. खरच त्याचं मन खूप मोठं होतं. आपल्या मुलाला आणि सुनेला चूक समजली म्हणून त्यांना फार आनंद झाला. आणि ते सर्व सुखाने राहू लागले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

कथा चांगली आहे, फक्त थोडे भाषे कडे, व्याकरणाकडे लक्ष असु द्या !
हिंदी शब्दांपेक्षा त्या त्या शब्दाला मराठी प्रतीशब्द वापरलात तर वाचताना रसभंग होणार नाही.
पु.ले.शु.

ह्यात जनरेशन गॅपचा काय संबंध आहे ?
एखाद्या गोष्टीचे कालपरत्वे संदर्भ बदलून, नंतरच्या पिढीत जन्मलेल्यांनी त्या गोष्टीचा वेगळ्या प्रकारे अर्थ लावण्याला जनरेशन गॅप म्हणता येईल. differences of outlook or opinion between people of different generations.

एखाद्याला वाईट वागवण्याला कधीपासून जनरेशन गॅप म्हणायला लागले?

<<<<हिंदी शब्दांपेक्षा त्या त्या शब्दाला मराठी प्रतीशब्द वापरलात तर वाचताना रसभंग होणार नाही.>>>>

अहो, असे लिहू नका. आजकाल मराठी चे वाचन कमी, हिंदी सिनेमे बघणे जास्त, नि शाळेत तर इंग्रजी माध्यमच. मराठी शब्द कुठून आठवणार? आयत्या वेळी हिंदी, इंग्रजी शब्दच आठवतात. तर असू दे. अशीच आपली भाषा. इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत आले की आपली भाषा समृद्ध होते म्हणतात. आमचे एक भारतातले नातेवाईक यांची मराठी तर इतकी समृद्ध झाली आहे की ते आमच्याशी नेहेमी इंग्रजीतूनच बोलतात. फार तर अधून मधून एखादा मराठी शब्द टाकतात.

<<<एक चेंडू या समोरच्या भिंतीवर मारलास तर काय होईल?
तो चेंडू भिंतीवर आपटून पुन्हा माझ्याकडे येईल>>>

Awakening The Gift of Happiness, with Sister Shivani
या प्रवचनात २५ जून रोजी न्यू जर्सीत हेच उदाहरण दिले होते.