पु. लं.चे "शांभवी एक घेणे"

Submitted by चीकू on 15 April, 2015 - 15:13

पु.लं.च्या गोळाबेरीज या पुस्तकात 'शांभवी, एक घेणे' हा एक नाट्यांश आहे. पहिल्यांदा वाचला तेव्हा त्याचा फारसा अर्थबोध झाला नाही. तो कुठल्यातरी दुसर्‍या नाटकावर आधारित आहे असे कळले. तर मग त्यासंबंधी कुणाला माहिती असल्यास सांगू शकाल का? किंवा नुसता अर्थ विशद करून सांगितला तरी चालेल. धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५० च्या दशकात पु. शि. रेगे यांचे 'माधवी, एक देणे' हे नाटक आले, त्याचे पुलंनी केलेले विडंबन म्हणजे 'शांभवी, एक घेणे'.
ते केवळ 'माधवी, एक देणे' चे विडंबन नाहीये, तर एकूणच पु.शि.रेगे यांच्या लेखन शैलीचेही विडंबन आहे. शिवाय यामधे 'नवकविता-सदृश मी ' वगैरे लिहिताना पुलंनी नवकाव्याची खिल्ली उडवली आहे. रेग्यांच्या काही कविता केवळ ६-७ शब्दांच्या आहेत, त्याचंही विडंबन आहे. शिवाय रेग्यांच्या 'पुष्क - पुष्क - पुष्कळा' चं 'स्पेश, स्पेशळा' किंवा 'शर्क शर्क शर्करिता' असं विडंबन.
शिवाय 'शांभवी' म्हणजे भांग म्हणून त्यासंदर्भानेही घुट्टक, वरंवंटिका, लोटिका वगैरे शब्द पु.शि. रेगेंच्या काव्यातले शब्द विडंबन करुन वापरले आहेत.
'त्रिधा राधा चा' पण संदर्भ आहे, पण नक्की काय ते पाहून सांगेन.

tridha radha ch vidamban 'godaachi vaaT' madhe ahe na?
Shambhavit ahe kahi tridha... baddal? Athavat nahiye

ही नवी माहिती मिळाली. "खुर्च्या" हेही एका खर्‍या पाश्चिमात्य नाटकाचे विडंबन आहे.

पण पु शिंची ' पुष्कळा ' ही कविता खरेच सुंदर आहे. कमीत कमी शब्दात प्रकट होणे हे पुशिंचे वैषिष्ट्यच होते...

त्यातली 'पुष्कळ पुष्कळ पुष्कळलेली तू ... ' एवढीच ओळ आता आठवतेय ...

खुर्च्या हे युजीन आयनेस्कोच्या चेअर्स नामक नाटकाचं विडंबन असण्यापेक्षा त्या नाटकाच्या मराठी रूपांतराचा जो प्रयोग विजया मेहता आणि इतरांनी केला होता त्याचं विडंबन आहे.
माझ्यामते पुलंच्या सर्वोत्कृष्ट लेखनापैकी एक आहे

धन्यवाद सर्वांना! बघू मिळालं तर 'माधवी एक देणे' नक्की वाचेन.

खुर्च्या एकदम झकास आहे. त्यातील 'निमकरांकडची डुकराच्या मांसाची तळलेली भजी' अजून आठवतात Happy आयनेस्कोच मूळ चेअर्स नाटक वाचले आहे, मराठी रूपांतर वाचले नाही.

शिवाय रेग्यांच्या 'पुष्क - पुष्क - पुष्कळा' चं 'स्पेश, स्पेशळा' किंवा 'शर्क शर्क शर्करिता' असं विडंबन.>>>

त्यात शेवटी 'एवढंच त्याला चिक्क् चिक्क चिक्कार झालं.' असं वाक्य आहे, तेही अशा प्रकारचं विडंबन आहे तर मग Happy

धन्यवाद रार! .. पु.शि. रेग्यांचे साहित्य कुठे ऑनलाईन उपलब्ध आहे का?

पु.शि. रेग्यांचे साहित्य कुठे ऑनलाईन उपलब्ध आहे का?

>>

हा शिंचा पु शि रेगा कोण हेच माहीत असण्याची मारामार , तर त्यांचे साहित्य अन ऑनलाईन ? तोबा तोबा..

तूर्त एवढे पहा..

http://kavitanchagaon.blogspot.in/2011/06/blog-post_23.html

http://tyaa-kavitaa.blogspot.in/2011/10/blog-post_5282.html

http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/3521.html?1137309406

पुष्कळा~ पु. शि.रेगे
~~~~~~~~~~~~
पुष्कळ अंग तुझं ,
पुष्कळ पुष्कळ मन ,
पुष्कळातली पुष्कळ तू,
पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी
बघताना किती डोळे पुष्कळ तुझे,
देतानां पुष-पुष्कळ ओठ,
बाहू गळ्यात पुष्कळ पुष्कळ,
पुष्कळ उर
पुष्कळाच तू, पुष-कळावंती,
पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी...

धन्यवाद रॉबिनहूड !!!!

त्यातली 'पक्षी जे झाडावर गाणे गातो' काही झेपली नाही Happy पुष्कळा आवडली. मला वाटतं त्रिधा राधा चा संदर्भ शांभवी मधे नक्की आहे, शांभवीच्या तोंडी 'त्या चषकातील मी राधा...युगानुयुगीची प्याऊ मी पेयपोष्..'असे काहीतरी शब्द आहेत Happy

अरे तुम्ही तर खजिनाच खुला केला राव Happy धन्यवाद!!

शांभवीचे संदर्भ आता हळू हळू लागत जातायंत !!! 'सुईच्या अग्रावरील मी एक बिंदू, जा जाऊन सांगा तिला, त्या हरित स्पेश स्पेशलीला' यातला काही अंश 'पोलाद' या रेग्यांच्या कवितेतला दिसतो आहे Happy

खुर्च्या बद्दल उल्लेख विजया मेहतांच्या आत्मचरित्रातही आहे. त्यातले नरु (माधव वाटवे) आणि ननु(विजया मेह्ता) आहेत हे कळल्यावर परत एकदा वाचले..आधीपेक्षा जास्त मजा आली.
पुल..मिस यु सो मच! Sad

.

'गोदूची वाट' हे वेटींग फॉर गोदो चे विडंबन आहे ना?
'खुरच्या' अत्यंत महान प्रकार आहे; बाई आडनावात गेली !!!!

माझ्यामते पुलंच्या सर्वोत्कृष्ट लेखनापैकी एक आहे >> +१ 'भिंत पिवळी आहे' ह्या त्याच्या आस पास जाउ शकणारा प्रकार.

Proud
पण तरी बाप जनोबा, रविवारची काकडआरती, निमकराकडची डुकराच्या मांसाची तळलेली भजी, चिराबाजारातून जात असताना पडणारं बर्फ याची सर कश्शा कश्शाला म्हणून नाही - अपवाद 'गाळीव इतिहास'. भिंत पिवळी चा नंबर या दोन्ही नंतरच हां

पण तरी बाप जनोबा, रविवारची काकडआरती, निमकराकडची डुकराच्या मांसाची तळलेली भजी, चिराबाजारातून जात असताना पडणारं बर्फ याची सर कश्शा कश्शाला म्हणून नाही - अपवाद 'गाळीव इतिहास'. भिंत पिवळी चा नंबर या दोन्ही नंतरच हां >>>>>> +१११११११११

शांभवी काल परत वाचले. आता संदर्भ समजल्याने जबरी मजा आली Happy घुट्ट्क, पट्टिका, वस्त्रिका, लोटिका, वरवंटिका...काय वाट्टेल ती नावे आहेत !!!