अभंग

Submitted by भागवत on 2 May, 2015 - 06:17

माझ्या वडिलांनी बरेच अभंग लिहून छोटे पुस्तक छापले आहे. त्या पैकी काही इथे देत आहे .

१. भेटीची आस मोठी जिवाला !
कधी भेटीशी पांडुरंगा मला !!१!!
रात्रंदिवस जीव तळमळत आहे !
काही केल्या अुगी न राहे !! २! !
काय वृत करु कोणती साधने !
मन स्थिरावेल काय ती विधाने ! ! ३! !
संकल्प केला सिद्धि न जाये !
मनासारखे काही न होये ! ! ४! !
अंतःकरणातुनी पाचारीतो तूला !
लवकरी येई बा विठ्ठला ! ! ५! !
विठ्ठल दासा लागली तळमळ !
पांडुरंग भेटला गेली मळमळ ! ! ६!!

२. पूर्ण माझे मनोरथ झाले ! कामही सिद्धि गेले ! ! १! !
जे जे द्रुष्टी पड़े ! ते ते दिसे राम रुपडे ! ! २! !
इच्छा केली ते पावले ! हरी भजनी उद्धरलो ! ! ३! !
विठ्ठलदास म्हणे देवा ! घेई माझी भोळी सेवा ! ! ४! !

३. धाव पाव गे माझे आई ! पांडुरंगे विठाबाई ! ! १! !
एक सलगीची विनवणी ! घ्यावी विनंती माझी ऐकुणी ! ! २! !
दुःखाचे पर्वत पडो ! परी तुझे स्मरण घडो ! ! ३! !
वरी आभाळ कोसळो ! परी स्मरणे राम मिळो ! ! ४! !
विठ्ठलदास म्हणे स्मरणा विना ! क्षण ही न जावो म्हणा ! ! ५! !

Group content visibility: 
Public - accessible to all site users