त्याच्यापुढं बऱ्याचदा दोन प्रश्र्न असतात.
एक म्हणजे उद्याचं काय? आणि दुसरा म्हणजे पुढं काय?
उद्याचे प्रश्र्न अर्थातच सोपे असल्यामुळे तो बहुतेक वेळेस त्यांनाच चिकटतो...त्यामुळं त्याला काहीतरी केल्यासारखं वाटतं... किंवा अस्तित्वाला तात्पुरता अर्थ वगैरे मिळतो असं वाटत असेल कदाचित...
आता तुम्ही म्हणाल की हा अॅप्रोच काही बरोबर नाही..
तर ते असूच द्या... कारण आपल्याला काय करायचंय? हो की नाही??
।। श्री गणेशाय नमः ।।
गणपती बाप्पा मोरया
ब गट प्रवेशिका
सदस्यनाम : दियु

माझा जन्म ९८ चा असल्याने मला नाटकांचा सुवर्ण काळ अनुभवता आला नाही.
मी आठवीत असताना पहीलं-वहीलं नाटक पाहीलं!
"कट्यार काळजात घुसली" -- राहुल देशपांडे आणि टीम.
तुम्ही कोणती-ना-कोणती नाटके पाहिली असतीलच की
या काही तरी सांगा तुम्ही अनुभवलेले डॉक्टर घाणेकर, राजा परांजपे, यशवंत दत्त इत्यादी इत्यादी
तसेच मुरलेली संगीत नाटके आणि संगीत नाटकातील मुरलेले कलाकार यांबद्दल प्लीज सांगा प्लीज
"विनंती!"
तुम्ही बघितलेली नाटके , त्यातील कलाकार
इंग्रजी वा हिंदी नाटकांबद्दल लिहीलत तरी चालेल.
*वेल्हाळ*
मन झाकोळ झाकोळ
मन आभाळ आभाळ
चारी दिशा झाल्या बंद
मन नको ते वेल्हाळ
समीर ही शांत शांत
पानातून ध्वनी मंद
उन पडले उदास
मन कसे ते बेधुंद
पान पान ही हलेना
पानगळ ती दिसेना
दार खिडकीची फट
मन जड सोसवेना
मुले बांधली घरात
आई रांधते सतत
शाळा मैदानाला सुट्टी
मन गुंतले संकटात
बाबाचे ही काम घरी
आई बाईचेही काम करी
किती टीव्ही कॉम्प्युटर
मन लागेना घरीदारी
आला म्हणे राक्षस जुना
बिन चेहऱ्याचा कोरोना
घरी उगी रहा शांत
मन मनास मानेना
फ्रान्सकडून भारतीय हवाईदलासाठी अत्याधुनिक 36 ‘रफाल’ लढाऊ विमाने खरेदी केली जात आहेत. तत्संबंधीचा करार दोन्ही देशांदरम्यान सप्टेंबर 2016 मध्ये झाला होता. त्यापैकी पहिली काही विमाने जुलै 2020 च्या अखेरीस भारतात दाखल होणार आहेत. त्याआधी भारतीय हवाईदलाच्या गरजांनुरुप फ्रान्समध्येच घडवल्या गेलेल्या ‘रफाल’वर गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लढाऊ वैमानिक, तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना आवश्यक ते संपूर्ण प्रशिक्षण दिले गेले आहे.
*इतना तो याद है मुझे* ---
'धावत्या मनाची थोडी मजा घेण्याची एक टेक्निक आहे.'
'ते असू दे... पण हे मन वगैरे म्हणजे जरा जास्तच झालं..!'
'उगाच फाटे फोडू नकोस.. माझा सांगायचा मूड झालाय.. ऐक चूपचाप..'
'हम्म.. सांग आता न् मग काय ..!'
तर तुझ्या डोक्यात तुझ्या नकळत, सतत काही ना काही 'विचार' चाललेले असतात, ते विचार म्हणजेच तुझं मन वगैरे आहे, असं समजून चालूया थोडा वेळ..
एरव्ही रूटीनमध्ये गळ्यापर्यंत बुडून गेलेला असतोस,
तेव्हा हे विचार ऐकू येत नाहीत, कारण त्यावेळी तू त्यांना काही भाव देण्याच्या मूडमध्ये, स्थितीमध्ये नसतोस.