मुक्तस्रोत(Open Source)

मनोरंजनासाठी आणखी काय करावें?

Submitted by सुर्या--- on 5 May, 2021 - 02:01

सर्वच वयोगटांत आणि क्षेत्रांत अशी एक वेळ येते जेव्हा तोच तो पणा मुळे आयुष्य कंटाळवाणे वाटू लागतें. अश्या वेळेस आयुष्यातून हरवलेला आनंद म्हणा अथवा उत्साह निर्माण व्हावा यासाठी कोणकोणत्या मनोरंजनात्मक गोष्टी करता येऊ शकतात याबद्दल प्रतिक्रिया येऊ द्या....

नाती !

Submitted by Swati Karve on 23 April, 2021 - 05:38

नाती !

नाती... मनात सतत
रुंजी घालणारी...

नाती...मनाला
गारवा देणारी...

नाती...उत्कट ओढ
निर्माण करणारी....

नाती...मनाला
हुरहूर लावणारी...

नाती...आयुष्यात सप्तरंगी
इंद्रधनुष्य घेऊन येणारी...

नाती ... आयुष्याचा
बेरंग करणारी...

नाती ... सुख
ओरबाडून घेणारी...

नाती... माणसं
घडवणारी...

नाती... माणुसकी
जपणारी...

नाती...मनाला
भुरळ घालणारी...

नाती...अगदी अनपेक्षितपणे
शुष्क होत जाणारी...

शब्दखुणा: 

अंतरीच्या गहिऱ्या गुहेतून

Submitted by अस्मिता. on 27 February, 2021 - 18:49

अंतरीच्या गहिऱ्या गुहेतून

तुझं माझं नातं...

Submitted by Swati Karve on 22 February, 2021 - 12:26

तुझं माझं नातं...

तुझं माझं नातं,
कधी एखाद्या डोहा प्रमाणे,
स्थिर, शांत, गंभीर...
कधी एखाद्या नदी सारखं अवखळ,
पण तेवढंच प्रांजळ आणी निखळ.
कधी स्फटिकासारखं, पारदर्शी, नितळ
तर कधी अगदी स्पष्ट, रोखठोक, सरळ...

कधी मनात अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या,
धुक्यातल्या नागमोड्या पायवाटी सारखं.
तर कधी सूर्य मावळतीला आलेला असताना,
मनाला अनामीक हुरहुर लावणाऱ्या,
त्या कातरवेळी सारखं.

सुख नावाचे मृगजळ !

Submitted by Swati Karve on 22 February, 2021 - 03:27

जगण्याच्या शर्यतीत चालु असलेली
धावपळ, दग दग, ओढाताण
कधी कधी खूप असह्य होते...
मनातला विचारांचा कोलाहल,
ती तगमग जीव पार
पिळवटून काढते...
अश्या वेळी वाटतं,
नको ते विचार,
म्हणजे विचारांची दिशा
चुकण्याचा प्रश्नच नाही.
नको त्या भावना,
म्हणजे भावना दुखावल्या
जाण्याचा प्रश्न नाही.
नको ती स्वप्नं,
म्हणजे स्वप्नभंग
होण्याचा प्रश्न नाही.
नको ती आशा, ते प्रयत्न,
म्हणजे पदरी निराशा,
अपयश येण्याचा प्रश्न नाही.
मनी असावा एक विरक्त,
निर्विकार, स्थितप्रज्ञ भाव...

...लढतं राहणं सोडायचं नाही!

Submitted by Swati Karve on 8 February, 2021 - 03:45

...लढतं राहणं सोडायचं नाही!

काय सांगू तुम्हाला
मी आणि परिस्थिती
आमचं कधीच जमत नाही…
पण मी मात्र पक्क ठरवलंय
घेतला वसा टाकायचा नाही
काहीही झालं तरीही
लढत राहणं सोडायचं नाही.

कधी कर्तृत्व सिद्ध करायला
योग्य संधीच मिळत नाही
कधी अपार कष्ट करून ही
त्याचं चीझ होतं नाही
किती हि मोठे अडचणींचे
डोंगर दिसतं असले तरीही
मी मात्र महत्वाकांक्षेची
ज्योत विझू देत नाही
कारण मी पक्क ठरवलंय
घेतला वसा टाकायचा नाही
काहीही झालं तरीही
लढत राहणं सोडायचं नाही.

खरा सेल्फी...!

Submitted by Swati Karve on 3 February, 2021 - 12:41

खरा सेल्फी...!

आज सकाळी नेहमी येतात त्याप्रमाणे अनेक गुड मॉर्निंग चे मेसेजेस आले, पण त्यातला एक मेसेज खरंच विचार करायला लावणारा होता.

"खरा सेल्फी म्हणजे आपल्या अंतरंगाचा सेल्फी".

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मुक्तस्रोत(Open Source)