Submitted by स्मितस्वप्न on 6 August, 2020 - 07:14
आज सोने 55,500 आणि चांदी 74000 च्या घरात गेली आहे, जी आता सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे.
मला हे विचारायचे आहे की आता अधिक महिना, मग दिवाळी या पार्श्वभूमीवर सोने चांदी कमी होईल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी तज्ञ नाही , पण माझ्या मते
मी तज्ञ नाही , पण माझ्या मते कमी नाही होणार. इतक्यात नाहीच.
लवकरच कमी होईल. आता सोनं हायर
लवकरच कमी होईल. आता सोनं हायर हाय मारत वर जातंय. जेव्हा कोणत्याही गोष्टीचा भाव 90% ने वर जातो तेव्हा त्यात रिट्रेसमेंट नक्की येते आणि तेव्हाचा हाय लवकर ब्रेक नाही होत. सोन्याचा भाव लवकरच खाली येईल आणि जेव्हा भाव खाली तेव्हा जो हाय असेल तो बरेच दिवस ब्रेक नाही होणार. अर्थात हा माझा अंदाज जो चुकीचाही असू शकतो.

बोकलत तुमच्याशी सहमत.
बोकलत तुमच्याशी सहमत. जानेवारी १९३४ मध्ये हाय किंमतीवरुन खाली आला तेव्हा ती किंमत येण्यासाठी ४० वर्ष लागली तसेच. १९८० मध्ये २० पेक्षा जास्त वर्ष . हा चार्ट बघा.
https://www.macrotrends.net/1333/historical-gold-prices-100-year-chart
सोने inflation कव्हर करायला पाहिजे . पन सध्या पॅनिक खरेदीमुळे वाढत आहे . कालांतराने कमी येईल. किती वर जाईल हे नाही सांगु शकत पण जेवढे जास्त वर जाईल तेवढे जास्त वर्ष पिक किंमतीच्या खाली राहिल
हा सगळा डेटा अमेरिकी डॉलर नुसार आहे .
जागतिक पातळीवर सोन्याकडे
जागतिक पातळीवर सोन्याकडे प्रमुखपणे गुंतवणूक म्हणूनच बघितले जाते. त्यामुळे ढासळत असल्यास सेफ गुंतवणूक म्हणून इतर ठिकाणांहून काढून ती सोन्यात केली जाते आणि सोन्याची किंमत वाढते.
सध्याच्या काळात जोपर्यंत इकॉनॉमी मधील अनिश्चितता कायम आहे तोपर्यंत सोने वर जाईल किंवा स्थिर राहील. अर्थव्यवस्था वाढायला सुरवात झाली आणि ती वाढ टिकू शकेल हा विश्वास दृढ होऊ लागला की सोन्यामधली गुंतवणूक काढली जाईल आणि सोने खाली येईल.
माझ्या मते नजीकच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था वाढेल आणि ती वाढ टिकून राहील हा विश्वास यायला काही महिन्यांचा काळ जाईल त्यामुळे पुढील काही महिने सोने खाली येण्याची शक्यता कमीच आहे.
तसं असेल तर आहे ते सोनं
तसं असेल तर आहे ते सोनं विकायला हवं का सद्ध्या? हवं तर नंतर परत घेता येईल की.
आहे ते सोनं विकायला हवं का
आहे ते सोनं विकायला हवं का सद्ध्या>>>>>> मलाही हाच विचार आला होता.फक्त सोने परत घ्यायचे नाही.नवर्याने बघू करून विचार उडवला.
कोणत्याही गोष्टीचा भाव 90% ने
कोणत्याही गोष्टीचा भाव 90% ने वर जातो>>> मला 90° म्हणायचं होतं.
मी पण सोने विकायचा विषय काढला
मी पण सोने विकायचा विषय काढला..नवऱ्याकडे तर नाही म्हणाला..मला पण पटले ते.. जितक्या सहजपणे आपण shares घेतो ना तितक्या सहजपणे सोने नाही घेत..भावनिक गुंतागुंत..आणि सोने खाली म्हणजे पुन्हा ४० पर्यंत तरी येत नाही.. जे lockdown च्या आधी होते..2018 मध्ये ३१ होते आणि २०१९ मध्ये ३५ झाले आणि २०२० मध्ये ४० lockdown आधी ४० होते.. raw असेल तर विकायला काही हरकत नाही असे मला वाटते.. म्हणजे मी raw घेऊन ठेवले आहे.. BOI कडून..
सोन्याच्या आणि चांदी च्या
सोन्याच्या आणि चांदी च्या भावात करेक्शन येत आहे, असे वाटत आहे, काल रशियाने लस आणण्याची घोषणा केली त्याचा परिणाम दिसत आहे का, काल आणि आज सोन्या चांदीच्या भावात चांगली गिरावट आली आहे