वादळ !

Submitted by Swati Karve on 25 June, 2020 - 23:11

वादळ !
वादळ म्हणजे, त्याचा तो वेग,
ते भीतीदायक रौद्र रूप,
वादळाची बेभान बेताल वृत्ती
उन्मळून पडलेली झाडा,
उन्मळून पडलेली मनं,
विषिन्न करणारा तो विध्वंस,
आणि मनात घर करून राहिलेली
ती विनाशकारी शक्ती !
वादळाने झालेली हानि , ते नुकसान
पार खचून टाकणारा असतं सारं,
पण वादळाच्या त्या भयाण रात्री,
क्षणभरासाठी झालेल्या
विजांच्या लखलखाटात,
अगदी अनपेक्षित पणे घडतो
काही दिव्या गोष्टींचा साक्षात्कार,
हे हि तितकचं खरं.
वादळ वयक्तिक आयुष्यातले असो ,
वा कोपलेल्या निसर्गदेवतेचे
वादळाला समोरं जाताना,
बऱ्याच जणांशी संपर्क तुटतो,
बरेच लोक दुरावतात,
काही जण त्या वेळीही नेटाने साथ करतात
काही अनोळखी लोक अनपेक्षित पणे जवळ येतात,
मग जवळचे कोण, परके कोण,
जवळचे असल्यासारखे दाखवणारे कोण,
आणि प्रत्यक्षात दूर असूनही,
मनाने खऱ्या अर्थाने जोडले गेलेले कोण,
या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात.
वादळाचा तो कठीण काळ संपतो
मागे राहतात नेस्तनाभूत झालेली आयुष्य
हताश, उध्वस्त मनं
आणि पार कोलमडून गेलेला
माणसाचा बिनबुडाचा अहंकार.
शेवटी निर्माण करणारा हि तोच,
होत्याचं नव्हतं करणारा हि तोच
आणि जाळून गेलेल्या स्वप्नांच्या राखेतून,
पुन्हा भरारी घयायला प्रेरणा देणारा हि तोच
चराचरातुन प्रकट होणारा, तो निर्गुण निराकार.
जशी रात्र संपल्यावर सुंदर पहाट होते,
तशीच तिमिराच्या गर्भात असलेली
तेजाकडे नेणारी वाट साद घालू लागते.
भंगलेल्या स्वप्नात, उध्वस्त झालेल्या मनात,
पुन्हा नव्याने डाव मांडण्याचे बीज मूळ धरू लागते.
विश्वाचा हा पसारा, त्या निर्मात्याने मांडलेला डाव,
आपण मात्र आपले प्राक्तन निमूटपणे स्वीकारून
सोसत राहायचे त्याने दिलेले सर्व घाव.
कितीहि अपूर्णत्व आपल्या वाट्याला आले तरीही
मनि असू द्यावा स्वतःवरचा धृढ विश्वास
आणि त्या विधात्याबद्दल चा समर्पण भाव
अपूर्णत्वात पूर्णत्व शोधात राहण्याचा
वेडा ध्यास उरी बाळगून
अविरतपणे चालत राहणे
याला जीवन ऐसे नाव !
- स्वाती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users