बदल --- लघुकथा ----जयनीत दीक्षित

Submitted by जयनीत on 1 July, 2011 - 01:08

नारायण! नारायण!! नारदमुनी प्रवेश करते झाले.
या मुनीश्रेष्ठ या! काय हालहवाल आहे पृथ्वीतला वरचा? ब्रम्हदेव म्हणाले.
अहो आश्चर्यम्! खलु आश्चर्यम्!! नारदमुनी म्हणाले!
विराजमान व्हा, अन जरा विस्ताराने सांगा मुनीवर! कसले आश्चर्य? ब्रम्हदेव म्हणाले.
फार थोडया काळात खूपच बदल घडला आहे पृथ्वी वर देव. नारद मुनी म्हणाले.
कसला? ब्रम्हदेवांनी विचारले.
काही काळा पूर्वी तेथे सर्वत्र राजेशाही होती ह्यावर विश्वासच बसत नाही देव, आता तिथे सगळीकडे लोकशाहीचा बोलबाला आहे. नारद मुनी म्हणाले.
असं! मग? ब्रम्हदेव म्हणाले.
ह्या लोकशाही बद्दल सर्वत्र फार गोड गोड बोलल्या जाते आणि फार छान सुंदर सुंदर लिहिल्या जाते. नारदमुनी म्हणाले.
अस्सं! पण तुम्ही तेथे प्रत्यक्षात काय बघितले ते सांगा मुनीवर. ब्रम्हदेव म्हणाले.
हं! नारदमुनी खाकरले आणि म्हणाले, जे काही ऐकलं आणि जे वास्तवात बघितलं त्यात मात्र पुष्कळंच फरक दीसला देव, जरी लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य असे म्हटले जाते तरी तेथे प्रत्यक्षात मात्र मंत्री, अधिकारी आणि धनिक अशा फार थोडया लोकांचेच राज्य आहे.
बम्हदेव म्हणाले, म्हणजे सगळे काही पुर्वी सारखेच ना? मग कोणता बदल झाला म्हणताय मुनीश्रेष्ठ? आणी तुम्ही ज्या लोकशाही बद्दल बोलताय माहित आहे या बद्दल ही माहिती आहे आम्हाला पुर्वीपासुनच. जेव्हा ती आली तेव्हा आम्हाला ही अतिशय आनंद झाला होता. फार फार बदलाची अपेक्षा होती आमची ही तिच्या कडुन. अगदी तुमच्या सारखेच उत्तेजीत झालो होतो आम्ही. पण थोडया फार फेरफारा शिवाय जास्त काहीच हाताला लागलं नाही. हळुहळु आम्हाला त्यातली मेख लक्षात आली की साधन संपत्त्ती ज्याच्या हाती व्यवस्था त्याच्याच हाती मग ती राजेशाही असो की लोकशाही.
तुमच्या उत्साहा मागचे प्रेम आणि कळकळ आम्हाला कळते मुनीवर. बदल बघायला तुम्ही किती उत्सुक आहात ते ही आम्हाला ठाउक आहे. तुम्ही एकटेच नाही, आम्हीही किती तरी काळापासुन ह्या बदलाची तितक्याच आतुरतेनी वाट बघत आहोत. म्हणुनच तुमची उत्तेजना आणि उत्साह बघून आम्हालाही वाटलं की तिथे खरोखरीच काही मुलभूत बदल घडला की काय?
नारद मुनी गप्प होते.
असे गंभीर का झालात मुनीवर? असे निराश होउ नका. येइल तो दीवस ही येईल कधीतरी. ब्रम्ह्देव म्हणाले.
चला आता जरा हसा आणि आता म्हणा बरं तुमचे ते नारायण! नारायण!!
(समाप्त)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्तच ...अगदी बरोबर्...लोकशाहिच्या नावाखाली नेते आपली मनमानी करत आहेत....