कल्चरल उदात्तीकरण

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बदमाश टिव्ही ची स्फुटके अधुनमधुन येत असतात. आजही एक असेच स्फोटक आले. त्यात त्यांच्या इतक्यातल्या प्रसिद्धीबद्दलचा एक दुवा होता. ईंडीया करंट्स वरील त्या दुव्यावर त्यांच्यासारख्याच इतर उपक्रमांबद्दलची माहिती होती. अनेकांना आक्षेपार्ह, काहींना त्याज्य तर उरलेल्यांना चलता है वाटेल असा हा प्रकार आहे. संस्कृतीला अधीक पाय फुटुन जास्त ठिकाणी पोचता येईल म्हणुन का होईना मी त्या शेवटच्या प्रकारात मोडतो.

http://www.indiacurrents.com/news/view_article.html?article_id=f0c5d2e0c...

वर विषय द्यावा लागतो. त्या यादितील होमिओपदी योग्य वाटले. तुमचा त्यावर विश्वास असेल तर कधीकधी त्या मुळेच तुम्ही बरे होता. पण त्यापासुन अपाय व्हायची शक्यता नसते (खरे औषध न घेतल्याने मात्र परिस्थीती चिघळु शकते). तसेच या प्रकाराचे आहे. मजा म्हणुन घ्या, त्या लोकांचे व्यक्तिस्वातंत्र्य म्हणुन सोडुन द्या. नाहीतर स्वतःच घडवाल रामायण.

बाकी चोपराचा कुलदिपक असे करतो तरीही लोकांचा विश्वास अढळ राहतो म्हणजेच बहुदा कुणाचे कुणावर अवलंबुन नसते असेच असावे.

प्रकार: 
शब्दखुणा: