अरभाट निर्मिती

'हायवे'च्या निमित्ताने श्री. उमेश विनायक कुलकर्णी यांच्याशी संवाद

Submitted by माध्यम_प्रायोजक on 24 August, 2015 - 23:42

’वळू’, ’विहीर’, देऊळ’ या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचं दिग्दर्शन करणार्‍या श्री. उमेश विनायक कुलकर्णी यांचा ’हायवे - एक सेल्फी आरपार’ हा नवा चित्रपट २८ ऑगस्ट, २०१५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.

त्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद -

umesh-renuka.jpg

’हायवे’च्या प्रवासाबद्दल सांगशील का?

'हायवे'च्या निमित्ताने श्री. गिरीश कुलकर्णी यांच्याशी संवाद

Submitted by माध्यम_प्रायोजक on 19 August, 2015 - 23:43

एक उत्तम लेखक व तितकाच दर्जेदार अभिनेता म्हणून गिरीश पांडुरंग कुलकर्णी हे नाव सुपरिचित आहे. भूमिकेत जीव ओतून काम करणारा एक प्रगल्भ अभिनेता, अशी त्यांची ओळख आहे. 'गिरणी', ’विलय’ हे लघुपट, तसंच ’वळू’, ’देऊळ’, ’विहीर’, ’मसाला’ या चित्रपटांचे पटकथा व संवाद गिरीश कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. ’गिरणी’, ’गारुड’ अशा अनेक लघुपटांतून, व 'वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', ’गंध', ’बाधा’, ’रेस्टॉरंट’, ’मसाला’, 'पुणे ५२', 'अग्ली' या चित्रपटांतून त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहेत. 'गिरणी' या त्यांनी लिहिलेल्या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा राष्टीय पुरस्कार मिळाला होता.

'हायवे'ची एक झलक

Submitted by माध्यम_प्रायोजक on 19 August, 2015 - 23:22

उमेश कुलकर्णी दिग्दर्शित व गिरीश कुलकर्णी लिखित 'हायवे - एक सेल्फी आरपार' हा चित्रपट २८ ऑगस्ट, २०१५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची एक झलक -

https://www.youtube.com/watch?v=Y9gXY7NWA94&list=PL4TAIRjzaGTkDxjqbfr7qI...

'हायवे' - कथा ओळखा स्पर्धेत भाग घ्या आणि मिळवा या चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहण्याची संधी!!!

banner_hoarding_02_16x9_ft_theme_03.jpg

'हायवे' - कथा ओळखा स्पर्धा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 11 August, 2015 - 23:35

'पंचवीस-सव्वीस वर्षांच्या सनीचे सख्खे वडील आलोकनाथ यांना अजून एक लहान आठदहा वर्षांचा मुलगा असतो. उतारवयात झालेला असल्याने तो शेंडेफळ आणि सनी जुर्राटला नडल्यामुळे नेमकं त्याचंच अपहरण करून अजगर जुर्राट त्याला मारून टाकतो. याच कारणामुळे आलोकनाथ सनीला घराबाहेर काढतात आणि हा पहाडासारखा माणूस पहाडात राहायला जातो. भारतात काळे धंदे, खून, मारामारी इत्यादी करणारे जुर्राट कुटुंबीय केनयात मात्र इज्जतदार शेहेरी असतात. अजगर जुर्राट, नागदंश जुर्राट अशी नावं असूनही! सोनिया अशा निरुपद्रवी नावाची मुलगीही असते अजगराची. तिचं लग्न ठरलेलं असतं तपस्वी गुंजाल नावाच्या माणसाशी.

'हायवे'च्या निमित्ताने श्री. सुनील बर्वे यांच्याशी गप्पा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 8 July, 2015 - 16:14

'हायवे' हा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित व गिरीश कुलकर्णी लिखित मराठी चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. श्री. सुनील बर्वे यांची या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका आहे. 'आत्मविश्वास', 'लपंडाव', 'अस्तित्व', 'आई', 'आनंदाचं झाड', 'तू तिथं मी', 'निदान' अशा गाजलेल्या चित्रपटांमधून, अनेक टीव्हा मालिकांमधून आणि नाटकांमधून गेली पंचवीस वर्षं त्यांचा अभिनय वाखाणला गेला आहे.

'हायवे'च्या प्रदर्शनानिमित्त श्री. सुनील बर्वे यांच्याशी साधलेला संवाद -

Highway Stills 1.jpg

'हायवे - एक Selfie आरपार...!' - ट्रेलर व ओळख

Submitted by माध्यम_प्रायोजक on 3 July, 2015 - 05:00

खूप हव्याहव्याशा वाटणार्‍या आणि आपल्याला आपलं आजचं प्रतिबिंब दाखवणार्‍या प्रवासाची गोष्ट म्हणजे 'हायवे - एक selfie आरपार...!' हा चित्रपट.

'वळू', 'विहीर', 'देऊळ' या अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांत झळकलेल्या व पारितोषिकप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी आणि लेखक गिरीश पांडुरंग कुलकर्णी सादर करत आहेत, अरभाट निर्मिती व खरपूस फिल्म्स कृत 'हायवे - एक selfie आरपार...!'

Highway.jpg

दिग्दर्शन - उमेश विनायक कुलकर्णी
लेखन - गिरीश पांडुरंग कुलकर्णी

'काय बदललं?'

Submitted by माध्यम_प्रायोजक on 26 December, 2012 - 23:29

१९९२ साली भारतात सुरु झालेल्या जागतिकीकरणानं बाजाराचं व्याकरण बदलून टाकलं. 'गोष्टी जपून वापरा, पिढ्यान् पिढ्या टिकवा' ही शिकवण मागे पडून 'अधिक खरेदी करा, वापरा आणि फेकून द्या' या मूल्यानं भारतीयांच्या मानसिकतेत शिरकाव केला. परदेशी ब्रँडदेखील सुलभतेनं मिळू लागले तसं साहजिकच एकेका गाडीसाठी सहा महिन्यांच्या प्रतीक्षायादीचे किस्से जुनेपुराणे वाटू लागले.

डालड्याचा पिवळा डबा, चेतकची स्कूटर, बोटांनी गोलगोल फिरवत डायल करायचा टेलिफोन ते आजच्या स्टायलिश चारचाकी गाड्या, आयफोन या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. बाजारव्यवस्था बदलली, तसे नातेसंबंध बदलले, आपली परस्परांतली वागणूकही बदलली.

Subscribe to RSS - अरभाट निर्मिती