जोश

Submitted by आर्त on 21 March, 2021 - 16:02

पुन्हा जोश आला, पुन्हा मान्य केले,
बदल घडवण्याचे, अरे दिवस गेले.

किती भार झाला, कितींच्या मनावर,
कुणी हसत वेडे, कुणी मौन मेले.

खरे गोड होते, तुझे हासणे गं,
जणू देव अंगी, प्रिये उतरलेले.

तमेचे उपासक, मनाच्या किनारी,
जशी रात राणी, तिचे सर्व चेले.

दुरूनी दिसे ती, तरी दर्द होतो,
नयन तीक्ष्ण इतके, तिचे बोचलेले.

कसे तूच केले हुशारीत सौदे,
हवे ते न देता, रुचे तेच न्हेले.

- आर्त २१.०३.२०२१

-----
नेहेमीप्रमाणे मुक्त टीका, दाद आणि चर्चेस आमंत्रण. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान झालीय.
पण अजूनही थोड्याशा चुका आहेत.
उदा:

मला ईश्वराचे, खुळे भास झाले.
बाकी गझलेत केले, गेले, मेले इत्यादी काफिये घेतल्याने "एले" ही अलामात झालेली आहे. पण भास झाले
यामध्ये "आले" इथे अलामात बदलली गेली आहे.

१. सगळे शेर सहज आल्यासारखे वाटत आहेत याबद्दल अभिनंदन.
२. आत्ता तुमचे खयाल हे सहजपणे उधृत होत आहेत.

मी थोडासा बदल केलेली गझल खाली देतो...

भुजंगप्रयात : लगागा लगागा लगागा लगागा

पुन्हा जोश आला, पुन्हा मान्य केले
बदल घडवण्याचे, अरे दिवस गेले

किती भार झाला, कितींच्या मनावर
कुणी हसत वेडे, कुणी मौन मेले

प्रिये गोड इतके, तुझे हासणे का?
सतत ईश्वराचे मला भासलेले

तमेचे उपासक, मनाच्या किनारी
जशी रात राणी, तिचे सर्व चेले

दुरूनी दिसे ती, तरी दर्द होतो,
नयन तीक्ष्ण इतके, तिचे बोललेले

तसे तूच केले हुशारीत सौदे
न घेता विचारत, हवे तेच नेले

(ps - I were sent you a mail through the Sampark. But you did not check or reply!! At least you could get the corrections within 1 or 2 days maximum)

नमस्कार प्रगल्भ,
तुझ्या प्रतिसादासाठी धन्यवाद. हा, भास झाले इथे अलामत चुकली. किंबहुना ती चुक जाणूनही मी ती तशी सोडली. ती ओळ मला तशी भावली म्हणून घेतलेली ती सूट. (माझ्या वाचनानुसार अशा सुटी हराम आहेत. तरीही.) पण तुला त्यासाठी +१ गुण.
तरीही विचार केला आणि वेगळा बदल केला आहे.
.
वृत्त तु बरोबर ओळखलं.
'बदल घडवण्याचे' नाही बसत कारण लगागा गागागा (वण + या) होतं.
.
'जशी रात राणी' ही जागा मात्र सुंदर सुचवली आहेस.
पुन्हा एकदा तुझ्या वेळेसाठी, सुधारणांसाठी आणि प्रोत्साहनासाठी धन्यवाद.

टीप: ई-मेल पाठवत आहे.

आर्त,
अजून एक मेल केलाय. कदाचित तो देखील स्पॅम ला गेलाय का बघा... म्हणजे मी rediff varun gamil la mail पाठवणार नाही... माझ्या gmail account वरूनच पाठवेन.
आणि तसं झालं असेल तर मग हे jio vs Idea-vodafone chya भांडणा सारखे झाले...
दोघेही एकमेकांच्या clients na सुखासुखी बोलू देत नाहीत Lol

@बन्या स्वागतच आहे. Happy
I'll make a group on telegram or hangouts.
तुम्ही फक्त मला संपर्कातून मेल करा.
माझी ३ यप्रिल ची InfityQ ची परीक्षा झाली रे झाली की आपण तयारीला लागू. तोवर तुम्हाला वाचायला material देण्यात येईल.
लय डेटा हाय वर एक गुरुजी पण हायेती Wink