रंगीबेरंगी

हाऽऽ खब्बऽऽऽऽऽ र...!

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

खबरची बटणे. रंगीबेरंगी बटणे.
काल पुपुवर असाच बटणावरून टैमपास चालला असताना लहानपणी आम्ही खबरच्या बटणांनी खेळत असू ते आठवले. पुपुवरून वाहून जाण्यापूर्वी या प्रकाराची कुठेतरी नोंद राहील अश्या ठिकाणी हलव असे नंदिनीने सुचवले म्हणून ते इथे आणले. या रंगीबेरंगी बटणांना तुमच्याकडे दुसरे नावही असेल. लहानपणी फार आकर्षण असायचे यांचे. याला 'खबरची बटणे' हे नाव कुठून आले, देवच जाणे!

प्रकार: 

प्रकाश चित्र calendar-2015

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

CIO magazine आणि रिको इंडिआ यांचे डेस्क्टॉप कॅलेंडर प्रसिद्ध होते, त्या कॅलेन्डर साठी shortlisted 24 images मधे माझे येक प्रकाशचित्र आहे. खरं तरं मी प्रकाशचित्रण बंद करुन खुप वर्ष झालित त्यामुळे कधीतरी कॅज्युअली काढलेला फोटो शॉर्टलिस्ट होणे हेच खुप . सध्या वोटींग साठी लिंक ओपन आहे.
http://www.cio.in/calendar-2015

विषय: 
प्रकार: 

गॅप

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

कधीकधी मनाच्या अस्वस्थ पाखराला
नको असते कवेत घेणारे आकाश
क्षितिजावरुन ओघळणारा ओलावा
चांदण्यांची दुर...दुरवरुन येणारी हाक
आपल्या सोबत सोबत चालणारा चंद्र
नको असतो कुठलाच उदय आणि कुठलाच अस्त!

...मनाच्या अस्वस्थ पाखराला
नको असते चिऊकाऊची वेल्हाळ चिवचिव
कोकीळेचा आर्त पंचम
खोप्यातील बाळांची फडफड
बगळ्यांची घनश्यामल माळ
नको असतो राऊ आणि नको असते मैना!

मनाच्या अस्वस्थ पाखराला...
नको असते कुणाची छाया, कुणाची माया आणि कुणाचीही दया!
नको असते शब्दाची फुंकर
नको असतात भरवलेले चार घास
नको असतात कुणाचे पुण्य आणि कुणाचेही उपकार!

मनाच्या अस्वस्थ पाखराला
हवा असतो एक कोपरा

विषय: 
प्रकार: 

भारतातील टफेस्ट 200 BRM ! - माझी लाँग डिस्टन्स सायकलींग कहाणी

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

भारतातील टफेस्ट 200 BRM !

मी गेले अनेक वर्षे सायकलींग करतो आहे, पण कधी ब्रेव्हे मध्ये भाग घेतला नव्हता. लाँग डिस्टन्स सायकलींगच्या स्पर्धा AUDAX ही संस्था जगभरात आयोजित करते. ब्रेव्हे ह्या २०० किमी ते १००० किमीच्या असतात. ह्या बद्दल तुम्हाला भारतातील वेब साईट - http://www.audaxindia.org वरून बरीच माहिती मिळू शकेन.

स्पर्धेत भाग घ्यायचे थोडक्यात नियम असे आहेत.

१. BRM ही सेल्फ सपोर्ट राईड असते. ( सोबत सपोर्ट कार घेऊ शकत नाहीत.)

शब्दखुणा: 

राजगृह

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

राजगृह- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदु कॉलनी, दादर येथील घर, बाबासाहेबानी येथे ५०००० हुन अधिक पुस्तकांचा संग्रह केला होता , त्यावरुन त्यांच्या व्यासंगाची व्याप्ती कळावी.
AjayP RajGriha.jpg

विषय: 
प्रकार: 

विजेवरील शेकोटीची ऊब - मॅनहॅतन

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

एका संध्याकाळी मी मॅनहॅतनमधे 'मेट'मधे ऑपेरा बघायला चाललो होतो. त्या दिवशी कड्याक्याची थंडी आणि मुसळदार पावसाच्या धुव्वाधार गार गार धारा कोसळत होत्या...

समयीच्या शुभ्र कळ्या...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

परवाच्या ११ वाजता बसस्टॉपशी उभा असताना हे एक फुल पायाशी पडले आणि एक ओळ आठवली 'समयीच्या शुभ्र कळ्या उमलून लवते आणि केसातली जाई पायाशी पडते'. जरी ही ओळ ह्या प्रसगांशी मेळ खात नाही तरी पण तिचे आठवणे छान वाटले. उन्ह इतके दाट होते त्यादिवशी की इतकुशा फुलाची सावली डोळ्यात सामावून गेली.

विषय: 
प्रकार: 

गारेगार ग्लोबल वार्मिंग

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आज मी सिंगापुरातील तॅन्जोन्ग पागार ह्या भागात जेवणानंतरच्या शतपावलीला गेलो असताना हे आणि अशी घरे पाठिमागच्या बाजूला दिसली. वारा घरात यावा म्हणून पुर्वी मस्त खिडक्या असत. आता मात्र खिडक्या बंद आणि त्याची जागा ह्यांनी घेतली आहे:

विषय: 
प्रकार: 

जाहिरातींमधले रवीन्द्रनाथ

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

दिडेक वर्षांपूर्वी ’केसरी’चे जुने, स्वातंत्र्यपूर्व काळातले अंक चाळत होतो. काही तत्कालीन संदर्भ शोधण्यासाठी. त्या पिवळ्याजीर्ण कागदांमध्ये ओळखीच्या आणि अनोळखी अशा अनेक व्यक्ती आणि घटना नेहमीच भेटतात. शिवाय प्रत्येक पानावर भरपूर जाहिराती असतात. या जाहिराती वाचणंही मौजेचं. आयुर्वेदिय चूर्णं, मोटारगाड्या, पातळंपंचे, वजन वाढवण्याची औषधं आणि लंडनच्या सफरी असं कायकाय त्या जाहिरातींमध्ये असतं. त्या दिवशीही मी सावकाश एकेक पान वाचत बसलो होतो. एका जाहिरातीनं माझं लक्ष वेधून घेतलं. कॅडबरीच्या बोर्न-व्हिटाची ती जाहिरात होती. १९३७ सालच्या ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झालेली.

प्रकार: 

चेरी ब्लॉसम - एक अविस्मरणीय पहाट

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

२०१३ च्या शेवटी शेवटी आणि ह्या वर्षाच्या सुरवातील मी वाशिंगटन डीसी आणि वर्जनियामधे नोकरीनिमित्त काही महिने राहिलो. मी तिथे गेलो तेंव्हा हिवाळ्याची नुकतीच सुरवात झालेली होती. पानगळीच्या दरम्यान गळून गेलेली पाने जमिनाला चिकटत चाललेली होती. कुजत चाललेली होती. काही पाने कधीकाळी वहीत जपूण ठेवलेल्या पिंपळाच्या पानाची आठवण करुन देणारी होती. सगळीकडे बर्फच बर्फ पसरलेला आणि कुठे सिंगापुरातली दमट हवा आणि उंचच उंच इमारती आणि कुठे हे ठेंगणे जग! मी तुलना करता करताच मला भव्य रस्ते असलेले डीसी शहर भेटले आणि मी वाशिंगटन डीसीच्या प्रेमातच पडलो.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - blogs