विजेवरील शेकोटीची ऊब - मॅनहॅतन

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

एका संध्याकाळी मी मॅनहॅतनमधे 'मेट'मधे ऑपेरा बघायला चाललो होतो. त्या दिवशी कड्याक्याची थंडी आणि मुसळदार पावसाच्या धुव्वाधार गार गार धारा कोसळत होत्या...

...मी रस्त्यावरुन जाता जाता माझ्या अंगाला उबदार स्पर्श झालेत. काही स्त्रिया आजूबाजूला सिगारेटचे कश घेत होत्या. पण पुरुष जसे धुंद होऊन सिगारेट पितात ना ती धुंदी त्यांच्या चेहर्‍यावर नव्हती! फक्त पिण्यात एक एट जाणवत होती. व्यसन म्हणून पिणं आणि फॅशन म्हणून पिणं वेगळ्च असतं.! तर .. मी परत परत त्याच रस्त्यावर दोन तीनदा येरझारा घातल्यानंतर माझ्या लक्षात आले की तिथे एक विजेवर चालणारी शेकोटी होती. काही जण तिथे दोन तीन मिनिटे उभे राहून हातपाय शेकत होते. सेम अगदी आपल्याकडे आपण वाळक्या कचर्‍याच्याची शेकोटी करुन अंग शेकतो तसे. पण ती शेकोटी विजेवरची होती म्हणून मला फार कुतुहल वाटले. आणि रस्त्यावर अशी उघडी ठेवून ती जळत आहे आणि जर कुणाच्या अंगावर पडली तर काय होईल असा विचार आला. तो तसा विचार करत करताच मी माझे अंग शेकून घेतले आणि पुढे चालण्यास मला तेवढी ऊब पुरेसी वाटली.

सिंगापुरमधे जर थंडी असती तर हे असे विजेवरचे शेकोटीचे उपकरण ठेवले असते का?! ठेवले असते पण सुरक्षिततेचा विचार करुन ठेवले असते. शेकोटी भोवती एक जाळी लावली असती. आजूबाजूला चार फुटाचे अंतर ठेवले असते. अजून काहीकाही..पण अमेरिका ओरीजनल आहे. हे जग खूप निराळ आहे.

शेकोटी मस्त आहे, पण मला वाटले त्या सिगारेट पिणार्‍या बायांच्या सिगारेटून उष्णता मिळते काय? Light 1

Lol म्हणजे हे बिरबलाच्या खिचडीसारखे झाले.

बी फोटो छान आलाय. पहिला फोटो पाहुन हबकले, म्हणल एवढी मोठी शेकोटी कशी? मग दुसर्‍या फोटोत साईज कळली.