रंगीबेरंगी
एक कविता
एक नेगेटिव्ह कविता जी की माझी शैली.. आवड नाही पण आता भावनेच्या भरात लिहिलीच आहे तर प्रकाशन करण्यायोग्य समजावी :=) हा हा हा :=)
कशाला हवी माया?
नको कुणाची छाया
मातिशी इथल्या
माझीही काया
मिसळेलच ना?
कशाला हवे मैत्र
नको कुणाचे छ्त्र
ढगाखाली इथल्या
माझीही काया
भिजेलच ना?
कशाला हवे पुर्णत्व
नको कुणाचे तत्व
जगता जगता
माझीही काया
विरेलच ना?
- बी
तळ्याकाठी...
जलरंग वापरून केलेला हा प्रयत्न.
तुमच्या काही सूचना / सल्ले असतील तरी बिनधास्त लिहा.
meadows
शुभ दीपावली!
दिवाळीचा प्रसाद!!!!
सिंगापुरमधे तमिळ लोकांचे खूप चांगले बस्तान बसलेले आहे. तमिळ ही इथली एक कार्यालयिन भाषा आहे. दिवाळीच्या दिवसाची आम्हाला इथे एक दिवस सुट्टी मिळते त्याचे श्रेय आणि आभार इथल्या तमिळ जनतेला द्यायला हवेत. पण ह्यांची दिवाळी फक्त एकच दिवसाची असते. आपल्यासारखे पाच पाच दिवस ते साजरे करत नाही. पोंगल हा त्याचा सर्वात मोठा सण. ह्याशिवाय, ज्या दिवशी नरकचथुर्दशी असते त्या दिवशी ही लोक सगळी पुजाविधी करतात. आपला मुख्य दिवस ह्या नंतरचा असतो. म्हणून काल मी पुजेची तयारी केली. मी पुजेच्या गोष्टी विकत आणणे सहसा टाळतो. शक्य तेवढ्या गोष्टी आजूबाजूला निसर्गापासून मिळतील तेवढ्या गोळा करतो.
"न" चा पाढा
दिवाळीला नको फटाके
होळीला नको पाणी
नवीन वर्षाला नको मदिरा
आणि ईदीला नको बकरी
दांडियाला नको टिपर्या
संक्रातीला नको पतंग
द्सर्याला नको सोने
गणपतीला नको मुर्ती
आणि महाशिवरात्रीला नको दुध
पुढे म्हणाल...
.. हनीमुनला नको प्रणय!!!!!
छे!!!!
हा पाढा नन्ना चा नाही
उत्सव साजरे करायला
मना इथे नाही...
पण जपलेल्या प्रतिकांवर
श्रद्धा उरली नाही!!!!
बी
शुभेच्छा
कही दीप जले कही दिल...
शेन्गदाण्याच्या रंगीत गोळ्या
Pages
