कण

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

रवा-साखरेच्या एक कण

ढीगभर मुंग्यानी ओढत ओढत
वारुळात नेला
पुढे काळोखात त्याचे काय झाले माहिती नाही:

बहुतेक..सगळ्यांनी मिळून संपवला असेल
कारण परत दुसर्‍या दिवशी
आणखी एक शिस्तबद्द रांग
आणखी एका कणाला वाहून नेताना मी पाहिली.

इथे भर उजेडात माणसे स्वार्थी, धुर्त, लबाड होतात
इतरांच्या तोंडचे पळवून नेतात
केसांनी एकमेकांचे गळे कापतात
निरपराध लोकांना फसवतात
स्वत:च चंगळ करतात,
स्वत:च दंगल करतात,
स्वतःचे मंगल करतात!

इतके स्वार्थी की..
हिसकवून घेतलेल्यातला एक कणही मुंग्याना मिळणार नाही!

- बी

प्रकार: 

रिया ही कविता भ्रष्टाचाराबद्दलची आहे. हो ही माझी नेहमीची शैली नाही. स्वार्थ ह्या विषयावर कविता लिहायची होती आमच्या "शब्दगंध" वर्गासाठी म्हणून लिहिली. तू ती वाचलीस. छान वाटले. धन्यवाद.

'बी' स्टाईलची वाटली नाही.
>>
सहमत,
मला कवितावाचन आवडत नाही की फारसे समजत नाही, पण आपल्या कविता अधूनमधून वाचतो. कारण मला त्यात एक ललितही दिसते. यात ते मिसिंग वाटले.

Happy
बी, बहुदा वाचली सगळ्यांनी असेल पण तुम्हाला स्पष्ट मत आवडेल की नाही ते न कळल्याने प्रतिसाद दिला नसेल.
कारण तुमच्या 'कविता' नेहमीच आवर्जुन वाचल्या आणि प्रशंसल्या जात इथे.
अर्थात हे माझं मत आहे...मी सुद्धा प्रतिसाद २ वेळा खोडला पण शेवटी लिहिलाच Happy

कारण मला त्यात एक ललितही दिसते.>> अरे किती सुंदर प्रतिक्रिया दिलीस.

कारण तुमच्या 'कविता' नेहमीच आवर्जुन वाचल्या आणि प्रशंसल्या जात इथे.
अर्थात हे माझं मत आहे...मी सुद्धा प्रतिसाद २ वेळा खोडला पण शेवटी लिहिलाच >> हा हा हा Happy परत असे करु नकोस. खरीखुरी प्रतिक्रिया लगेच कळते आणि आवडतेच.