सिंगापुरमधील दिवाळीची सजावट

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago
Time to
read
1’

पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा. इथे मलाच एकट्याला दिवाळीचे इतके वेध का लागले आहे कळत नाही!!!! छे!! सिंगापुरमधे तर दोन महिन्यापासूनच दिवाळीची सजावट पुर्ण झालेली असते. सरंगून आणि रेस कोर्स रोडवरची रोषणाई बघून तुम्हाला दिवाळीची सुरुवात खूप एक दोन महिन्यांपासूनच वाटायला लागते. ह्या सजावटीची काही दृष्ये:

दिपमाळांची ही कॅनोपी...

वरची होती २०१० मधली .. तर ही २०१५ मधली:

दरवर्षी एक विलेज भरते. इथले वातावरण खूपच सात्विक असते. कुठेच तुम्हाला मास वगैरे विकत मिळणार नाही.

हा मी.. मला बघून काहीजणांनी 'भेट तू कधीतरी मग दाखवतो" असे म्हंटले असेल Happy ते हे आपले त्यांनी तर नक्कीच म्हंटले असेल.

प्रकार: 

वा! मस्त! कॅनोपी हा प्रकार नविन आहे मला. सुंदर आहे हे.
तोरणं, झुंबरं, माळा... रेलचेल आहे अगदी!
आपणासहि ही दिपावली सुख, समृद्धी आणि आरोग्यदायी जावो!

वाह्,भव्य ,सुंदर्,जगमग आहे सगळीकडे. मस्त केलीये रोषणाई!!! इथपर्यन्त पोचला उत्साह..>>>>> अगदी अगदी! तुम्हांलाही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

<<<<वाह्,भव्य ,सुंदर्,जगमग आहे सगळीकडे. मस्त केलीये रोषणाई!!! इथपर्यन्त पोचला उत्साह..>>>>>>>>>

<<<<तुम्हालाही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!>>>

याला अनुमोदन

वॉव, किती मस्तं सजावट आहे. सिंगापुर मधे दिवाळीची इतकी धामधूम असेल असे वाटलं नव्हतं. खूप छान.

दिवाळीच्या शुभेच्छा.
हे लक्ष्मी रोड, तुळशीबाग, जांभळी नाका म्हणूनही खपून जाईल. मस्त वातावरण.

बी छान फोटो.

दिवाळीच्या शुभेच्छा

हे लक्ष्मी रोड, तुळशीबाग, जांभळी नाका म्हणूनही खपून जाईल. मस्त वातावरण.>> नक्कीच,

पण सिंगापुर मध्ये आवाजाचे फटाके, रॉकेट, अनार चालत नाहीत.

सिंगापुरमधे तर दोन महिन्यापासूनच दिवाळीची सजावट पुर्ण झालेली असते<<<<<<< ईथल्या फोटोत ५ वर्षापासुन झालेली दिसतेय सजावट.
दिवाळीच्या शुभेच्छा.

शार्प नजरोंवाले आशुतोष.. अर्र्र अर्र!!!!!! खरंच की रे. . तब्बीच मै सोचूँ,आपको पहले भी कहीं देखा है".. Proud

बी, छान आहेत फोटोज. यावर्षीचेही टाक की! वर दिलेले २०१० मधले आहेत.

मस्त फोटो. पहिल्या तिन फोटोतलि कलाकुसर खुप आवडली.

फोटो २०१५ मधले असतील तर कॅमेरा चेक करून तारखेचे सेटिंग ठीक करा, नाहीतर जुने फोटो आहेत असे तरी लिहा.

Can you please check second and forth photo which doesn't have date. Those belongs to this year and rest are 2010's pics. And I have mentioned this very clearly below first picture!

If you observe 2nd & 4th pic you can see even this year also Diwali atmosphere is same. In fact further additions have taken place.

No one can compete Singapore. They have rich market and they respect culture so much.

Sadhana don't listen Sayo. She always try to belittle and insult me.

थर्मोकोल, प्लास्टिक, मॅन मेड केमिकल्सचे रंग ( हे सर्व मेड इन चायना असेल तर त्या मॅनु, प्रॉसेस ला काहीही रेगुलेशन नसणार, ) हे वापरुन बनवलेले भरम्साठ पदार्थ दिसायला कितीही चकचकीत दिसले तरी ते सात्विक ? हजारो / लाखोंच्या डॉलर्स किमतीच्या जीवनावश्यक नसलेल्या, अन काही(च) दिवसात लँडफिल मधे जाणार्‍या वस्तू विकल्या जातात ते सात्विक वातावरण ?

१५ ऑ क्टोबर पासून एवढे दिवे लावून विजेचा अपव्यय तो वेगळाच ?
टेम्पररी शॉपर्स हाय सोड्ल्यास आहे या सर्वात ?

असल्या वस्तूंची भरमसाठ खरेदी करुन, विजेचा अप्व्यय करुन किती मोठ्या प्रमाणावर पर्यावरणावर दुष्परिणाम होतात - त्याची तुला कल्पना नाही . नाहीतर तू असले विधान केले नसतेस. अन हे दुष्परिणाम झाडे, माणसे, जंगले , नद्या , पशु पक्षी सर्वांवर होतात हे तुला कळत नसावे . असो .तुझा अजेंडा एक कलमी आहे तेंव्हा तुला काही समजावणे व्यर्थ आहे .

हॅपी दिवाळी टू यू- भरपूर खरेदी कर, फटाके उडव , मजा कर

>>बेफि मी रोज योगाभ्यास करतो. प्राणायाम सुद्धा. त्यामुळे मी पन्नासचा वाटत नाही.<<

बी खरंच एक्दम फिट दिसतोयस; पण हा फोटो देखिल '१० मधला तर नाहि? Wink

दिवाळीच्या शुभेच्छा!

बी,

मेधांकडे लक्ष देऊ नका. त्यांना नुसती माबोवरच सतरा वर्षे झाली आहेत. तुम्ही वास्तवात विशीचे वाटताय.

टाईम स्क्वेअर मध्ये ख्रिसमसला आणि न्यू यिअर्स ईव्हला निदर्शनाचे बोर्ड घेऊन उभ्या असता का तुम्ही? की हॅलोवीनची चॉकलेट रॅपर्स आणि डेकोरेशन्स लँडफिलमध्ये जात नाहीत?

बाकी सगळे अपार्ट, ही रोषणाई लेखकाने स्वतःच्या घरात केलेली नाही. त्याला दिवाळीच्या दृश्यांचा आनंद वाटतो, तो त्याला इकडे शेअर करावासा वाटला. वर अमितव म्हणाले त्याप्रमाणे हे वातावरण कुठेही खपून जाईल. मग उगाच ह्या सगळ्याची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी लेखकावर कशाला?

भास्कराचार्य, लेखक दिवाळीपूर्वी मांसाहाराची पाककृती लिहिली तर तुम्ही धर्म/ संस्कृती बुडवे असं म्हणत होता. तर त्यावरील प्रतिक्रिया असावी ती. की प्राण्यांना मारून खाणे वाईट तर मग पर्यावरणाला हानी कशी काय चांगली.
आज सगळीकडे आतषबाजी आहे. Lol

बी, तुम्ही योगाभ्यास व प्राणायाम मुळे खरेच यंग दिसता
आपले पंप्र पण योगाभ्यास व प्राणायाम करतात. विषेश म्हणजे तेही शाकाहारी आहेत.
त्यामुळेच ते पण यंग आणि तडफदार दिसतात दिवसातले १८-२० तास ते काम करतात.

>>राज आता नाही इतकी छान. साडेसातीचा खूपच त्रास होतो आहे.<<

हँग इन देअर बडि; अँड इग्नोर द इन्सिग्निफिकंट्स... Happy

अमितव, आय नो. बी ह्यांची बरीचशी मते माझ्याही पचनी पडत नाहीत. सारकॅस्टिकली बोलायलाही काही हरकत नाही. बट समटाईम्स अतिच होतंय असं वाटतं. जे आवडतं ते बघा, जे आवडत नाही ते कशाला बघता? (दोघांनाही उद्देशून)

तसेही इथे आता पंप्र आलेत म्हणजे सगळे शिमगे एकसाथ की काय? Lol

Pages