माझ्या ऑफीसमधील दिवाळीचा फराळ

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago
Time to
read
1’

सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या ऑफीसमधे आम्ही भारतियांनी मिळून सर्वांना दिवाळीचा खास मराठमोळी फराळ दिला. सर्वांना खूप खूप आवडला.

चिनी बांधव तसे कट्टर मासाहारी पण आम्ही फक्त शाकाहारीच पदार्थ ठेवले. तेही खास दिवाळीचे पदार्थ. आश्चर्य ना! दिवाळी आणि त्यात शाकाहारी पदार्थ! असो काही छायाचित्रे. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा.

- बी

प्रकार: 

आश्चर्य ना! दिवाळी आणि त्यात शाकाहारी पदार्थ! >> Happy Happy

बरच काही लिहिता येत पण जाऊ दे . पदार्थ चांगले आहेत .

तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा Happy

छान.
"आश्चर्य ना! दिवाळी आणि त्यात शाकाहारी पदार्थ! " हे वाक्य कळले नाही पण त्याला काहीतरी कंटेक्स्ट असेल.
दिवाळीच्या शुभेच्छा!!

बी तुम्हाला सुदधा शाकाहारी दिवाळीच्या शुभेच्छा .
कडबोळी छान दिसतेय. गुलाबजाम आनि शेवेच्या मधे जो बाऊल आहे त्यात काय आहे ????

सगळे पदार्थ छान दिसत आहेत.

अहो बी दिवाळीत शाकाहारीच पदार्थ असतात
म्हणजे जे दिवाळीला धार्मिक सण म्हणुन साजरा करतात त्यांच्या कडे.

तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

इथे मला अनेकांनी पटवून पटवून सांगितल की नाही त्यांच्याकडे दिवाळीच्या आधी, दिवाळीच्या दिवशी, नंतर, भाऊबीजेला, मेव्हणे, पाहुणे हे सर्व मासाहारी जेवणालाच प्राधान्य देतात. तो मटण चॉप बीबी वाचा म्हणजे कळेल.

पदार्थ छानच...पण बी....मराठमोळे पदार्थ ....असं कर ना. मोळी कशाला बांधलीस पदार्थांची? Proud Light 1

मानुषीताई मी 'मराठमोळी फराळ' असे लिहिले आहे. आपण दिवाळीच्या पदार्थांना खास "फराळ" ह्या नावानी उल्लेखतो. तुम्ही आमच्या घरी दिवाळीच्या फराळाला या असे म्हणतो. पदार्थ खायला या असे नाही म्हणत Happy

इथे मला अनेकांनी पटवून पटवून सांगितल की नाही त्यांच्याकडे दिवाळीच्या आधी, दिवाळीच्या दिवशी, नंतर, भाऊबीजेला, मेव्हणे, पाहुणे हे सर्व मासाहारी जेवणालाच प्राधान्य देतात. तो मटण चॉप बीबी वाचा म्हणजे कळेल.<<<<

असे पण असते का? मग त्यांच्याकडे दिवाळीचे पदार्थ स्विट डिश म्हणुन खात असतिल किंवा फराळात पण मांसाहार मिक्स करत असतिल.

शेवटी प्रत्येकांच्या प्रथा आणि आवडी वेग-वेगळ्या.

(मी तो बीबी वाचला नाही)

मानुषीताई Happy दोन्ही विशेषण आहेत - मराठमोळा आणि मराठमोळी. तुम्ही नक्की काय म्हणायच आहे हेच माझ्या लक्षात येत नाही आहे Happy

आज आमच्या ऑफीसमधे आम्ही भारतियांनी मिळून सर्वांना दिवाळीचा खास मराठमोळी फराळ दिला

हे वरचे वाक्य असे लिहू म्हणता का?
१) आज आमच्या ऑफीसमधे आम्ही भारतियांनी मिळून सर्वांना दिवाळीचा खास मराठमोळा फराळ दिला.

की असे?

२) आज आमच्या ऑफीसमधे आम्ही भारतियांनी मिळून सर्वांना दिवाळीचा खास मराठमोळा पदार्थ दिला.

तुम्ही वाक्य लिहूण द्या. म्हणजे कळेल पटकन.

ओह्ह फराळ हा शब्द स्त्रीलिंगी वापरता का तुम्ही...>> नाही "मी फराळाचे खाल्ले किंवा मी फराळ खाल्ला" असे बोलतो अर्थात फराळ हा पुरुषलिंगी झाला. पण लिंगानुसार विशेषण बदलत का? मला आता उदाहरणे स्मरत नाही.

मी दिवाळीचा मराठमोळा फराळ खाल्ला हे ऐकायला मला कसतरी वाटत.

सुंदर फराळ, तुम्ही सर्वांसाठी फराळ नेला , छान वाटले.

<<<<चिनी बांधव तसे कट्टर मासाहारी पण आम्ही फक्त शाकाहारीच पदार्थ ठेवले. तेही खास दिवाळीचे पदार्थ. आश्चर्य ना! दिवाळी आणि त्यात शाकाहारी पदार्थ! असो काही छायाचित्रे. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा.>>>>>>>

आम्ही मांसाहारी असुनही आमच्या कडेही करंजा , चकल्या आणि दिवाळीचे बाकी पदार्थ गोडधोड शाकाहारी जिन्नसांपासुनच बनतात हो बी भौ आणि आम्ही ते फराळ म्हणुनच खातो जेवण म्हणुन नाही Happy

उगाच त्या मांसाहारावरुन का टेंशन घेताय, ज्याला खायचंय त्याला खाउ द्या.

कविता, त्या दिवशी मला तेच म्हणायच होत त्या मटण चॉपवर की जी लोक मासाहारी आहेत ती सुद्धा दिवाळीच्या वेळेस शाकाहारीच अन्न आणि फराळ करतात. खातात. इतरांना देतात. पण तिथे मी चुकीचा आहे असे सिद्ध करण्यात आले. त्यांच्या सोयीनुसार त्यांनी उत्तरे दिलीत.

बी

शाकाहारी फराळ करतात पुर्ण अन्न (अन्न म्हणजे फराळ आणि जेवण दोन्ही मानल्यास) नाही बरे, आम्ही तर दिवाळीत जेवण मांसाहारीच करतो.

पण तो ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्नय. जाउद्या . जास्त चर्चा नको.

बी, मी आता ऑफिसमध्ये बसलोय, आजूबाजुला मस्त सजावट, रोषणाई आणि पारंपारीक पोशाखात नटलेल्या मुली आहेत. फक्त एक फराळाची कमी होती ती आपण पुर्ण केलीत. Happy

सुंदर फराळ आणि एक प्रश्न - आपल्याकडे बहुतांश लोकांना चकली आवडते, त्यांच्या उड्या कश्यावर जास्त पडल्या.

बी, फराळाचे फोटो आणि तुमच्या सहका-यांचे फोटो सुंदर आहेत.

"त्या" बीबीवर तुम्हाला उत्तर देणारी मीही होते, आणि तो बीबी तुम्ही इथेही उकरुन काढला म्हणुन सांगते की, फराळ आणि जेवण यात फरक आहे. दिवाळीला जो फराळ करतात त्यात तुम्ही वर जे दिलेत त्यातले काही परार्थ असतात आणि फराळानंतर जेव्हा जेवायची वेळ येते तेव्हा जसे जमेल तसे मांसाहारी आणि शाकाहारी जेवण करतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोणी मांसाहार करत नाही. पण भाऊबिजेच्या दिवशी आपापल्या सोयीप्रमाणे भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडॅ जाते. तेव्हा फराळ केल्यानंतर जेव्हा जेवणाची वेळ येते तेव्हा कित्येकदा मांसाहार केला जातो. ही पद्धत तुम्हाला विदर्भात दिसली नसली तरी काही वैदर्भियांना ही विदर्भातही दिसलेली आहे. मांसाहार तुम्हाला वाईट दिसत असला तरीही मांसाहार करणा-यांना तो वाईट दिसत नाही आणि नियमित मांसाहार करत असले तरीही ते शाकाहाराबद्दल अनुद्गारही काढत नाहीत. शाकाहारी मंडळी मात्र मांसाहार आणि मांसाहारी दोघेही दिसले की भडकतात.

बी, मस्तं आहे फराळ.. चिवडा मिसिंग आहे का रे?? आणी तू कोणता पदार्थ बनवलायेस यांतील??

दिवाळी ची सजावट, तुझ्या घरचा फराळ असे छान छान फोटो टाक नंतर.. Happy

सरंगून ची दिपावली सजावट पाहून बरीच वर्षं झाली, ते ही फोटो पाहायला आवडतील.

आणी हो, मांसाहार वर इतका नको अटकूस आता, आगे बढो..

बी, मस्त फोटो.. Happy
साधना, कडक जवाब Proud
बी, अरे चालायचच. व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच कुटूंब तेवढ्या आहारपद्धती. सगळ्यांना घेऊन पुढे जाता आलं की आनंदच आहे. Happy

फराळाचे आणि सहका-यांचे फोटो मस्तच आहेत.

जाताजाता
मराठमोळी मुलगी, तिने केलेला मराठमोळा पोशाख आणि मराठमोळं व्यक्तिमत्व
माझ्यामते यानुसार फराळ हा मराठमोळा

वर्षा हे पदार्थ भारतातून आलेले आहेत पण नक्की कुणि बनवले ते नाही माहिती. मी इथे पेशवाई दुकान आहे तेथून आणले.

नियमित मांसाहार करत असले तरीही ते शाकाहाराबद्दल अनुद्गारही काढत नाहीत. शाकाहारी मंडळी मात्र मांसाहार आणि मांसाहारी दोघेही दिसले की भडकतात.
>>>

अंशता असहमत Happy

आपल्याकडील मांसाहारी मंडळी हे शाकाहार देखील करतातच. त्यातील अपवाद वगळता बरेच जण सणावाराला वा एखाद्या पवित्र दिवशी मांसाहार करत नाहीत. याऊलट आज अमुकतमुक वार आहे तर मी शाकाहार करणार नाही, फक्त मांसाहारच करणार अशी कुठलीही प्रथा नाही. याचा अर्थ स्वताला मांसाहारी म्हणवणारे देखील मांसाहाराला केवळ अन्न म्हणून न बघता मांसाहार आणि शाकाहारामध्ये भेद करत दुजा व्यवहार करतातच Happy

धागा भरकटत असेल तर क्षमस्व, पण हा माझ्या आवडीचा विषय असल्याने राहावतच नाही Happy

Pages