शैलजा यांचे रंगीबेरंगी पान
जांभळी फुलं
माझ्या शेजारणीकडचं हे जांभळ्या फुलांचं एक छोटसं झाडं. सद्ध्या त्याला अशी खूप फुलं आली आहेत. बहरलय नुसत!
चित्र
मम आत्मा गमला..२
मम आत्मा गमला..१
***********
एकामागोमाग गाणी सुरु होत होती, सरत होती आणि इथे मला किती तरी, काय काय आठवत होतं.. एका आठवणीतून दुसरी निघावी, दुसरीतून तिसरी.. रेशमाची लड अलगद उलगडत जावी तसं. मनापासून तल्लीन होऊन, आरामखुर्चीवर रेलून गाणी ऐकण्यात मग्न होउन गेलेले अण्णा आठवले.. "अगं, भांडी घासून विसळताना आणि ठेवताना आवाज करु नको गं! हे बालगंधर्वांची गाणी ऐकतायत ना, हळू आवाज कर.. " म्हणत आमच्या घरच्या कौसल्यामावशींना हलकेच दटावणारी वैनी आठवली.
आपापला खारीचा वाटा
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी आपण सारेच भारतीय अवाक् झालो होतो, म्हटलं तर वावगं ठरु नये. या प्रसंगाच्या अनुषंगाने मायबोलीवर, इतर काही मराठी संस्थळावर आणि वैयक्तिक अनुदिन्यांवरही अनेक मतं मांडण्यात आलेली पाहिली. एकूणच सर्वसाधारण सामान्य माणसाच्या सहनशक्तीचाही कडेलोट झाला, आणि निर्ढावलेल्या राजकारण्यांचीही खुर्चीवरुन गच्छंती झाली. एका फटक्यात कितीतरी गोष्टी जनताजनार्दनाच्याही लक्षात आल्या!
मम आत्मा गमला..१
मधे एकदा घरी पुण्याला गेले होते. गेल्यावर पुस्तकांच्या दुकानी जाणं ओघानी आलंच. सेनापती बापट रस्त्यावरचं क्रॉसवर्ड मला खूप आवडतं. एकतर तिथे गर्दी नसते. मोठं दुकान आहे, खालचा मजला पुस्तकांसाठी आणि वरचा सीडीज्, डीव्हीडीज् वगैरेंसाठी. पुस्तक खरेदी करण्याआधी मस्तपैकी एखाद्या कोपर्यात बसून वाचता येतं. कोणीही उठा, खरेदी करायची नसेल तर दुकानातून चालू पडा! वगैरे म्हणत नाही. एकूणच निवांत असा माहौल आहे. सुख आणखी वेगळं काही असतं का? तर, त्यादिवशी पुस्तकांची खरेदी झाली, आणि वरच्या मजल्यावरच्या सीडीज् वगैरे पाहूयात म्हणून वर गेले.
रखडलेलं लिखाण
विराणी
कशास मन हे जाते गुंतून,
जर केवळ दो घडीचे रंजन;
क्षणैक भासे, सरले मीपण,
अंतरी परी स्वत्वाचे गुंजन;
कशास होतो जीव घाबरा,
भवताली भरला ना मेळा?
भासे मृगजळ, कधी भासे रण
निसटे ऐसे जीवन क्षण क्षण;
रात दाटते, दिन गुदमरतो,
आर्त श्वासही परका होतो;
जिवाशिवाची भेट नसे अन्,
सखी सावलीही देई अंतर;
मौनामध्ये दु:ख लपेटूनी,
खुळा जीव शोधे सांगाती;
कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी....
बंगलोर आणि २५ जुलै २००८
शुक्रवार, २५जुलै, २००८. नेहमीप्रमाणेच बंगलोर सकाळी सकाळी आळोखे पिळोखे देत जागं होत असतं. नेहमीप्रमाणे मी सकाळची फिरुन परत येते, तेह्वा सकाळचे ७-७.१५ होत असतात. सकाळी बंगलोरमधली हवा एकदम मस्त असते, रात्रीचा पाऊस झाल्याने, हवेत आल्हाददायक गारवा असतो. पुण्याची हवाही अशीच होती कधीतरी... माझ्या मनात विचार आल्याशिवाय रहात नाही...
भिवाण्णाची काळी माय
Pages
