फुलपाखरी संशोधक
अनुष्काबद्दल आलेला लेख. आई म्हणून जरा भाव खाऊन घेत्ये!
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/-/articleshow/22...?
मुळात फुलपाखरू हा अत्यंत नाजूक जीव. या जिवाच्या निकटच्या सहवासात अत्यंत सावधपणे राहावं लागतं. फुलपाखरांविषयी उत्सुकता असलेले अनेकजण असले, तरी त्याविषयी संशोधन करणारे कमीच. याच क्षेत्रात सध्या अत्यंत महत्त्वाचं काम करत असलेली तरुणी म्हणजे अनुष्का रेगे.
आसावरी चिपळूणकर
फर्ग्युसन महाविद्यालयात मायक्रोबायॉलॉजी विषयात बीएससी करणारी अनुष्का रेगे ही पुण्याची तरुणी सध्या फुलपाखरांच्या अभ्यासात मग्न आहे. नागझिरा आणि ताडोबासारख्या महाराष्ट्रातील काही राष्ट्रीय अभयारण्यात फिरल्यानंतर आपल्याला जंगल वाचन आवडतंय, हे तिच्या लक्षात आलं. त्यामुळेच अनुष्कानं अभ्यासाचा विषयही जंगलाशी संबंधित घ्यायचा असं ठरवलं आणि सुरू झाला एक संशोधन प्रवास... भारतातील फुलपाखरांचा 'डिस्ट्रिब्युशन मॅप' सध्या अनुष्का तयार करतेय. कोणतं फुलपाखरू देशाच्या कोणत्या भागात दिसतं, राहातं आणि वाढतं याचा नकाशा तयार करण्याचं काम ती करते आहे. याविषयी संशोधन करताना काही रंजक माहिती मिळत गेल्याचं ती सांगते. काही फुलपाखरं विषारी असतात. त्यामुळे पक्षी त्यांची शिकार करत नाहीत. म्हणूनच या विषारी फुलपाखरांच्या दिसण्याची नक्कल बिनविषारी फुलपाखरं करतात आणि स्वतःचा जीव पक्ष्यांपासून वाचवतात. या प्रकाराला 'मिमिक्री' म्हणतात. अर्थात, ही मिमिक्री काही विशिष्ट प्रकारची फुलपाखरंच करू शकतात.
'इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, बंगळुरू इथं मी अर्ज केला. त्यांना आपण यापूर्वी केलेलं काम, उपक्रमांतील सहभाग, आत्ता जे काम करायचंय, त्याचं कारण याविषयी सविस्तर माहिती पाठवली. त्यातून निवड झाल्यावर 'एका रानवेड्याची शोधयात्रा' या पुस्तकाचा लेखक आणि फुलपाखरांविषयीचा संशोधक कृष्णमेघ कुंटेच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. एरवी फारशी महाराष्ट्राबाहेर न फिरलेली मी, फुलपाखरांच्या अभ्यासाच्या निमित्तानं आंध्रप्रदेशात जाऊन आले. बेंगळुरूतील दोन महिन्यांत बरंच 'फिल्ड वर्क' आम्हा चार जणांच्या टीमनं केलं. कोणत्या हवामानात आणि कोणत्या झाडांवर फुलपाखरं राहातात, यांसारखा अभ्यास 'फिल्ड वर्क'मध्ये व्हायचा, तर फुलपाखरांच्या वागण्यासंदर्भातील थोडक्यात, संख्यात्मक विश्लेषण (स्टॅटिस्टिकल अॅनालिसिस) 'लॅब'मध्ये केलं जायचं,' असं ती सांगते.
या अभ्यासादरम्यान कठीण परिस्थितीलाही सामोरं जावं लागल्याचं अनुष्कानं सांगितलं. ''फिल्ड वर्क'नं दमल्यावर आम्ही खोलीवर आलो, की दिवसभरातील निरीक्षणाची नोंद करायचा कंटाळा करायचो. दमछाक झाल्यामुळेही कधीतरी हे काम नकोसं वाटायचं; पण नोंद केली नाही, तर निरीक्षणाचा काहीच फायदा नसल्याचं कृष्णमेघनं पटवून दिल्यावर आम्ही कोणत्याही परिस्थितीत नोंदी करण्याचं काम पूर्ण करायचो.'
अनुष्काच्या मते, प्रत्येक फुलपाखराचं एक निराळंच सौंदर्य असतं. तरीही तिच्या अभ्यासाला 'कॉमन मॉर्मोन' (Common Mormon) या फुलपाखरापासून सुरुवात झाल्यामुळे ते तिचं सगळ्यात लाडकं फुलपाखरू असल्याचं ती सांगते. फुलपाखरांचं स्थलांतरही काहीसं पक्ष्यांप्रमाणेच असलं, तरी त्यावर अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही. निरीक्षण आणि प्रत्यक्ष क्षेत्राभ्यासासह वाचनाचाही मोठा हातभार या संशोधनासाठी होत असल्याचं अनुष्का आवर्जून सांगते.
फुलपाखरांची एखादी विशिष्ट जात कशी उत्क्रांत झाली, दोन जातींतील साम्य आणि फरक, फुलपाखरांच्या शरीराच्या अंतर्गत रचनेचा अभ्यासही अनुष्का सध्या करते आहे. तिला याच विषयांत पीएचडी करण्याचीही इच्छा आहे. त्यादृष्टीनं तिचे प्रयत्न आणि अभ्यास सुरू आहे.
अभिनंदन !
अभिनंदन !
मस्त. अनुष्काचे अभिनंदन आणि
मस्त.
अनुष्काचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
वा! मस्तच. अभिनंदन आणि
वा! मस्तच. अभिनंदन आणि शुभेच्छा.
शैलजा जरा का
शैलजा जरा का गं........संपूर्ण भाव खाऊन घे!
यू शुड बी प्राउड ऑफ युवर डॉटर! संशोधक!
एफ बीवर तिचा फोटो असलेला लेख आहे ना!
आज बातमी वाचली होती आणि खूप
आज बातमी वाचली होती आणि खूप छान वाटले होते. एक वेगळे करीअर म्हणून.
अभिनंदन आणि शुभेच्छा
वा वा अभिमान वाटला. तिला खुप
वा वा अभिमान वाटला.
तिला खुप खुप शुभेच्छा.
अरे वा वा!!! मस्त वाटले
अरे वा वा!!! मस्त वाटले वाचून.
आईचे,आज्जीचे आणि लेकीचे अभिनंदन.
मस्तच! अभिनंदन आणि कौतुक
मस्तच! अभिनंदन आणि कौतुक
वा.. छान वाटले वाचून..
वा.. छान वाटले वाचून.. अनुष्काचे अभिनंदन अन शुभेच्छा
अफलातुन संशोधन आहे. शुभेच्छा
अफलातुन संशोधन आहे. शुभेच्छा अनुष्का.
अनुष्काचे कौतुक !!!
अनुष्काचे कौतुक !!!
अभिनंदन अनुष्का (आणि
अभिनंदन अनुष्का (आणि अनुष्काच्या आई)!!
शैलजा अभिनंदन. बापरे तुझी
शैलजा अभिनंदन. बापरे तुझी कन्या संशोधन वगैरे करते आहे हे माहिती नव्हते.
अनुष्काचे आणि तिला घडवणार्या
अनुष्काचे आणि तिला घडवणार्या सर्वांचे अभिनंदन अन शुभेच्छा
शैलजा, अभिनंदन आणि
शैलजा, अभिनंदन आणि अनुष्काच्या पुढील वाटचालीकरता भरघोस शुभेच्छा!
अभिनंदन..
अभिनंदन..
मस्त मस्त आहे अनुष्काचे
मस्त मस्त आहे
अनुष्काचे अभिनंदन आणि शुभेच्छा
मस्त अनुष्काचे अभिनंदन आणि
मस्त अनुष्काचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
अनुष्काचे अभिनंदन आणि
अनुष्काचे अभिनंदन आणि शुभेच्छा
आईचेही स्पेशल अभिनंदन ग
शैलजा, तुझे आणि तुझ्या लेकीचे
शैलजा, तुझे आणि तुझ्या लेकीचे खुप अभिनंदन आणि तिला भरघोस शुभेच्छा!!
माय लेकीचे अभिनंदन
माय लेकीचे अभिनंदन
खरेच छान. अनुष्काला पुढील
खरेच छान. अनुष्काला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
धन्यवाद सगळ्यांचे!
धन्यवाद सगळ्यांचे!
अभिनंदन अनुष्का! पुढील
अभिनंदन अनुष्का! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
मस्तच !अनुष्काला अनेक
मस्तच !अनुष्काला अनेक शुभेच्छा!
सही! अनुष्काचं अभिनंदन.
सही! अनुष्काचं अभिनंदन. पुढल्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
सहीच! अनुष्काला पुढील
सहीच! अनुष्काला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
अनुष्काचे अभिनंदन. योग्य वयात
अनुष्काचे अभिनंदन. योग्य वयात संशोधनाची गोडी लागली आहे !
Pages