शैलजा यांचे रंगीबेरंगी पान

सुहृद -भाग १

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

पहिल्यांदाच कथा लिहायचा प्रयत्न करतेय, पाहू कितपत जमतय!! Happy गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली!! Happy Happy

**************************************************************

दीक्षित मास्तरांच्या घरी जरा लगबग सुरु होती. आज त्यांच्या लेकीला, जाईला, बघायला येणार होते. घरात सर्वात जास्त अस्वस्थ मास्तरच होते! खर तर, त्यांच्याच शेजारी रहात असलेल्या कुलकर्ण्यांनी हे स्थळ आणल होत, म्हणजे तस माहितीच असणार होत…

विषय: 
प्रकार: 

केंब्रिजमधल्या भटकंतीच्या आठवणी.....

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

केंब्रिजमधे खूप भटकलो एक दिवस! किती तरी फोटो काढले. त्यातलाच हा एक फोटो. पुतळ्यातले आजोबा जिवंत वाटत होते एकदम! गंम्मत म्हणून काढलेला फोटो!!

shailaja4.jpg

विषय: 

डोझम्माचे बारसे

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

बंगळुरूला नवीनच आल्यावेळी इतक एकट वाटायच.. इथे नोकरी मिळाली आणि आमच पार्सल नव्या ऑफ़िसला भोज्जा करून राणीच्या देशात जायला विमानात बसल देखील!! बंगळुरुला जातेय म्हणेपर्यंत एकदम साता समुद्रापारच...

विषय: 
प्रकार: 

काठावरून निरखलेला कामाठीपुरा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

दचकायला होत ना? एक मध्यमवर्गीय घरातल्या व्यक्तीकडून, त्यातल्या त्यात स्त्रीकडून/ मुलीकडून हा शब्द ऐकला तरी आजूबाजूच्या भुवया लगेच उंचावतात!! या शब्दाचा उच्चार करण म्हणजे देखील पाप जणू.... तुमच्या आमच्या मध्यमवर्गीय आयुष्यात या शब्दाला जागा नसते, जणू काही हे जग अस्तित्वातच नसत आपल्यासाठी. तर, अश्याच मध्यमवर्गीय गर्दीतली आणि बर्‍यापैकी तशीच मानसिकता असलेली मी एक. मुंबईमधेच, कामाठीपुरा म्हणून एक भाग, वसाहत आहे हेच मला माहीत नव्हत. याबाबत मी पूर्ण अनभिज्ञ होते, आणि मग एके दिवशी अचानक कामाठीपुरा माझ्यासमोर उलगडला.... उलगडला कसला, अंगावरच आला एकदम...

विषय: 
प्रकार: 

माझे अण्णा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

अण्णा म्हणजे माझे आजोबा. माझ्या वडिलांचे वडील. बालपणीचा माझा पहिला वहिला मित्र. घरात कोकणी आणि मराठी दोन्ही बोलत असल्याने, घरी कोकणीमधल 'अरे तुरे' च वापरल जायच, समजा जरी मराठी बोललो तरी संबोधन 'अरे' हेच, मग ते आजोबा असोत, नात्यातली इतर वडिलधारी मंडळी असोत... त्याला निकष एवढाच की ती व्यक्ती तुम्हाला जवळची असायला हवी! आणि कोकणीत बोलताना तर 'अरे तुरे' च वापरल जात. असो.

प्रकार: 

नमन

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

आज रंगीबेरंगीच पान मिळाल वर्षासाठी!! ऍडमिन आणि टीमचे खूप खूप आभार. Happy

सुरुवात करताना, आधी वंदू तुज मोरया.....

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ l
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ll

आणि आता माझी माय सरसोती.....

या कुंदेदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता l
या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ll
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवे: सदा वंदिता l
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्या पहा ll

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - शैलजा यांचे रंगीबेरंगी पान