माहिती

जीवनसत्वे - आरोग्याचे रक्षणकर्ते : लेखमाला (भाग १)

Submitted by कुमार१ on 6 January, 2019 - 22:40

शरीराच्या पोषणासाठी आपण आहारातून विविध पोषण-घटक दररोज घेत असतो. त्यापैकी कर्बोदके, मेद व प्रथिने ही मोठ्या प्रमाणात (ग्रॅममध्ये) लागतात. याउलट काही पोषण-घटक हे अल्प प्रमाणात (मिलिग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम) जरुरीचे असतात. अशा सूक्ष्म पोषणद्रव्यांमध्ये जीवनसत्वांचा(Vitamins) समावेश होतो.

विषय: 

अमेरिकेमध्ये child adoption बद्दल माहिती हवी आहे

Submitted by दुर्योधन. on 6 June, 2018 - 13:54

नमस्कार,

मला अमेरिकेमध्ये child adoption बद्दल माहिती हवी आहे. त्यासंदर्भात माझे खालील काही प्रश्न आहेत. आपल्या कोणास जर काही माहिती असेल तर कृपया share कराल का?

१. अमेरिकेत राहून कोणी भारतातून child adopt केले आहे का (अमेरीकेतल्या संस्थांमार्फत)? किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणी?
२. असे असेल तर अश्या काही संस्थांचा reference देऊ शकाल का?
३. अमेरिकेत राहून भारतातील संस्थांमार्फत child adopt करता येऊ शकते का? असे असेल तर त्याबद्दल काही माहिती देऊ शकाल का?

अनेक धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 

गाऊट : युरिक अ‍ॅसिडचे ‘खडे’ बोल !

Submitted by कुमार१ on 8 April, 2018 - 21:51

आपल्या शरीराच्या कुठल्याही हालचालींमध्ये विविध सांधे महत्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये जे अनेक आजार उद्भवतात त्यांना आपण ‘संधिवात’ (arthritis) या सामान्य नावाने ओळखतो. सांध्यांचा दाह होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यानुसार या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काहींमध्ये सांध्यांत विशिष्ट प्रकारचे खडे (crystals) जमा होतात आणि त्यामुळे तिथे दाह होतो.

विषय: 

बिलिरुबिन : काविळीतला पिवळा डँबिस

Submitted by कुमार१ on 18 December, 2017 - 05:11

बिलिरूबिन – हा शब्द काहीसा परका वाटला असेल ना? मला कल्पना आहे की सामान्यजनांना ग्लुकोज, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल हे शब्द खूप परिचित आहेत. पण बिलिरूबिन तसा पटकन लक्षात येत नाही. आता मी जर ‘कावीळ’ हा शब्द उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर लगेच डोळे पिवळे झालेला रुग्ण येतो की नाही? मग सोप्पंय. हा जो पिवळेपणा येतो तो बिलिरूबिन या शरीरातील रंगद्रव्यामुळे.

विषय: 

हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन

Submitted by कुमार१ on 13 November, 2017 - 04:02

आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेली आणि आपल्याला प्रत्येक क्षणी मिळालीच पाहिजे अशी गोष्ट कोणती? क्षणाचाही विचार न करता या प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे – ते म्हणजे ऑक्सीजन (O2) ! पर्यावरणातील O2 आपण श्वसनाद्वारे फुफ्फुसांमध्ये घेतो. आता हा O2 शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचवण्याचे काम एक वाहतूकदार करतो आणि तो आहे हिमोग्लोबिन. हे एक महत्वाचे प्रथिन असून त्याचा कायमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट लालपेशी. लाल रंगाच्या या प्रथिनामुळेच त्या पेशी आणि पर्यायाने आपले रक्त लाल रंगाचे झाले आहे.

कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ !

Submitted by कुमार१ on 5 November, 2017 - 19:48

गेल्या अर्धशतकात आपण वाढत्या प्रमाणात आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला आणि त्याबरोबर आपल्या आयुष्यातील ताणतणाव देखील वाढत गेले. एकीकडे आपला भौतिक विकास होत असतानाच आपले शरीर मात्र निरनिराळ्या आजारांची शिकार होत गेले. हृदयविकार हा त्यापैकी एक प्रमुख आजार. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये मेद-पदार्थांच्या गुठळ्या होऊन त्या आकुंचित होणे. त्याचा पुढील परिणाम म्हणजे माणसाला येणारा “हार्ट अ‍ॅटॅक ” हा होय. या विकाराचा आपल्या रक्तातील ‘कोलेस्टेरॉल’च्या वाढलेल्या प्रमाणाशी घनिष्ठ संबंध असतो हे आपण सगळे जाणतोच.

विषय: 

कथा एका कट्ट्याची

Submitted by कुमार१ on 6 September, 2017 - 05:56

काही वर्षांपूर्वी एका खासगी संस्थेत नोकरीस होतो. संस्थेच्या स्थापनेपासूनच मी तिथे गेलो. यथावकाश तिथे स्थिरावलो. कामाचा व्याप हळूहळू वाढत होता. अनेक सहकारी लाभले होते. सुरवातीच्या एकदोन वर्षांत आम्ही उत्साहाने व जोमाने काम करीत होतो. तेव्हा तेथील व्यवस्थापनाची आमच्याशी वागणूक बरी होती. हळूहळू संस्था विकसित झाली तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली. आता मात्र व्यवस्थापनाने त्याचे खरे रूप दाखवायला सुरवात केली. सर्वसाधारण नोकरदारांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आम्हाला जाणीवपूर्वक दिलेल्या नव्हत्या. व्यवस्थापन आमच्याशी चर्चेस उत्सुक नसायचे. क्वचित झालेल्या चर्चा निष्फळ ठरत.

विषय: 

'तीसरी कसम' आणि 'बद्री की दुल्हनिया' : एक '3G' कनेक्शन

Submitted by rar on 26 June, 2017 - 13:59

रात्री दहाची वेळ. जत्रेचे तंबू पडले आहेत. गावोगावहून माणसं जमली आहेत. गाडीतळावर पोचल्यावर 'तो' गाडीला जोडलेली आपली बैलं मोकळी करतो. 'ती' केवळ त्याच्या गाडीची एक सवारी. जवळच्या चहाच्या टपरीतून तिच्यासाठी ४ आण्याचा लोटाभर 'चाह' विकत घेतो. 'कुवारे चाय नही पिते' या आपल्या समजूतीला बाजूला ठेवून तिच्या आग्रहाखातर तो देखील घोटभर चहा पितो. ती त्याला दोन दिवस जत्रेमधे रहायचा आग्रह करते. आणि तितक्यात त्याच्या (आणि आपल्याही) कानावर जवळून येणार्‍या हार्मोनियमचे सूर पडतात. त्याच्यासारखेच आपणही त्या ढोलकीच्या रीदमकडे आकर्षित होतो.

उत्तम सामाजिक उपक्रम, कार्यक्रम व प्रकल्पांच्या माहितीचे संकलन

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 17 September, 2015 - 01:56

आपल्याला वेगवेगळ्या माहिती स्रोतांद्वारे अनेक खात्रीशीर, सेवाभावी व लोकहितकारी अशा सामाजिक प्रकल्प व उपक्रमांची माहिती नित्यनियमाने मिळत असते. सोशल मीडियातून तर अशी माहिती रोजच प्रसृत होत असते. खात्रीलायक, नोंदणीकृत संस्थांद्वारे जसे मोठे उपक्रम व सेवाकार्य प्रकल्प हाती घेतले जातात तसेच अगदी छोट्या पातळीवरही एकट्या दुकट्या लोकांनी मोठ्या तळमळीने चालू ठेवलेल्या कल्याणकार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते खरी, परंतु ही माहिती इतर लाटांमध्ये विरूनही जाते. तर या धाग्याचा उद्देश हा की, अशा प्रकारचे चांगले काम व उपक्रम संकलित स्वरूपात आपल्या माहितीसाठी एकत्र पाहाता यावेत.

स्त्रीविरोधातील हिंसा नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस : २५ नोव्हेंबर! (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 November, 2014 - 01:16

स्त्रियांबाबत केली जाणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु दिवसेंदिवस या हिंसेचे वाढत चाललेले उग्र रूप ही एक अत्यंत चिंतेची व शरम आणणारी वस्तुस्थिती बनत चालली आहे. आजूबाजूच्या या परिस्थितीकडे काणाडोळा करून उपयोग नाही, कारण त्याची झळ कधी तुम्हांला लागेल ते सांगता येत नाही. अनेकदा स्त्रियांचे बाबतीत घडणारा हिंसाचार हा त्यांच्या जोडीदाराकडून होतो. इ.स. २०१२मध्ये हत्या झालेल्या स्त्रियांमधील जवळपास अर्ध्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबसदस्याकडून मारल्या गेल्या.

Pages

Subscribe to RSS - माहिती