स्नेहाधार प्रकल्पाच्या मदतीसाठी "शोध कवितेचा" स्नेहालयाच्या पुणे टिम ने २८ जून रोजी आयोजित केला आहे.
देणगी प्रवेशिका रु. २५०/- फक्त.
प्रवेशिकेसाठी सम्पर्कः सचिन मदने : ९० ११०३ ३०११ (पेठ भाग)
ज्योति एकबोटे: ९० ११६३ ७२०० ( कोथरुड)
प्रदिप काका कुलकर्णी: ९८ २२४० ६६९२ ( सेनापती बापट रस्ता)
विक्रम देशमुख: ९८ ५०९३ ३६५४ ( औन्ध)
शशिकान्त सातभाई: ९८ २२०४ ९४९३ ( कर्वेनग))
अजित थदानी: ३२९१ ४७५३ ( रिटेलवेअर सॉफ्टटेक सातारा रोड - सकाळी १० ते ६)

मला काही माहिती हवी आहे, जर कोणी देऊ शकल तर त्याबद्दल आभार.
माझ्या ओळखी मध्ये एक कुटुंब आहे. त्यांनी मुलगी दत्तक घेतली होती , ज्यांनी तिला दत्तक घेतली ते नवरा आणि बायको दोघेही आता हयात नाहीत. त्या मृत व्यक्तीची बहीण सध्या या मुलीची कायदेशीर पालक आहे.
गेले दोन वर्ष ती मुलगी पुण्यातील "आपलं घर" या संस्थेमध्ये होती. या वर्षी आठवी मध्ये ती नापास झाली आहे.
तीच वागणं हट्टीपणाच आहे आणि ती संस्थेमधील लोकांना त्रास देते व त्याचं ऐकत नाही.
म्हणून संस्थेने मुलीला घेऊन जायला सांगितल आहे.
इथे कोणाला पुण्यातील इतर सामाजिक संस्था/शाळा माहीत आहेत का ज्या या मुलीला दाखल करून घेतील?
अर्थसंकल्पाच्या विश्लेषणापासून आपल्या करीयरची सुरुवात करून कालांतराने नाशिक परिसरातील सेक्स वर्कर्स, समलिंगी व तृतीयपंथींच्यात एचआयव्हीसंबंधी जागृती निर्माण करताना सेक्स वर्कर्सच्या पुनर्वसनासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणार्या आसावरी देशपांडेंचा प्रवास हा नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळा आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने बघायला लावणारा आहे. त्यांचे काम जरी सेक्स वर्कर्स किंवा वारांगना, तृतीयपंथी लोकांच्यात एचआयव्ही जागृती संदर्भात असले तरी ह्या कामाचा संबंध संपूर्ण समाजाशी आहे.
नमस्कार!
आयुष्यातील अनेक टप्प्यांवर आपण स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबियांसाठी / इतर कोणासाठी वैद्यकीय क्षेत्राच्या सहवासात येतो.
अनेक रुग्णालये, प्रयोगशाळा, संशोधन संस्था, निष्णात वैद्य, शस्त्रक्रिया तज्ञ, नर्सेस, इतर सेवा पुरवणार्या संस्था, तसेच वैद्यकीय उपकरणे पुरवणारी दुकाने वगैरेंची माहिती येथे एकत्र करता येईल.
श्री बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ प्रकाश आमटे संचालित हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प दवाखान्याच्या पुनर्निर्माणासाठी लोकबिरादरी मित्रमंडळ, पुणे यांच्यातर्फे आयोजित, श्री. अशोक हांडे प्रस्तुत 'मराठी बाणा'.
शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०१४
वेळ - सायं. ७ ते १०
स्थळ - गणेश कला क्रीडा, पुणे
***
पार्किन्सन्स (पीडी) होण्याची कारणे? : माहित नाहीत
पीडी पूर्ण बरा होण्यासाठी उपचार? : अजून तरी नाहीत.पण संशोधन चालू आहे. आशेचा किरण आहे.आणि पूर्ण बरा होत नसला तरी लक्षणावर नियंत्रण आणून चांगले जीवन जगता येते.
अशी प्रश्नोत्तरे पीडीवरील कोणतेही साहित्य वाचले की हमखास आढळतात.आणि हे वास्तव स्विकारताना लक्षणावर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात.त्यांच्या अत्यंत मर्यादित आणि व्यक्तीनिहाय उपयोजितेचा विचार करुनही पीडीनी त्रस्त पेशंटना ते आशेचे किरण वाटतात.
नमस्कार !
हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते.

युवा निर्माण शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०१४
http://www.maayboli.com/node/48052 - भाग पहिला
रीनाचे आई वडील लहानपणीच गेल्यामुळे तिचा सांभाळ तिच्या आजीने केला. सांभाळ म्हणजे किती? तर रीना सोळा वर्षाची होईपर्यंत! मग घोडेगावहून अचानक बीडला आलेले एक कुटुंब रीनाला मागणी घालू लागले. काळी सावळी, टपोर्या आणि बोलक्या डोळ्यांची लाजरीबुजरी रीना मान खाली घालून बसली होती. तिचे बोलणे, संस्कार, सवयी, घरकामाचा अनुभव असे प्रश्न विचारून समाधान झाल्यावर तिथल्यातिथेच सुपारी फोडण्यात आली आणि पंधरा दिवसांनी काही किरकोळ दागिने, मानपान, साड्या यासह रीनाची पाठवणी पुण्यात तिच्या सासरी केली गेली.