रुग्णालये, वैद्य, वैद्यकीय सेवा, अनुभव व माहिती

Submitted by बेफ़िकीर on 22 April, 2014 - 02:23

नमस्कार!

आयुष्यातील अनेक टप्प्यांवर आपण स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबियांसाठी / इतर कोणासाठी वैद्यकीय क्षेत्राच्या सहवासात येतो.

अनेक रुग्णालये, प्रयोगशाळा, संशोधन संस्था, निष्णात वैद्य, शस्त्रक्रिया तज्ञ, नर्सेस, इतर सेवा पुरवणार्‍या संस्था, तसेच वैद्यकीय उपकरणे पुरवणारी दुकाने वगैरेंची माहिती येथे एकत्र करता येईल.

स्वानुभवाचे बोलही अवश्य सांगावेत. (एखाद्या विशिष्ट व्यक्तीबाबत / संस्थेबाबत / रुग्णालयाबाबत काही नकारात्मक अनुभव नोंदवायचा असल्यास शक्यतो नांव न घेता, नांव घेणे अत्यावश्यक असल्यास संयत भाषेत व अनादर होणार नाही ह्याची खबरदारी घेऊन तो नोंदवावा. असे नकारात्मक अनुभव नोंदवणे हेही ह्या धाग्यात अतिशय महत्वाचे असेल हे सर्वांनाच मान्य होईल, कारण त्यामार्फत इतर अनेकांना योग्य ती काळजी घेता येईल).

वैद्यकीय डेटाबेस तयार व्हावा असाही एक उद्देश येथे सफल करता येईल.

ह्याच धाग्यावर मायबोलीवरील तज्ञ वैद्यांना योग्य वाटल्यास त्यांनी मायबोलीकरांना त्या त्या वेळी योग्य ते मार्गदर्शन केल्याने धागा अधिकच उपयुक्त ठरू शकेल.

ह्याशिवाय, मजेशीर वैद्यकीय किस्से / स्वानुभव ह्यांनीही हा धागा नटवता येईल.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपयुक्त धागा.

माझ्या सासूसासर्‍यांच्या बाबतीत संजीवनी हॉस्पिटल आणि मंगेशकर हॉस्पीटलचा अनुभव चांगला होता. माझे आईबाबा पुण्यात रहात होते तेव्हा पुना हॉस्पिटलला जायचे. गेली १५ वर्षे आईबाबा ठाण्याला राहातात. बेथनी हॉस्पिटल वर त्यांची सगळी भिस्त आहे. वयोमानाप्रमाणे येणार्‍या व्याधींपासून सायकिअ‍ॅट्रिक्सपर्यंत सर्व प्रकारचे स्पेशालिस्ट, हॉस्पिटलाझेशन सगळ्यासाठी ते बेथनीवर अवलंबून असतात. आत्ता सुद्धा गेले सात-आठ दिवस माझे बाबा बेथनीत आहेत. आज डिस्जार्ज मिळणार होता.

वैवकु व स्वाती २,

धन्यवाद!

स्वानुभवानुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मला दोन्ही वेळा अतिशय चांगला उपयोग झाला. अपघाताच्या वेळी (२००५) आणि पल्मनरी एंबॉलिझम झाले त्यावेळी (२०१२) सर्व संबंधित डॉक्टर्स, इतर स्टाफ, सेवा, उपकरणे, उपलब्ध तंत्रज्ञान, आपुलकी हे अतिशय भिडले मनाला.

काहींना तेथे चांगले अनुभव नाहीयेत तर काहींच्या मते तेथे सेवा महागड्या तरी आहेत किंवा सेवांची उपलब्धता ठीक नाही आहे. मला मात्र अतिशय चांगला अनुभव आला.

तसेच संजीवनी हे कमी खर्चाचे व चांगले रुग्णालय आहे.

जोशी हॉस्पीटलमध्ये जरा पार्किंगचा प्रॉब्लेम असू शकतो. पूना हॉस्पीटलबाबत माझा (इतरांच्या हॉस्पीटलायझेशनमधून आलेला) अनुभव तितकासा खास नाही.

कोथरुडमधील डहाणूकर कॉलनीतील देवयानी हे अद्ययावत रुग्णालय अतिशय देखणे व अ‍ॅलर्ट सर्व्हिसेस देणारे आहे. ते तुलनेने नवेही आहे.

बेफि,
माझ्या मामाचा कोथरुडच्या कृष्णा हॉस्पिटलचा अनुभवही चांगला आहे.

आईबाबा पूना हॉस्पिटलला जायचे त्याला बरीच वर्षे झाली. तेव्हाचे त्यांचे डॉक्टर - डॉ.विनोद शहा पूना हॉस्पिटलशी संलग्न होते. माझ्या आईला अक्षरशः मरणाच्या दारातून परत आणले. बरेचदा तुमचे नेहमीचे मुख्य डॉक्टर कोण आहेत , त्यांचे तुमच्याशी कितपत घनिष्ट संबंध आहेत त्यावरही खूप काही बदलते.

तीन वर्षांपूर्वीपर्यंत मी दीनानाथला मॅनेजर अ‍ॅडमिन होतो. त्यामुळे मला तिथल्या कल्चरची खूप चांगली माहिती आहे. आणि सध्या मी तिथे नसलो तरी मी अत्यंत आदराने सर्व डॉक्टर्स आणि स्टाफ यांच्याकडे पाहतो. पूर्णपणे पारदर्शक बिलिंगची व्यवस्था हे तिथले वैशिष्ट्य आहे. तसेच आपुलकीने सेवा होते. तसेच सर्वात चांगली बाब म्हणजे राजकीय हस्तक्षेप अजिबात खपवून घेतला जात नाही. सर्वांच्या कामाचे सतत मूल्यमापन होत असते. अतिशय उत्तम स्वच्छता राखली जाते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुठल्याही नातेवाईकाला कधीही रुग्णाला भेटण्यास आडकाठी केली जात नाही.

मुंबईतील रुग्णालयांचा पण अनुभव दिला तर चालेल ना ?

बी.के. सी. मधले अ‍ॅपल हार्ट.. एकतर खुपच प्रशस्त आणि मोक्याच्या जागी आहे. रुग्णाचे मोठे ऑपरेशन असेल तर
ओटी बाहेर त्याच्या नातेवाईकांना बसायची खास सोय आहे तसेच ऑपरेशनची प्रगती सांगण्यासाठी एक सेवक सतत उपलब्ध असतो.
रुग्णाला भेटायला एकावेळी दोनच माणसांना जाता येते. तेसुद्धा रुग्णाची इच्छा असेल व तो जागा असेल तरच.
कुठलेही सामान आत न्यायची परवानगी नाही पण भेटवस्तूंचे दुकानही आत आहे. अरोग्यपूर्ण आहार सर्वांसाठी अगदी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पण उपलब्ध आहे.
मी माझ्या बहीणीला भेटायला गेलो होतो तर ती रुमवर नव्हती. बाहेरच्या काऊंटरवर चौकशी केल्यावर मला तात्काळ तिला कुठल्या रुममधे नेलेय हे सीसी टीव्हीवर दाखवले व तिला आता लवकरच परत आणतील असे सांगून बसायला सांगितले.

-

के. ई. एम. ( परळ ) लोकमान्य टिळक ( सायन ) जरी सरकारी रुग्णालये असली तरी तिथे तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत. जरा नेट लावल्यास उत्तम ट्रिटमेंट मिळू शकते. पण सरकारी रुग्णालये असल्याने रुग्णांची खुप गर्दी असते.

००

माहीमचे रहेजा इन्स्टीट्यूट. मधुमेही रुग्णांच्या कुठल्याही गुंतागुंतीच्या आजारपणासाठी उत्तम. तज्ञ डॉक्टर्स आहेत आणि स्टाफही नम्र आहे.

त.टी. - बर्‍याच रुग्णालयातील डॉक्टर्स माझे खास मित्र असल्याने.. माझ्याकडे जरा जास्तच लक्ष देतात Happy
तात्पर्य : डॉक्टरांशी मैत्री करावी Happy

ज्यांना CGHS चे कार्ड मिळू शकते त्यांनी ते जरूर घ्यावे. आणि जवळपासच्या दवाखान्यात CGHS चालते की नाही याची चौकशी करून ठेवावी. व कार्ड वापरायचे कसे याचीही सगळी प्रोसीजर समजून घ्यावी. गरवारे कॉलेजच्या जवळच्या संजीवन हॉस्पिटल मधे CGHS चालते. अशा ठिकाणी हॉस्पिटलाझेशन, ऑपरेशन ई. CGHS कार्ड मुळे कॅशलेस होऊ शकते.

http://www.loksatta.com/pune-news/defraud-of-cghs-patients-by-private-ho...

बेफिकीर ,हा धागा उत्तररंग या मुखपृष्टगृप मध्ये नक्की आहे का ?विवेचनात तसा उल्लेख नाही .अथवा सामान्य धागा असावा .

१)वैद्यकीय विमा (मेडीक्लेम वगैरे ) :हा विमा शक्यतो वयाच्या पंचेचाळीसला सुरू करावा .काहींना नोकरीच्या ठिकाणी वै०सेवा मिळतात तरीही वेगळा विमा चालू करावा असे माझे मत आहे .काही वेळा नोकरीत बदल अथवा सोडली तरी फायदा होतो .वाढत्या वयाला ५८ नंतर प्रिमिअम जास्ती घेतात .तपासणीचीही फी वाढवतात .

२)दुसरा एक अपघात विमा स्टेट बँक त्यांच्या बचत खातेदारांना गेली २ वर्षे देत आहे .वार्षिक फक्त शंभर रुपयांत दोन लाखाचे उपचार (अपघातातील )करून घेऊ शकतो .फक्त एक फॉम सही करून द्यावा लागतो .

सर्वथा, सर्वकाळ अत्यावश्यक धागा सुरु केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

नाशिकमध्ये डॉ.आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे मल्टीस्पेशलिटी श्री.गुरुजी रुग्णालय गेली ५ वर्षे सुरु आहे. रुग्णालयाचे पूर्ण बांधकाम समाजाच्या आर्थिक पाठिंब्यावर झाले आहे.
योग्य दरात आवश्यक त्या आरोग्यसेवा हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळेच येथील ओपीडीपासूनची फी अनपेक्षितरित्या माफक आहे. रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. उच्चशिक्षित तज्ञ आहेत. सामाजिक बांंधिलकीच्या भावनेतुन ते कार्यरत आहेत. येथे रुग्णांना, नेमके काय झाले आहे, त्यावर कोणते उपचार आवश्यक आहेत, ते किती काळ चालणार आहेत हे समजावून सांगितले जाते. रुग्णांना पूर्णपणे विश्‍वासात घेऊन उपचार सुरु होतात. अनावश्यक चाचणी सांगितली जात नाही की औषधं दिली जात नाहीत.
आम्ही काही जण येथे सामाजिक भावनेतुन काही जबाबदारी सांभाळतो. म्हणुनच काही गोष्टी विश्‍वासाने सांगू शकतो.
www.shrigurujirugnalaya.com या वेबसाईटवर जाऊन कार्य समजावून घेता येऊ शकते.

सर्वजण चांगले व उपयुक्त प्रतिसाद देत आहेत हे पाहून आनंद झाला.

कृपया डेटासाठी सहाय्य करायला सुरुवात करावीत, मी ते मूळ लेखात घेत राहीन.

(कोणत्याही डॉक्टर्सचे वैयक्तीक मोबाईल नंबर्स देऊ नयेत, कोणाचेच वैयक्तीक मोबाईल नंबर्स देऊ नयेत, फक्त क्लिनिकचे द्यावेत. येथे रुग्णालये, क्लिनिक, अ‍ॅम्ब्यूलन्स, नर्सेस ब्युरो, वैद्यकीय उपकरणे पुरवणार्‍यांचे नंबर्स वगैरे अपेक्षित आहेत).

धन्यवाद!

(माझ्या आईच्या, दोन मित्रांच्या व माझ्या स्वतःच्या आजारपणामुळे माझ्याकडेही एक बर्‍यापैकी डेटा आहे तो मी लवकरच मूळ लेखात समाविष्ट करेन)

उपयुक्त ठरू शकेल असा धागा...

सर्वांनी आपापले अनुभव लिहीताना, ते अनुभव कोणत्या कालावधीत आलेले / घेतलेले आहेत त्याचा उल्लेख केल्यास ह्या धाग्याची व तयार होऊ घातलेल्या माहितीसंग्रहाची उपयुक्तता वाढेल.

चिंचवडच्या निरामय हॉस्पिटलचा अनुभव चांगला आहे.माझ्या आईचे नीरिप्लेसमेंट त्या हॉस्पिटलमधे झाले.डॉक्टरांसकट सर्व स्टाफचा चांगला अनुभव आला.तिथले डॉक्टर आमचे नातलग आहेत म्हणूनही कदाचित असेल.पण वडलांच्यावेळी पाहिले की इतर रूम्समधून चांगले लक्ष दिले जात होते.

कुणाला बोरीवलीमध्ये अपेक्स हॉस्पिट्लमध्ये ऑर्थोस्कोपिक सर्जरीचा अनुभव आहे का? असल्यास आपला अनुभव आणि डॉ. चे नाव वगिअरे माहिती मिळेल का?
धन्यवाद.