अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.
शेहनशाह अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरूख खान या बॉलीवूड सुपर्रस्टार्सनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली मालिका कौन बनेगा करोडपती यंदाच्या मराठी वर्जनमध्ये घेऊन येत आहे तुमचा आमचा लाडका स्वप्नील जोशी !
या मालिकेविषयी चर्चा करायला हा धागा !
पण नुसती चर्चाच करत बसू नका, तर खालील लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करून या पटकन..
कोणास ठाऊक स्वप्निल जोशी सोबत बसण्याचे आणि करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईलही..
ऑल द बेस्ट !!!!!!
लिंक - http://www.konhoeelmarathicrorepati.in/
श्री बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ प्रकाश आमटे संचालित हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प दवाखान्याच्या पुनर्निर्माणासाठी लोकबिरादरी मित्रमंडळ, पुणे यांच्यातर्फे आयोजित, श्री. अशोक हांडे प्रस्तुत 'मराठी बाणा'.
शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०१४
वेळ - सायं. ७ ते १०
स्थळ - गणेश कला क्रीडा, पुणे
***
नमस्कार
मी मराठी,भारत व भारतीय संस्कुती बद्दल अभीमान बाळगणारा.
व्यवसाया निमीत्त व करमणुकी साठी इन्टरनेट वापरणारा.
आपल्या नेहमी वाचनात येते की समाजातील अनेक माणसे याचा वापर आपले विचार, सुचना प्रर्दशीत करण्यासाठी करत असतात.
मलाही वाटायचे की आपणही आपले वीचार समाजा पर्यंत पोहोचवावेत. सर्वात मोठी अडचण होती मराठी टायपींगची. म्हटले सुरवात तर करुया जमेल हळु हळु. जसे
"केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहीजे."