सेवाभावी संस्था

सामाजिक उपक्रम २०१४ - आवाहन (सार्वजनिक धागा)

Submitted by सुनिधी on 10 March, 2014 - 09:57

नमस्कार,
सामाजिक उपक्रमाचे हे पाचवे वर्ष. हा उपक्रम आता तसा आपल्याला नवा नाही. तरीही नवीन सभासदांना माहिती व्हावी ह्यादृष्टीने ही थोडक्यात ओळख.

ह्या उपक्रमात दरवर्षी अशा गरजु संस्थांना वस्तुरुपात मदत केली जाते ज्यांना सरकारकडुन जास्त मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यकरुन फक्त देणगीदारांवर चालते. त्याकरता देणग्या मागवण्याचे हे आवाहन आहे.

देणग्या मार्च-एप्रिल ह्या २ महिन्यात मागवण्यात येतात. नंतर एकुण जमा झालेल्या निधीतुन संस्थांच्या प्राधान्यानुसार वस्तु खरेदी करुन त्यांना पोचवल्या जातात व त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते.

ही झाली थोडक्यात ह्या उपक्रमाची ओळ्ख.

"आदिवासी जोडप्याने साजरा केला प्रेमाचा दिवस हेलिकॉप्टरमध्ये"

Submitted by निलेश भाऊ on 18 February, 2014 - 02:26

एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.

Submitted by निलेश भाऊ on 14 February, 2014 - 03:21

एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.
DSCN5454.JPG

एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन

Submitted by निलेश भाऊ on 13 February, 2014 - 04:54

स्नेहालयास मदत

Submitted by विक्रम देशमुख on 5 February, 2014 - 06:17

प्रिय मित्रांनो , स्नेहालय परीवारातफे शुभेच्छा . आपण स्नेहालय परिवाराचे निकट सदस्य आहात. त्यामुळे एक महत्वाची विनंती आपणास करीत आहे. स्नेहालय सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. आपल्या संस्थेचे बहुतांश प्रकल्प लहान, वैयक्तिक देणगीदारांच्या समर्थनावर काम करत आहेत. परंतु आपली गंगाजळी रिकामी झाल्याने दरमहा खर्चाचे सुमारे १२ लाख रुपये आपल्याला कष्टपूर्वक गोळा करावे लागतात. सध्या एड्स बाधितांचे रुग्णालय, हिमातग्राम, स्नेहधार, रेदिओनगर ९०.४ F.M. , पुणे स्नेहधार प्रकल्प, बालभवन प्रकल्प, अनामप्रेम, स्नेहालय ई- विद्यालय, अशा प्रकल्पांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रांत/गाव: 

सामाजिक उपक्रम - वर्ष २०१४ - पूर्वतयारी (सार्वजनिक धागा)

Submitted by सुनिधी on 29 January, 2014 - 14:31

नमस्कार,
दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे सामाजिक उपक्रमाचे हे पहिले आवाहन.

गेल्या काही वर्षात आपण काही संस्थांना वस्तुरुपात मदत केली. त्या सर्वच संस्था शाळांशी निगडीत असल्याने त्यांना दरवर्षी मदतीची जरूर असतेच. त्यानुसार यावर्षी देखील जितकी मदत करता येईल ती करणार आहोतच पण त्याचबरोबर आपल्यापैकी कोणाची एखाद्या नवीन गरजु संस्थेची ओळख झाली असेल तर त्याबद्दलची माहिती मागवत आहोत.

ज्या संस्थेला वस्तुरुपात मदत हवी असेल त्याबद्दल खालीलपैकी शक्य तितकी माहिती द्यावी.

१. संस्थेचे नाव. (संस्था नोंदणीकृत असावी), संस्था कोणासाठी व कशा प्रकारचे काम करते याबद्दल थोडक्यात माहिती.

शब्दखुणा: 

स्वयं सेवक म्हणून अनाथाश्रम,अंधशाळा,वृद्धाश्रम इ. ठिकाणी पुण्यामध्ये काम करणार्या गटांबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by ठकुबाई_सुपरफास्ट on 15 January, 2014 - 05:22

स्वयं सेवक म्हणून अनाथाश्रम,अंधशाळा,वृद्धाश्रम इ. ठिकाणी पुण्यामध्ये काम करणार्या गटांबद्दल माहिती हवी आहे.

मी आंतरजालावरून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु जास्त माहिती हाती लागली नहि. इथे असलेल्या वाचक माबोलीकारांनी या विषयावर अधिक माहिती दिल्यास खूप धन्यवद. कोणी स्वतः अशाप्रकारचे काम करत असल्यास कृपया कामाबद्दल सविस्तार माहिती द्यावी जसे कि कामचे स्वरूप , किती तास काम करत होतात,या व्यतिरिक्त स्वताची मते.
या शिवाय जर कोणी बाबा आमटे ,प्रकाश आमटे यांच्या संस्थेमध्ये जाऊन ५-६ महिने काम केले असल्यास त्या बद्दल पण सविस्तर लिहावे हि विनंती.

मेळघाट मैत्री शाळा - एक झलक

Submitted by हर्पेन on 5 September, 2013 - 13:11

नुकताच मी मैत्रीतर्फे मेळघाटात जाउन परत आलो. खरेतर खूप जणांना, मैत्री आणि मेळघाट एकत्र उच्चारताच, सर्वप्रथम आठवतात, त्या वैद्यकीय संदर्भातील धडकमोहिमा. पण मी गेलो होतो शिक्षण संदर्भात हाती घेतलेल्या उपक्रमाकरता. मैत्रीच्या शैक्षणिक मोहिमेचे हे तिसरे वर्ष.

पहिल्या वर्षी शैक्षणिक वर्ष २०११-१२ शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता, चिलाटी येथे १०० दिवसांची निवासी शाळा आयोजित केली होती. याद्वारे ४३ मुलांना शाळेत परत प्रवेश घेण्याच्या दृष्टीने सक्षम करण्यात आले. त्या सर्वच्या सर्व मुलांनी त्यानंतरच्या वर्षी आपापल्या गावातल्या शाळेत प्रवेश घेतला.

Pages

Subscribe to RSS - सेवाभावी संस्था