जून २०१४ मधे 'डोअर स्टेप स्कूल'तर्फे 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अभियानासाठी पुण्यातल्या कन्स्ट्रक्शन साईट्सवरील कामगार वस्त्यांचा सर्व्हे सुरु होता. धानोरीतल्या एका साईटवर, ११ वर्षांची आरती, ८ वर्षांची भारती, आणि ६ वर्षांची प्रीती, या तीन मुली आपल्या आई-वडील आणि अजून एका लहान बहिणीसोबत राहत होत्या. या चौथ्या मुलीचं नाव जरा विचित्रच होतं - नाखुषी! त्यांची आई नंदाबाई सुरेश हिरवळे, या साईटवर मजुरी करुन आपला आजारी नवरा आणि चार लहान मुलींचा संसार चालवत होत्या. त्या चौथ्या मुलीच्या, नाखुषीच्या विचित्र नावाबद्दल विचारलं तर त्या म्हणाल्या की, तीन मुलींनंतर आम्हाला मुलगाच हवा होता, पण ही झाली...
माळीण गावावर कोसळलेल्या आपत्तीबद्दल आपण वाचलेच असेल. दुर्घटनेबद्दल समजल्यापासून रा. स्व. संघ आणि वनवासी कल्याण आश्रमाचे स्वयंसेवक घटनास्थळी अहोरात्र कार्यरत आहेत.
दुर्घटनाग्रस्तांना मदत व पुनर्वसन हा कामाचा पुढचा टप्पा आहे. माझा स्वतःचा या मदतकार्याशी थेट संबंध नाही. पण इथे केलेली मदत खर्या गरजूंपर्यंत पोहोचेल याची माझ्या या संस्थांबद्दलच्या गेल्या वीस वर्षांतील अनुभवावरून खात्री देऊ शकतो.
म्हणून त्यासाठीचे वनवासी कल्याण आश्रमाचे आवाहन इथे देत आहे.

आपण एक स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत असतो . असेच एक सुराज्याचे स्वप्न आई जीजाऊने पहिले 'श्रीमंतयोगी "शिवरायांच्या रूपाने साकार केले ... या स्वप्न पूर्तीसाठी त्यांना साथ लाभली ती या निष्ठावंत आणि उभ्या सह्याद्रीची …
पण आज त्यांचे सुवर्ण स्वप्नाची अनास्था आपण उघड्या डोळ्याने पाहत आलो , ज्यांच्या अंगाखांदयावर आपल्या पूर्वजांनी पराक्रमाचे रक्त वाहिले त्यांची अवस्था काय आहे आज ? त्यांच्या चिरा चीर्यातून मदतीची आर्त आपणास का ऐकू येत नाही ??
महिला दिन सामाजिक उपक्रम २०१४ आढावा
नेहमीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्यापैकी काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमासाठी मायबोलीवर आवाहन व घोषणा केली. या आवाहनातून वाचकांना त्यांच्या माहितीत असलेल्या, चांगले काम करणार्या गरजू व नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची नावे, त्यांबद्दलची माहिती आणि त्या संस्थेची सध्या काय गरज आहे ते कळविण्यास सांगितले. थोड्याच दिवसांत आपल्याकडे सात सेवाभावी संस्थांची माहिती व त्यांची निकड काय आहे याची एक मोठी यादीच जमा झाली. त्या माहितीची शहानिशा करून यादीतील संस्थांना मदत करण्यासाठी आपण मायबोलीवर एक जाहीर आवाहन केले.
“मैत्री शाळा 100 दिवसांची – आपल्या गावी” २०१४- २०१५
मेळघाट उपक्रमाचे स्वरूप.
''दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो |
जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात || ''
मेळघाट शैक्षणिक प्रकल्प समन्वयक व गावमित्र यांची पुणे भेट व कार्यशाळा १ मे ते ४ मे २०१४ - संक्षिप्त अहवाल
मेळघाटामध्ये ‘गावमित्र’ म्हणून काम करणारे मैत्रीचे १२ गावमित्र व १०० दिवसांची शाळा या शैक्षणिक प्रकल्पाचे मेळघाटातील स्थानिक समन्वयक (अशोक बेठेकर व रमेश मावस्कर) यांची पुणे भेट १ ते ४ मे २०१४ ह्या दरम्यान पार पडली.