जागृती

क्षमाशीलता

Submitted by सतीश कुमार on 17 October, 2019 - 13:05

मायबोलीवर एखाद्याने लेख लिहिला की त्याच्या वरती जे प्रतिसाद येतात त्यात लेखक / लेखिकेच्या मताशी सहमत अथवा विरुद्ध असे दोन तट पडतात. जे विरुद्ध असतात त्यांची मतं वाचली किंवा प्रतिक्रिया पाहिली की अगदी जहाल ते मवाळ असे सर्व प्रकार दिसतात. काही जण असे लिहितात की वाचल्यावर " आली मोठी शहाणी / शहाणा" " काय समजतो/ समजते स्वतःला " " अक्कल नाही तर लिहिते/ लिहितो कशाला" असा सूर असावा प्रतिक्रिया देतांना असं वाटतं. समजूतदार वाचक असतात ते " बरं लिहिलंय पण हे असं नको होतं, " ठीक आहे पण असा बदल केला असता तर, " मी या वाक्याशी सहमत नाही हे माझे वैयक्तिक मत आहे" वगैरे सौम्य भाषेत लिहितात.

सामाजिक कार्यकर्त्या आसावरी देशपांडे : मुलाखत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 24 April, 2014 - 05:48

अर्थसंकल्पाच्या विश्लेषणापासून आपल्या करीयरची सुरुवात करून कालांतराने नाशिक परिसरातील सेक्स वर्कर्स, समलिंगी व तृतीयपंथींच्यात एचआयव्हीसंबंधी जागृती निर्माण करताना सेक्स वर्कर्सच्या पुनर्वसनासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणार्‍या आसावरी देशपांडेंचा प्रवास हा नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळा आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने बघायला लावणारा आहे. त्यांचे काम जरी सेक्स वर्कर्स किंवा वारांगना, तृतीयपंथी लोकांच्यात एचआयव्ही जागृती संदर्भात असले तरी ह्या कामाचा संबंध संपूर्ण समाजाशी आहे.

ज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 16 June, 2011 - 09:58

सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ.

ग्राहका, फसवणुकीच्या "आयडीयांपासून" सावधान...!!!

Submitted by निमिष_सोनार on 10 November, 2010 - 02:02

खाली दिलेला प्रसंग नीट वाचा म्हणजे कदाचीत हे पुन्हा दुसर्‍या कुणासोबर घडणार नाही:


"माझा आयडियाचा प्रीपेड मोबाईल तीन वर्षांपासून आहे आणि तेही व्यवस्थित कागदपत्रके देवून घेतलेला आहे.
अचानक मला सप्टेंबर २०१० ला एस एम एस आला की कागदपत्रके जमा करा.
४ ऑक्टोबरला कागदपत्रके पूर्ण पणे भरून, तसेच फोटो देवूनही दसर्‍याला १७ ऑक्टॉबरला मोबाईल चे कॉल बंद झाले.
१६ तारखेला परत एस एम एस आला होता की कागदपत्रके परत जमा करा.
दसर्‍याला १७ ऑक्टॉबरला त्रास सहन करावा लागला तो वेगळाच.
ऑफिसचे कॉल महत्त्वाचे असल्या कारणाने मी दुसर्‍या कंपनीचा नंबर घेतला.
मग काही दिवस आयडीयाचे ऑफिस बंद होते.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - जागृती