स्वयंपाकाची उपकरणे

फ्रिजचा कॉम्प्रेसर बदलावा की फ्रिजच बदलावा?

Submitted by साधना on 10 June, 2018 - 14:25

गेली 18-19 वर्षे वापरात असलेल्या, आजवर कसलाही त्रास न झालेल्या गोदरेज डबल डोअर फ्रीजचे कूलिंग बंद, फक्त फ्रिजर फॅन सुरू हा प्रकार शनिवारी लक्षात आला. दुरुस्तीसाठी बोलावलेल्या माणसाने आधी काहीतरी लावून कॉम्प्रेसर सुरू होतो का पाहिले. तो न झाल्याने त्याने कॉम्प्रेसर उडाला, नवीन बसवा म्हणून सल्ला दिला.

नेटवर थोडी शोधाशोध केल्यावर फ्रीजचे आयुष्य 15 16 वर्षांचेच असते. इतक्या वर्षानंतर कॉम्प्रेसर गेल्यास तो परत घालण्यापेक्षा फ्रीज नवा घेणे चांगले हाच सल्ला वाचायला मिळतोय.

मायबोलीकरांचा अनुभव काय आहे?

कुकिंग गॅस सिलिंडर लॉक करायचा (कोणी वापरू नये म्हणून) काही उपाय आहे का?

Submitted by स्वप्ना_राज on 8 February, 2018 - 09:49

नमस्कार,

माझ्या एका मित्राचं सेकन्ड होम आहे. तिथे नेहमी कोणी रहात नाही. महिन्या-दोन महिन्यातून जातात. तिथला केअरटेकर कुकिंग गॅस वापरतो असं वाटतं कारण सिलिंडर हलका लागतोय. विचारलं तर नाही म्हणतो. अजून तिथे कॅमेरा लावलेला नाही. तो लावेस्तोवर सिलिंडर वापरता येऊ नये यासाठी काही लॉक मिळतं का ते पहातोय. सिलिंडर काढून दुसर्‍या रुममध्ये बंद करून ठेवणं हा पर्याय आहे पण लिकेजच्या भीतीने ते करायचं नाहिये. काही माहिती असेल तर प्लीज कळवा.

धन्यवाद!

पाहुणचार

Submitted by वाट्टेल ते on 9 November, 2017 - 14:54

अतिथी ही कल्पना भारतीय संस्कृतीतून उगम पावली आहे असे म्हणतात. ज्याला तिथी नाही, जो कधीही दत्त म्हणून उभा राहतो तो अतिथी. बदलत्या जीवनशैलीत किरकोळ अपवाद, जसे अधेमध्ये माझ्याकडे अंडी मागायला येणारी माझी गोरी शेजारीण वगळता, अतिथी असे कोणी उरले नाहिये. माणूस जन्माला येण्याची तिथीसुद्धा आता बऱ्यापैकी निश्चित करता येते. आमच्या माहितीतील एका डॉक्टरिणीला हे वेळेचे तंत्र अचूक अवगत आहे. दिवस भरून टेकीस आलेल्या बाईला ती रात्री १२ च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये यायला सांगते.

मायबोली गणेशोत्सव २०१७ - पाककृती स्पर्धा

Submitted by संयोजक on 18 August, 2017 - 10:51

आम्ही सारे नवशिके !!!!!!

Submitted by अतरंगी on 15 July, 2017 - 05:28

लोकांच्या मते एक वय असतं उत्साहाचं, उमेदीचं, काहीतरी शिकण्याचं, करून दाखवण्याचं........ त्या मताला कधीही काडीमात्र सुद्धा किंमत देऊ नये. Wink

पण कॉलेज संपलं, नोकरी लागली, लग्न संसार यात अडकलं की नवीन काहीतरी शिकण्याचा, करण्याचा उत्साह कमी होत जातो. वय, वेळ, affordability, संकोच, संसाराच्या जबाबदाऱ्या, लोकांच्या नजरा/टोमणे.... एक ना अनेक कारणं....

अरे आता या वयात कुठं जाऊ गाडी शिकायला?

अरे पण वेळ कुठंय? मुलांच्या शाळा, माझा जॉब, घराची कामं, जाणार कधी?

भारताच्या पुढचे प्रदुषणाचे आव्हान !!

Submitted by मिलिंद जाधव on 8 July, 2017 - 13:37

डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा गार्बेज रिसाक्लींग हा भारताचा एक ज्वलंत प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या भारतात प्लॅस्टीक
गार्बेज हे ईतर गार्बेजप्रमाणेच डंप केले जाते कारण काही तुरळक अपवाद सोडता भारतात प्लॅस्टीक रीसाक्लींगची ईफेक्टीव पद्धती वापरली जात नाही. प्लास्टीक गार्बेज हे डीग्रेडेबल नसल्याने ते ह्या डंप ग्राऊंड मध्ये मुळ रुपात तसेच रहाते.

सणाला खरेदी केल्यास काही फायदा होतो का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 March, 2017 - 11:05

असं म्हणतात केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. पण सणाला खरेदी केल्याने खरेच काही फायदा होतो का?

झाले काय, आमच्या एका फ्रिजने आज गचके देत आचके सोडले. तात्काळ नवीन घ्यायची वेळ झाली. पण नेमके परवाच गुढीपाडवा उलटला. तेवढीच कुठेतरी ‘लूट लो’ ऑफर मध्ये घुसलो असतो तर चार पैसे फायदा झाला असता. पण नजीकच्या काळात कुठलाही सण दृष्टीक्षेपात नाही जो रेफ्रिजरेटर घेत साजरा करता येईल. तर नाईलाजाने आताच घ्यावा लागणार. पण त्या आधी मनाचे समाधान म्हणून हा धागा.

सुपर सेव्हर स्टोरेज कंटेनर

Submitted by रतिका on 11 November, 2016 - 07:14

हा नवीन बाफ

सुपर सेव्हर स्टोरेज कंटेनर बद्दल कोणाला काही माहित आहे का?
सध्या नवीन किचन सेट बनविण्याचा विचार आहे. जागा सेव्ह होईल असे काही हवे आहे.
टवे ला काही OPTIONS आहे का??
सध्या बरेच OPTION दिसतात ऑनलाईन पण कळेना कोणता निवडावा.

पाड्यावरचा मुक्काम

Submitted by pratidnya on 26 September, 2016 - 13:59

गेल्या वर्षी स्वयंसेवक म्हणून जव्हार तालुक्यामधील कडाचिमेठ या वारली आदिवासी गावात दोन दिवस मुक्काम केला. मधल्या रिकाम्या वेळेत काही फोटोग्राफीचे उद्योग केले. त्यातले काही फोटो

कडाचिमेठची प्राथमिक शाळा.

IMG_9464.JPGIMG_9465.JPGIMG_9466.JPGIMG_9469.JPG

गावात फिरून काढलेले काही फोटो

स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे - २

Submitted by मॅगी on 21 June, 2016 - 05:59

मंजूडीच्या पहिल्या धाग्यावर २००० हून अधिक पोस्ट्स झाल्यामुळे हा दुसरा धागा काढला आहे..
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल हितगुज..

आता इथे वाजू देत भांड्याला भांडी Wink

पहिल्या धाग्यावरची चर्चा इथे पहाता येईलः
http://www.maayboli.com/node/6204

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - स्वयंपाकाची उपकरणे