फ्रिज

सणाला खरेदी केल्यास काही फायदा होतो का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 March, 2017 - 11:05

असं म्हणतात केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. पण सणाला खरेदी केल्याने खरेच काही फायदा होतो का?

झाले काय, आमच्या एका फ्रिजने आज गचके देत आचके सोडले. तात्काळ नवीन घ्यायची वेळ झाली. पण नेमके परवाच गुढीपाडवा उलटला. तेवढीच कुठेतरी ‘लूट लो’ ऑफर मध्ये घुसलो असतो तर चार पैसे फायदा झाला असता. पण नजीकच्या काळात कुठलाही सण दृष्टीक्षेपात नाही जो रेफ्रिजरेटर घेत साजरा करता येईल. तर नाईलाजाने आताच घ्यावा लागणार. पण त्या आधी मनाचे समाधान म्हणून हा धागा.

फ्रिज कुठल्या कंपनीचा घ्यावा?

Submitted by चैत्रगंधा on 2 May, 2014 - 07:28

गोदरेजचा ७ वर्षापूर्वी घेतलेला डबलडोअर फ्रिज निकालात निघाला आहे. डबलडोअर फ्रिजच्या किंमती ३०-४०,००० रेंज मध्ये असल्याने जो घेऊ तो टिकणारा हवाय. सद्ध्या सॅमसंग/ L.G. जास्त चालतात असे ऐकून आहे.
प्लिज सुचवा. Whirlpool बद्दल काय मत आहे?
असा कुठला धागा असेल तर प्लिज लिंक द्या.

Subscribe to RSS - फ्रिज