शटरस्पीड, प्रकाशचित्रणातला एक अतिशय महत्वाचा पैलू. काढला जाणारा प्रत्येक फोटो कसा दिसणार हे ठरवणारा हा एक महत्वाचा घटक. वेगात जाणाऱ्या गाडीचे फोटो असोत , मऊशार सिल्की, प्रवाही दिसणारे निर्झर असोत, आकाशात रंगांची उधळण करणारे फटाके असोत कि अंधाऱ्या अपुऱ्या उजेडात काढलेले देवळाचे गाभारे असोत. कुठल्याही फोटोमध्ये सगळ्यात आधी दिसून येतं ते जमलेलं किंवा हुकलेलं एक्स्पोजर अर्थात योग्य किंवा अयोग्य प्रमाणातला प्रकाश. आणि हां कंट्रोल करणारा एक महत्वाचा (एकमेव नाही हं!) पैलू म्हणजे शटरस्पीड.
कोणती गाडी घ्यावी इथे जाऊन आपण गाडी घेण्या संदर्भात चर्चा करतोय. तर गाडी घेतल्या नंतर काय काळजी घ्यावी, देखभाल (servicing) कुठे आणि केव्हा करावी, सुटे भाग कोणत्या कंपनीचे, कुठून आणावेत, फ्री सर्व्हिसिंग झाल्या असतील तर कोणाकडून करून घ्याव्यात, गाडीचा विमा कोणत्या कंपनीकडून करून घ्यावा, ओळखीचे मेकॅनिक... एक ना दोन हजार प्रश्न पडतात. आपल्यालाही असे प्रश्न पडले असतील किंवा या बद्दल काही माहिती असेल तर कृपया इथे लिहा.
विंडोजवर चालणार्या संगणकाला virus हा एक नेहमीचा प्रश्न असतो. अगदी त्या संगणकाला इंटरनेट जोडलेले नसले तरीही, पेन-ड्राईव्ह, मोबाईल इ. मधून हे अनाहूत पाहूणे कधी ना कधी तरी हजेरी लावतात.
या त्रासापासून मुक्त होण्यासाठी मग घेतले जातात अँटीव्हायरस.
आजचा हा लेख त्यावरच. अँटीव्हायरस घेताना आणि घेतल्यावर काय काय काळजी घ्यायची याची थोडक्यातमाहिती.
मी नुकतेच माझ्या दोन्ही काँप्यूटरसाठी काही अँटीव्हायरस वापरून पाहिले. त्याची comparison तुलना देत आहे.
१. AVG Antivirus - http://www.avg.com/in-en/homepage
मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असे टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ऑफिसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे. मराठीत स्वयंसुधारणा (एटो करेक्ट) ही सुविधा ओपन ऑफिससाठी मोफत व मुक्त स्रोत पद्धतीने वितरीत करायचा माझा प्रयत्न आहे. हे सॉफ्टवेअर आता ८०% पूर्ण झाले असून मोफत उपलब्ध आहे.
http://extensions.services.openoffice.org/en/project/AutocorrectMarathi
वर दिलेल्या पत्त्यावरून acor_mr-IN.dat ही फाइल उतरवून घ्या. व ती खाली दिलेल्या फोल्डरमध्ये साठवून ठेवा. आणि रायटर पुन्हा चालू करा.
रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तत्सम शाखांमधे होत असलेल्या संशोधनाविषयीच्या बातम्या, माहिती आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्याची इच्छा असलेल्या मायबोलीकरांसाठी हा धागा उघडल्या जातो आहे.
उदा: 'दोन तोंडांचं आणि सव्वा पाच पायांचं वासरू जन्माला आलं' वर्तमानपत्रातल्या अशा बातम्यांपेक्षा असं वासरू जन्माला येण्यामागचं शास्त्रीय कारण सांगणारा लेख असेल तर त्याचा दुवा दिलेला जास्त योग्य. 
http://www.plos.org/oa/index.php हा एक दुवा. इथे open access तत्त्वावर (फुकटात) peer reviewed journal papers वाचायला मिळतील.
नमस्कार,
अमेरिकेत जर वॉनेज चा (वॉइप) फोन असेल तर अॅडाप्टर भारतात नेउन तिथुन अमेरिकेत लोकल कॉल करता येतो. (महिन्याला $२५ = ११०० रु.)
इतर कुठला पर्याय आहे का? मॅजिक जॅक आहे पण त्याची क्वालिटी अगदीच खराब आहे असे ऐकले आहे.
धन्यवाद.
संगणक प्रकाशनने नुकतेच 1 मे रोजी 'संगणकावरील मराठी आणि युनिकोड' हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक माधव शिरवळकर यांनी सोप्या मराठी भाषेमध्ये लिहिलेले आहे. ह्यामध्ये एकूणच युनिकोड फाँट म्हणजे काय? त्याचा इतिहास, तो संगणकावर कसा बघाल, संगणकावर इन्स्टॉल कसा कराल?, मराठीमधून इमेल कशी पाठवाल, ब्लॉगवर मराठी लेखन कसे कराल, वेबसाईटवर मराठी कसे टाइप कराल अथवा मराठी सर्च कसा देऊ शकाल अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरे त्या पुस्तकात लेखकाने सचित्र उदाहरणासह स्पष्ट दाखविलेली आहेत. पुस्तकाची एकूण 208 पाने असून त्याची किंमत फक्त रू. 225 (पोस्टेजसहित) ठेवलेली आहे.
लोकसत्ता दिनांक २०/०३/२०१० च्या पुणे पुरवणीमधे पुढील माहिती आली ज्यात प्रत्येक वीज उपकरण किती वेळ वापरले असता किती युनिट वीज खर्ची पाडते ते दिले आहे. गरजवंतान्नी या माहितीचा लाभ घेऊन आपापल्या उपकरणांच्या वापरामध्ये योग्य तो बदल्/वेळेतील बचत्/काटकसर करावी या उद्देशाने ही माहिती इथे देत आहे.
याव्यतिरिक्त अजुन कुणास महत्वाचे सल्ले/मार्गदर्शन करायचे असल्यास त्याचेही स्वागत आहे.

लेख गुलमोहर - मागोवा विभागात जोडला आहे.