Submitted by मृण्मयी on 17 May, 2010 - 12:07
रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तत्सम शाखांमधे होत असलेल्या संशोधनाविषयीच्या बातम्या, माहिती आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्याची इच्छा असलेल्या मायबोलीकरांसाठी हा धागा उघडल्या जातो आहे.
उदा: 'दोन तोंडांचं आणि सव्वा पाच पायांचं वासरू जन्माला आलं' वर्तमानपत्रातल्या अशा बातम्यांपेक्षा असं वासरू जन्माला येण्यामागचं शास्त्रीय कारण सांगणारा लेख असेल तर त्याचा दुवा दिलेला जास्त योग्य.
http://www.plos.org/oa/index.php हा एक दुवा. इथे open access तत्त्वावर (फुकटात) peer reviewed journal papers वाचायला मिळतील.
ह्याच दुव्यावर चिकन गुनिया वर हे एक आर्टिकल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या क्षेत्रातल्या बातम्या
आमच्या क्षेत्रातल्या बातम्या इथे वाचा!
http://pubs.acs.org/cen/
नॅनोतंत्रज्ञानातील
नॅनोतंत्रज्ञानातील घडामोडींविषयी माहिती देणारं संकेतस्थळ -
www.azonano.com
हे खुप जनरल होतय. आपापल्या
हे खुप जनरल होतय. आपापल्या क्षेत्रातील एखादी बातमी निवडुन त्यावर एखादा परिच्छेद टाका की!
नुसते लिंक टाकण्याऐवजी जर
नुसते लिंक टाकण्याऐवजी जर कुणी स्वतः काही लिहिले तर वाचायला आवडेल.
एका दिर्घीकेतुन फेकल्या
एका दिर्घीकेतुन फेकल्या गेलेले कृष्णविवरः
http://www.csmonitor.com/Science/Cool-Astronomy/2010/0514/Supermassive-b...
मस्त आहे ब्लॅकहोलची लिंक
मस्त आहे ब्लॅकहोलची लिंक
चिकनगुनियाची जरा किचकट वाटली पण माहिती म्हणून वाचली. माझ्या बुद्धीचा दोष
चंपक आणि चिनूक्सच्या वाचायच्यात अजून.
मृण्मयी, इथे बरीच माहिती मिळेल असे वाटतेय विविध संशोधनांची. धन्स
मी ती लिंक दिली, कारण
मी ती लिंक दिली, कारण सर्वांना किमान ह्या क्षेत्रातील अपडेट वाचता येईल. वेळोवेळी एक बातमी देऊन त्यावर विश्लेषण पुढे होईलच..
मृ, भारी बाफ उघडलास. इथून
मृ, भारी बाफ उघडलास.
इथून आता मायबोलीकरांनी टाकलेल्या दुव्यांतून आपली माहिती अद्ययावत ठेवायला मदत होईल.
सगळ्यांना धन्यवाद! लिंक्स
सगळ्यांना धन्यवाद! लिंक्स बघते.
आशिष, तू म्हणतोस ते बरोबर आहे. खूप जनरल होतंय. पण मला विज्ञानविषयक बातम्यांचं वर्गीकरण कसं करावं, सगळ्यांना समजेल अशा म्हणजे कितपत खोलवरच्या बातम्या द्याव्या हे अद्याप जमलं नाहीये. कृपया ह्याबाबत मदत करा, सुचवा.
>>चिकनगुनियाची जरा किचकट वाटली पण माहिती म्हणून वाचली. माझ्या बुद्धीचा दोष.
नाही नाही. मला तिथे ती लिंक देताना, त्या विषयाशी संबंधीत बरीच सखोल माहिती हवी हे लक्षात आलं नाही. युनिव्हरसिटीतून बाहेर पडल्यावर उत्तमोत्तम (आणि फुकट) जर्नल्स, रीसर्च पेपर्सना असलेला अॅक्सेस बंद झाला. त्यामुळे ही नवी साइट मिळाल्यावर फारच आनंद झाला. आणि त्या भरात त्यातल्या त्या पेपरचा दुवा इथे डकवला.
मी ज्या प्रयोगशाळेत काम करत होते तिथे मुख्यत्त्वे या बॅक्टेरियमशी संबंधीत काम चालायचं. त्या संदर्भात आणि एकूणच Nuclear import and export in plants and animals माझ्या प्रोफेसरांनी एडिट केलेलं पुस्तक. Cell Biologyच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त.
नमस्कार लोकहो , वेबमास्टरांचे
नमस्कार लोकहो , वेबमास्टरांचे एक पोस्ट उधृत करतो आहे. ह्या लिंका, कृपया कानोकानीमध्येसुद्धा दिल्यात तर अजूनच फायदा होईल !
सगळ्यांना एक विनंती.
कुठल्याही आवडत्या ब्लॉगची लिंक इथे देण्याऐवजी, कानोकानी.कॉम मधे द्यावी त्यासाठीच ती सोय केली आहे. लेखात एखाद दुसरी द्यायला हरकत नाही पण हळूहळू इतरही त्यांचे आवडते ब्लॉग इथेच सांगत आहेत.
इथे लिंक दिली कि विषय ताजा आहे तोपर्यत इथून थोड्या टिचक्या मिळतील. कानोकानीवर कोण जाऊन पाहणार असे वाटणे साहजिक आहे. पण कानोकानीवर आपोआप जी वर्गवारी होते ती इथे होऊ शकत नाही.
वेगळ्या भाषेत सांगायचं तर अशी कल्पना करा एका ठिकाणी आठवड्याचा बाजार भरला आहे. आणि शेजारी नवीन वाचनालय उघडलंय. पुस्तक आठवड्याच्या बाजारात एका ढिगात टाकलं तर जास्त लोकांपर्यत पोहोचेल असे समजून एकामागे एक त्या ढिगात जर पुस्तके पडायला लागली तर किती पुस्तके पाहिली जातील? किंवा पाहिली गेली तरी किती वाचली जातील? आणि बाजाराचा दिवस संपल्यावर काय? तो ढीग तसाच पडून राहणार?
आणि ते पुस्तक जर वाचनालयात एका वेगळ्या कप्प्यात ठेवलं तर त्या एका दिवसात (बाजाराच्या दिवसात) कमी लोक वाचतील पण नंतरच्या काही महिन्यात वाचनालयातले पुस्तक शोधायला सोपे आणि म्हणूनच परत परत वाचले जाऊ शकेल. योग्य त्या विभागात असल्यामुळे त्या विषयाची आवड असलेले लोक जास्त वाचतील.
ढिगार्यातले कुठले पुस्तक लोकप्रिय आहे, कुठले नाही हे कळायचा मार्ग नाही. मला एखादे पुस्तक आवडले तरी ते चांगले आहे हे मला ढिगार्यात सांगता येत नाही. त्यामुळे नवीन पुस्तकं आली की चांगली पण अगोदर आलेली ढिगार्यात दडपून जाणे शक्य आहे. वाचनालयात अभिप्रायाची सोय आहे. त्यामुळे चांगल्या लेखकाला वाचकांपर्यंत पोहोचणे सोपे आहे.
ढिगार्याचा एक फायदा जरूर आहे. कष्ट घ्यावे लागत नाही, नुसते पुस्तक फेकले की काम झाले. पण मला जर लेखक आवडत असेल, आणि खरोखर तो वाचकांपर्यंत पोहोचावा असे वाटत असेल तर वाचनालयात ते पुस्तक ठेवणे (म्हणजेच कानोकानी.कॉम मधे योग्य त्या विभागात लिंक देणे) जास्त योग्य होईल.
(वर लिहिलेले आठवड्याचा बाजार हे एक उदाहरण म्हणून दिले आहे. त्यापेक्षा त्यातून जास्त काही अर्थ काढू नये. या लेखाचे शिर्षक, विषय, लेखक इतर काही असते तरी मी हेच उदाहरण दिले असते)
हे दुवे कानोकानीइतकेच इथे पण
हे दुवे कानोकानीइतकेच इथे पण देणं महत्त्वाचं ठरेल का? कारण तिथे फक्त दुवे देता येतील. पण त्या दुव्यांच्या अनुषंगानं चर्चा, माहिती हे या बातमीफलकावर लिहिता येईल.
कानोकानी मध्ये दुवे देणे
कानोकानी मध्ये दुवे देणे योग्यच आहे. तिथे ही प्रतिसादातुन चर्चा केली जाउ शकते.
माझ्या बाबतीत, चर्चा ह्याच बीबी वर व्हावी. तिकडे, उगाच इथे कुठे आलो? असे होते!
चंपक >> हो ना अगदी
चंपक >> हो ना अगदी
मला तर हा कानोकानी काय
मला तर हा कानोकानी काय कन्सेप्ट आहे तोच कळला नाही अजून
आबुदोस, दुसरं काय?
तसेच मेन पेज वर काही आर्टिकल्स कारण नसताना महिनोन महिने ठाण मांडून बसलेली असतात. नन्तर ते फार इरिटेटिंग व्हायला लागतं...
म्हातार्यांना आशादायी बातमी:
म्हातार्यांना आशादायी बातमी: जुन्या आणि बाल्यावस्थेसारख्या मेमरीज परत मिळवता येण्याची शक्यता:
http://hplusmagazine.com/articles/neuro/switch-memory
>>कारण तिथे फक्त दुवे देता
>>कारण तिथे फक्त दुवे देता येतील.
बरोबर, इथे तर द्यावेच दुवे, पण कानोकानीमध्ये दिल्यास ते कायम बघितले जातील.
जसे की चंपक किंवा क्साने दिलेले दुवे.
http://www.hindustantimes.com
http://www.hindustantimes.com/US-team-creates-first-synthetic-life/H1-Ar...
The method could be used to
The method could be used to design bacteria specifically to help produce biofuels or to clean up environmental hazards, said the study carried out by the J Craig Venter Institute, and published in the journal Science.
"This becomes a very powerful tool for trying to design what we want biology to do. We have a wide range of applications (in mind)," said Venter, co-author of the first sequencing of the human genome in 2000.
>>>>> हे कस्टमाईझ्ड बॅक्टेरिया (especially those, decomposing wastes without emitting greenhouse gases) बनवणे आणि ते विदाऊट म्युटेशन मल्टिप्लाय करणे म्हणजे ग्रेट !
इंटरेस्टींग आहे हा धागा.
इंटरेस्टींग आहे हा धागा.
http://apod.nasa.gov/apod/archivepix.html
नासाचे पिक्चर ऑफ डे ची ही साईट आहे. ज्यांना विवीध ग्रहांची, तार्यांची आणि आकाशगंगांची छायाचित्रे पाहायला आवडते, त्यांच्यासाठी इंटरेस्टींग साईट आहे. तसेच इथे काही स्पेस आर्ट, अॅनिमेशन क्लिपही पहायला मिळतील. आपल्या पृथ्वीवरीलही काही अनोखी प्रकाशचित्रे आहेतच.
(इथे फक्त बातमी देणे अपेक्षित असेल तर वरची साईट इथे देण्यात मी गल्लत केली असे वाटतेय. पण असो ! )
आशिष, यावेळच्या Scientific
आशिष, यावेळच्या Scientific American मधे (आणि आधीच्या काही महिन्यांमधे) या संदर्भात सुरेख आर्टीकल्स आली आहेत. Alzheimer's: Forestalling the Darkness हे एक वाचण्यासारखं आर्टीकल.
Washing carbon out of the air हे असंच एक उत्तम आर्टीकल. काही शास्त्रज्ञ वातावरणातला कार्बन डाय ऑक्साइड कमी करण्यासाठी रासायनिक प्रक्रियेतून CO2 'sorbent material' शी chemically बांधल्या जाईल अशी prototypes तयार करताहेत.
एरवी या मासिकात सर्वसाधारणतः सगळ्यांना समजेल अशा भाषेत लेख असतात. पण आताच्या अंकातला Is time an illusion? झेपला नाही. समजायला लई बिकट! पुन्हा वाचावा आणि कोणाकडून तरी समजून घ्यावा लागेल. कोणी subscribe करतं का?
याच अंकात '12 events that will change everything' हा एक झकास लेख वाचला. त्यात creation of life Synthetic biology remakes organism, but can it bring inanimate matter to life? हा मुद्दा 'Almost Certain' या गटात घातलाय. बाकीच्या ११ बाबी:
cloning a human - Likely
extra dimension - 50:50
extraterrestrial intelligence - unlikely
nuclear exchange - unlikely
room temperature superconductors - 50:50
machine self-awareness - likely
polar meltdown - likely
pacific earthquake - almost certain
fusion energy - very unlikely
asteroid collision - unlikely
deadly pandemic - 50:50
असं वर्गीकरण केलंय. प्रत्येकीचं कारण देखिल सांगितलं आहे. एकूण interesting!
प्रकाश, डोळ्याचं पारणं फेडणारे फोटो. त्यांच्या दुव्याकरता धन्यवाद!
फक्त दुवे देऊन इथे चर्चा
फक्त दुवे देऊन इथे चर्चा करण्यापेक्षा कृपया कानोकानी इथे करावी. अशा गोष्टींसाठीच आपण कानोकानीची सुरुवात केली आहे. तिथेही चर्चा करता येते.
असं पहा विज्ञानाशी निगडीत जगातल्या सगळ्या विषयांच्या लिंक्स आणि त्याही प्रतिसादातून देऊन नंतर शोधायला किती अवघड होईल याचा थोडा विचार करा. अगदी गुगलून पाहिल्यावर एखाद्या पानावर ती लिंक सापडलीही तरी पानाची सुरुवात किंवा इतर प्रतिक्रिया वेगळ्या असल्याने काहीहि कळणार नाही.
उदा. मी जर " कार्बन डाय ऑक्साइड" शोधलं तर हे पान येऊ शकतं. (मृण्मयी | 21 May, 2010 - 09:28 ही प्रतिक्रीया) पण पानावर सुरुवातीला चिकनगुनियाची लिंक दिसली तर याच पानावर खाली कार्बन डाय ऑक्साइड आहे हे कळणार कसं. आणि प्रतिक्रिया दुसर्या पानावर गेल्या की आणखीनच अवघड होत जाणार. थोडक्यात आपण इथे लिंक दिली आणि त्याच दिवशी ३-४ प्रतिक्रिया आल्या याचं समाधान मिळण्यापेक्षा याचा काही उपयोग नाही.
चिकनगुनिया, नॅनोतंत्रज्ञान, कृष्णविवर, बॅक्टेरियम,बाल्यावस्थेसारख्या मेमरीज, नासा, Alzheimer, कार्बन डाय ऑक्साइड हे सगळं एकाच पानावर आहे.
वर लिहल्याप्रमाणे परत फक्त एक नवीन ढीग तयार होतो आहे. "स्वांत सुखाय" यासाठी हे असेल तर गोष्ट वेगळी. पण जर इतरांना हे माहिती व्हावं हा उद्देश असेल तर तो नक्कीच साध्य होत नाहीये.
.
.
मृण्मयी, छान लिहिले आहेस. मी
मृण्मयी, छान लिहिले आहेस. मी सबस्क्राईब करतो. टाईम वरील लेख वाचला नाही अजुन. लिहु शकेन त्यावर.
इथे उगीच अजुन चर्चा होऊ नये म्हणुन कानोकानी की पानोपानी असा दुसरा धागा उघडला आहे.
http://www.maayboli.com/node/16358
गुरुग्रहाचा एक पट्टा हरवला
गुरुग्रहाचा एक पट्टा हरवला आहे ...
http://www.cnn.com/2010/TECH/space/05/20/jupiter.cloud.belt.missing/?hpt=T2
हिग्सची शर्र्यत LHC
हिग्सची शर्र्यत LHC हारणार?
http://www.newscientist.com/article/mg20727702.900-old-faithful-tevatron...
अमेरिकेत शिकायला येणार्या,
अमेरिकेत शिकायला येणार्या, मुख्यतः जीवशास्त्रासंबंधी ग्रॅज्युएट पदवी घेणार्या विद्यार्थ्यांसाठी एक बातमी.
हावर्ड ह्यूजच्या आणखी फेलोशिप्स असतील तर माहिती गोळा करून टाकेन.
रिचर्ड लीकी : Evolution
रिचर्ड लीकी : Evolution Debate Soon Will Be History
यात आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे हे आमच्या स्टोनीब्रूक युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक!
मृण्मयी शौर्य रे च्या
मृण्मयी
शौर्य रे च्या बातमीबद्दल आम्हाला समजावून सांगावं..
>>शौर्य रे च्या बातमीबद्दल
>>शौर्य रे च्या बातमीबद्दल आम्हाला समजावून सांगावं..
काय बातमी आहे? माफ करा, मूळ मुद्दलाचंच माहिती नाही. तेव्हा व्याजाबद्दल काही बोलता येत नाही.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/35249
हे घ्या मुद्दल आणि व्याज द्या बघू. नावच अक्षरशत्रू असल्यानं काहीच समजलं नाही. शेवटी तुमच्या दरबारात धाव घेतली बघा...
Pages