चुंबकीय क्षेत्र आणि विद्युतक्षेत्र यांत घनिष्ट संबंध असल्याचे खूपच पूर्वीपासून लक्षात आलेले आहे. एका क्षेत्रात कुठलेही बदल घडत असल्यास ते दुसर्या क्षेत्रास जन्म देतात असेही आढळून आले. या नव्या क्षेत्राच्या निर्मितीची दिशा निश्चित करणारा अभ्यास फ्लेमिंग यांनी केला होता.
लोक्स PC संदर्भात मार्गदर्शन हवं आहे.
माझ्या घरच्या कॉम्पुटरचा मॉनिटर अचानक मधेच बंद होतो. म्हणजे ठराविक वेळ झाल्यावर नाही - कधीही आणि फक्त मॉनिटरच बंद होतो. CPU व्यवस्थित सुरु असतो. काही वेळाने अचानक सुरु होतो. मग परत काही वेळाने बंद. हा "काही वेळ" ५ मिनिटं पण असू शकतो आणि अर्धा-पाऊण तास पण.
मॉनिटर तपासून झालाय आमच्या कॉम्प्वाल्याकडून आणि तो त्यांच्याकडे ओक्के चालतोय - असं त्याचं म्हणणं आहे. त्याने फार वेळ चालवून पाहिला नसावा.
आता तो बहुतेक CPU घेऊन जाईल. मी सगळे सेटिंग बघितले. मॉनिटर अचानक बंद पडेल असं काहीही नाहीये.
सगळे स्विचेस, वायरी लूज कनेक्शनसाठी तपासून झाल्या आहेत.
गेले काही दिवस बर्याच ठिकाणी, आपल्या संस्कृतीला लोक नाव ठेवताना दिसली. धर्मावरुन वाद विवाद वाचले. वट सावित्री कसा बुरसटलेला सण आहे हे वाचले. कीव आली आजच्या सो कॉल्ड "आधुनिक विचार सरणीची".
ते सात जन्म आणि यम या पलिकडे आपण जात नाही, ग्लोबल वॉर्मींग बद्दल चर्चा हिरीरीने करतो. मग मॅरेथॉन काय, अर्थ डे, ग्रीन डे काय? हे डे साजरे करणे म्हणजे पुढारलेपण का? वट सावित्री राहो पुराणात पण "Big Banyan day" असं तरी काही साजर करा. एक झाड (सण) मोडलत तरी एक नविन झाड लावालाना, सगळ उजाड करणारी आधुनिकता कसली?
अनुदिनी: वातकुक्कुट. हवामानशास्त्राची ओळख मराठीतून.
http://vatkukkut.wordpress.com/
अनुदिनीकार: वरदा वैद्य
अनुदिनीची सुरूवात: नोव्हेंबर २००६
अनुदिनीची वाचकसंख्या: २०१० मध्ये २,९००
अनुदिनीतील एकूण नोंदी: २३
ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग जॉब
सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग शिकलं तर ऑन लाईन जॉब मिळू शकतात का? मध्ये मी एक अशी वेब साइट पाहिली होती. तिच्यावर घेतलेलं काम काही दिवसात पूर्ण करुन द्यायला लागायचं.
ज्याला प्रॉग्रॅमिंग माहीत नाही, त्याने शिकताना कसे आणि काय शिकावे?
आपली स्थापित वीजनिर्मितिक्षमता आणि वर्तमान पंचवार्षिक योजनेदरम्यान (२००७-२०१२) त्यात आपण घालणार असलेली भर खालील तक्त्यात दाखवलेली आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचा, जानेवारी २००८ मध्ये, असा दावा आहे की २०१२ मध्ये खालीलप्रमाणे स्थापित क्षमतेत भर पडल्यास आपल्या ऊर्जाविषयक गरजा पूर्णपणे पुरवता येतील.
ऊर्जेचे अंतरंग-११: दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरज
आपल्या दैनंदिन व्यक्तीगत शारीरिक गरजेकरता लागणारी ऊर्जा, घरगुती उपकरणांसाठी प्रतिदिन लागणारी ऊर्जा, आपल्याला दररोज उष्णता, उजेड, वारा, पाणी, वातानुकूलन, परिवहन इत्यादी गरजांसाठी लागणारी ऊर्जा लक्षात घेतली आणि ती आपण मिळवतो कशी ह्याचा ताळेबंद लक्षात घेतला तर आपण तिच्या निरंतर उपलब्धतेसाठीचे नियोजन व्यवस्थित करू शकू.
प्रथमतः आपल्या दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरजांचा ताळेबंद पाहू. आपल्याला दैनंदिन व्यक्तिगत शारीरिक गरजेसाठी ऊर्जा लागते किती आणि मिळते कशी (कशातून) ? प्रथम बघू या, लागते किती ते.