बऱ्याच दिवसांचा ब्रेक झालाय नाही? तुम्हाला या दरम्यान वेगवेगळे प्रयत्न करून बघायचा कदाचित मोका मिळाला असेल.मागे आपलं शटरस्पीड बद्दल वाचून झालंय ना? यावेळी आपण फोटोग्राफीचा अजून एक महत्वाचा भाग पाहुयात. तो म्हणजे अॅपर्चर.
तुमचा कॅमेरा मध्ये मी अॅपर्चर काय असतं त्याची अगदी थोडक्यात माहिती दिली होती.
शटरस्पीड, प्रकाशचित्रणातला एक अतिशय महत्वाचा पैलू. काढला जाणारा प्रत्येक फोटो कसा दिसणार हे ठरवणारा हा एक महत्वाचा घटक. वेगात जाणाऱ्या गाडीचे फोटो असोत , मऊशार सिल्की, प्रवाही दिसणारे निर्झर असोत, आकाशात रंगांची उधळण करणारे फटाके असोत कि अंधाऱ्या अपुऱ्या उजेडात काढलेले देवळाचे गाभारे असोत. कुठल्याही फोटोमध्ये सगळ्यात आधी दिसून येतं ते जमलेलं किंवा हुकलेलं एक्स्पोजर अर्थात योग्य किंवा अयोग्य प्रमाणातला प्रकाश. आणि हां कंट्रोल करणारा एक महत्वाचा (एकमेव नाही हं!) पैलू म्हणजे शटरस्पीड.