दुचाकी, चारचाकी: देखभाल/सुटे भाग इ.

Submitted by mrdmahesh on 10 August, 2010 - 05:03

कोणती गाडी घ्यावी इथे जाऊन आपण गाडी घेण्या संदर्भात चर्चा करतोय. तर गाडी घेतल्या नंतर काय काळजी घ्यावी, देखभाल (servicing) कुठे आणि केव्हा करावी, सुटे भाग कोणत्या कंपनीचे, कुठून आणावेत, फ्री सर्व्हिसिंग झाल्या असतील तर कोणाकडून करून घ्याव्यात, गाडीचा विमा कोणत्या कंपनीकडून करून घ्यावा, ओळखीचे मेकॅनिक... एक ना दोन हजार प्रश्न पडतात. आपल्यालाही असे प्रश्न पडले असतील किंवा या बद्दल काही माहिती असेल तर कृपया इथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाडीचे टायर्स जुने झालेत. एक दोघांनी सल्ला दिलाय ट्यूबलेस टायर घे. ट्यूबलेस टायर्सचे फायदे/तोटे कुणी सांगेल काय? धन्यवाद

मागच्या वायपर्सची गरज पडते का? मी शक्यतो रात्री गाडी चालवत नाही, दिवसासाठी आवश्यक असेल का? आता पावसाळा येतोय, त्यासाठी विचार आहे.
तसच पावसाळ्यात घ्यायची काळजी याबद्दल कोणी लिहू शकेल का?

मागच्या वायपर्सची गरज पडते का? मी शक्यतो रात्री गाडी चालवत नाही, दिवसासाठी आवश्यक असेल का? >> मागची काच फारच खराब झाली असेल तर उपयोगात येतो रीअर वायपर. पावसाळ्यात ती काच होतेच खराब... गाडी चालवताना मग बसल्या बसल्या साफ करता येते...