विंडोजवर चालणार्या संगणकाला virus हा एक नेहमीचा प्रश्न असतो.

Submitted by चेतन पंत on 21 July, 2010 - 03:18

विंडोजवर चालणार्या संगणकाला virus हा एक नेहमीचा प्रश्न असतो. अगदी त्या संगणकाला इंटरनेट जोडलेले नसले तरीही, पेन-ड्राईव्ह, मोबाईल इ. मधून हे अनाहूत पाहूणे कधी ना कधी तरी हजेरी लावतात.
या त्रासापासून मुक्त होण्यासाठी मग घेतले जातात अँटीव्हायरस.

आजचा हा लेख त्यावरच. अँटीव्हायरस घेताना आणि घेतल्यावर काय काय काळजी घ्यायची याची थोडक्यातमाहिती.

मी नुकतेच माझ्या दोन्ही काँप्यूटरसाठी काही अँटीव्हायरस वापरून पाहिले. त्याची comparison तुलना देत आहे.

१. AVG Antivirus - http://www.avg.com/in-en/homepage
चांगले - फुकट मिळत असल्याने प्रसिध्द, अपडेट फाईल डाऊनलोड करून मग अपडेट करता येतो त्यामुळे इंटरनेटची गरज नाही.
वाईट - स्कॅनिंग करताना फार खोलवर जात नाही. व्हायरस ओळखण्याची ताकद कमी आणि काम करयाला बर्‍यापैकी जड (CPU usage जास्त)

मत - वाईट.

२. AVAST Antivirus home edition - http://www.avast.com/free-antivirus-download
चांगले - फुकट, अपडेट फाईल लहान असल्याने झटकन अपडेट होतो.
वाईट - स्कॅनिंग ठीकठाक, व्हायरस बर्‍यापैकी ओळखतो, पण currupt files रिपेअर करणे याला फारसे जमत नाही. जास्त भर फाईल Delete करण्यावर असतो.

मत - बरा - डायल अप किंवा मोबाईल इंटरनेट वापरणार्‍यांनी वापरयाला हरकत नाही.

३. Quick heal - trial version http://www.quickheal.co.in/downloads.asp
चांगले - हा पुणेरी अँटीव्हायरस वापरायला सोपा आहे, DNAScan तंत्रज्ञानामुळे व्हायरस थांबवतो (पसरू देत नाही) असे कंपनी म्हणते. वापरायला हलका (Less CPU Usage), अँटीव्हायरसमध्येसुध्दा website ब्लॉ़कींगउपलब्ध.
वाईट - स्कॅनिंग चांगले, व्हायरस बर्‍यापैकी ओळखतो, पण काही व्हायरस याला Startup मधून काढून टाकतात, आणि त्यावेळी manually अँटीव्हायरस सुरु करावा लागतो. काही (जसे की autorun, dx.dll/scr.ini) वर फार प्रभावी नाही.

मत - चांगला पण संपूर्ण संरक्षणासाठी बरोबर एखादे anti-malware (जसे की removeit pro) वापरावे

4. Kaspersky Internet Security 2010 - http://www.kaspersky.com
चांगले - अप्रतिम आणि संपूर्ण अँटीव्हायरस, सर्व प्रकारचे संरक्षण (web, IM, Parental Control, Application, antivirus, hacker-shield etc.) देतो. संपूर्ण रंग बदलणारा interface धोक्याची सूचना लगेच देतो. किंमतीलापरवडेल असा आहे.
वाईट - वापरायला थोडा कठीण आहे. काही applications जसे की mediaplayer classic ला बंद करतो. अपडेटचीसाईज थोडी जास्त आहे.

मत - चांगला. फक्त अपडेटसाठी शक्यतो ब्रॉडबँड इंटरनेट असावे.

५. Norton Internet Security 2010 - http://www.symantec.com/downloads/index.jsp
चांगले - जगातील सर्वोत्कृष्ट अँटीव्हायरसपैकी एक. संपूर्ण विश्वासार्ह संरक्षण. अपडेट फाईल डाऊनलोड करतायेते, त्यामुळे इंटरनेट शिवाय पण अपडेट होतो
वाईट - महाग आहे. काँप्यूटरचे काम हळू करतो, कारण resource usage जास्त आहे.मो अपडेट साईज मोठी आहे

मत - उत्कृष्ट. ब्रॉडबँड इंटरनेट आणि वेगवान संगणक असेल तर जरूर वापरावे.

इतरही अनेक अँटीव्हायरस उपलब्ध आहेत जसे की, McAffee, e-Scan, NOD32, CA antivirusm, AntiVir, Net Protector इत्यादी. मी अजून ते वापरून पाहिलेले नाहीत. वापरल्यावर इथे नक्की लिहेन.

अँटी व्हायरस बरोबर अजून काही सॉफ्टवेअर्स जरूर वापरावीत.
१. RemoveIT Pro - हा anti-Malware आहे. घरगुती वापरासाठी फुकट उपलब्ध आहे. इथे पहा
२. Anti-trojan -ट्रोजन आपल्या काँप्यूटरमध्ये हेराचे काम करून आपली माहिती बाहेर पाठवतात. ट्रोजनकाढण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरावे. अशी अजून सॉफ्टवेअर आहेत. त्याबददल नंतर कधीतरी.
३. RRT - Remove Restrictions Tool - इथे पहा - जेव्हा व्हायरसमुळे task manager, folder options, registry editor वगैरे बंद होतात तेव्हा ते पुन्हा चालू करण्यासाठी हे टूल मदत करू शकते.

काही टिप्स
१. कोणताही अँटीव्हायरस पूर्ण संरक्षणाची खात्री देत नाही, आपण काळजी घेणे हे गरजेचे आहे.
२. जेव्हा अँटीव्हायरस काहीही report देइल तेव्हा तो पूर्ण वाचा. न बघता OK करू नका.
३. अँटीव्हायरस हे precautionary measure आहे. काहीवेळा व्हायरस infect झाल्या नंतर अँटीव्हायरस install होऊ शकत नाहीत.
४. केवळ अँटीव्हायरस असून भागत नाही. त्याला वेळच्या वेळी अपडेट करा, आणि full system scan महिन्यातून एकदा तर कराच.
५. पायरेटेड अँटीव्हायरस (किंवा कोणतेही सॉफ्टवेअर) वापरू नका. हा गुन्हा आहेच तसेच ते सॉफ्टवेअर पूर्णपणे काम करेल याची खात्री नसते.
६. फुकट मिळणारे सर्व अँटीव्हायरस चांगले असतात असे नाही. (मी अँटीव्हायरसची तुलना पहा)
७. बाहेरील storage media जोडतांना, ते स्कॅन करून घ्या.
८. Paid अँटीव्हायरस घेण्याअगोदर त्याचे DEMO version, डाऊनलोड करून वापरून पहा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीकरता धन्यवाद..
मालवेअरच्या परिच्छेदामधल्या 'इथे पहा' च्या जवळपास काही दिसत नाहिये...

हा लेख 'फक्त गृप सभासदांसाठी' मधे दिसतोय.. त्याऐवजी पब्लिक करता येईल का?
कारण 'तंत्रज्ञान' गृप बाहेरील लोकांना देखील (जे संगणकाचा वापर करतात) हा उपयोगी पडू शकेल.

चांगली माहिती. धन्यवाद.
इतक्यातच नॉर्टनचा लॅपटॉप सोवत फुकट मिळालेले डेमो वर्जन एक्स्पायर झाले आणि कुठला घ्यावा या विचारात होतो.. सो अगदी योग्य वेळी मिळाली ही माहीती. Happy

मी McAffee Internet Security Suite वापरतो .. चांगला आहे .. बाकी प्रमाणेच अपडेट्स मोठे असतात आणि resource usage जास्त आहेच. पण पुर्ण सुविधा आहेत.

उत्तम माहिती. भारतात बहुसंख्य लोक, विंडोजचे पण पायरेटेड व्हर्जन वापरतात. अनेक कंपन्यात पण तेच वापरतात, त्याला तर आणखी जास्त धोका आहे.

विंडोजवरच व्हायरस येतो? मग मॅक ओ एस ला येत नाही वाटते?
आणि linux ला?
कुणि वापरतात का मॅक ओ एस? त्यावर विन्डोजच्या वर्ड, एक्सेल वगैरे फाईल्स compatble आहेत का? वापरायला कठीण आहे का? त्यात IE नसेल तर काय वापरतात? ते compatible आहे का?
मुख्यतः एकाच वेळी दोन किंवा अधिक इंटरनेट (याहू, + हॉटमेल + मायबोली + क्रिकेट असे) करता येतात का?

झक्की उबंटू लिनक्स वापरा. एकदम सोपे आहे, फुकट आहे, तुम्ही लिहीले तसे दोन किंवा अधिक इंटरनेट वापरता येते. व्हायरसचा प्रॉब्लेम नाहीये..

चेतन, चांगली महिती: malwarebytes.org वरती कमेंट्स आवडल्या असत्या. सध्या तरी तेच वापरतो. बरेच इफेक्टीव आहे.

झक्की बकिच्या ओ एस वर व्हायरस न येण्याची (कमी येण्याची म्हणणे जास्त सयुक्तीक ठरेल) कारणे:

युझर्स कमी असल्याने व्हायरस निर्माण करणारे महाभाग ईण्टरेस्टेड नसतात कारण त्याचा इम्पॅक्ट लिमिटेड रहातो. व्हायरस लिहिणार्‍यांची मानसिकता "मास डिस्ट्रक्शन" करण्याकडे असते.

इतर ओएस मध्ये सिक्युरिटी मल्टी लेव्हल असते त्यामुळे व्हायरस पसरवणे सोपे नसते. नवीन विण्डोज सिस्टीम मध्ये काही प्रमाणात सिक्युरिटी enforcement आहे पण मुख्यतः त्याचे युझर्स घरगुती वापरणारे व कमी technical awareness असणारे (ही) असल्यामुळे बर्‍याचदा ही सिक्युरिटी डिसेबल्ड / डिफॉल्ट असते जी व्हायरस लिहीणार्‍याला ओळखणे सोपे जाते.

आपल्या सर्वांचा मि आभारी आहे.

अजून एक आपणास सांगू इच्छितो कि
McAfee Super Dat FILE आपण DOWNLOAD करून घेणे .

आणि त्यानंतर पुढील दिलेल्या रिती प्रमाणे करणे .
हि माहिती त्या लोकांसाठी आहे जे INTERNET SEVA वापरत नाही त्यांच्यासाठी आहे
Download Super Dat File :- http://www.mcafee.com/apps/downloads/security_updates/superdat.asp?regio...

Create one folder in C Drive .
This Folder name given to Scan
Super Dat file Copy & paste in Scan Folder.
go to start>run > & type
c:\scan\sdat6050.exe -e
all 17 files extract in scan folder

now
again
Go to Start>Run>type cmd
Command Prompt is open
then type
cd\
& again type
cd Scan
& again type
c:\>scan\scan/all/adl/sub/program/clean/report/report.txt & press enter
नंतर तो तेथील VIRUS शोधून CLEAN आणि DELETE करेन.

मी e-scan Internet Suite माझ्या ग्राहकांना देतो.

कमी resource घेतो, त्यात Anti Fishing, Content Filtering, Anti Spam असे बरेच चांगले पर्याय आहेत. End Point Security हे चांगले feature आहे ज्यात तुम्हाला पेन ड्राईव्ह लावल्याबरोबर स्कॅन होतो. तुम्ही USB Disable देखिल करु शकता. तसेच काही ठराविकच pen drive वापरता येतील किंवा ते Read Only Mode मधेच वापरता येतील अशी उत्क्रुष्ट सोय यात आहे.

मी स्वत: मात्र कुठलेही Antivirus वापरत नाही. पेन ड्राईव्ह मधे Autorun.inf हा फोल्डर बनवुन ठेवल्याने व्हायरस त्यात शिरला तरी तो Autorun होत नाही. (या बद्दल मी माहिती आधी दिली आहे.) तसेच Registry मधुन Autorun disable केलं आहे. त्यामुळे कुठलाही पेन ड्राईव्ह लावला तरी तो Autorun होत नाही.

झक्की, लिनक्स प्रणाली वर आधारलेल्या वरच्याश्या ओएस तुम्ही वापरु शकता... वर सुचवल्या प्रमाणे युबंटु सर्वात छान आहे.

किरण ह्यांच्या पोष्टीला अनुमोदन परंतु काही अजुन कारणे सांगणे मला आवडेल...

१. लिनक्समध्ये वापरल्या जाणार्‍या फाईल सिस्टीम्स ह्या विंडोज मध्ये वापरल्या जाणार्‍या एफ ए टी किंवा एन टी एफ एस पेक्षा जास्त सुरक्षीत आहे.
२. विंडोज हे फाईल टाईप ऑपरेशन्स बेसड आहे तर लिनक्स हे बिटवाईज ओपरेशनवर काम करते
३. लिनक्सचे युजर्स विंडोजच्या तुलनेत कमी वाटत असले तरी सवळपास सगळ्याच मोठ्या नेटवर्क्समध्ये क्रिटीकल सर्वर्स म्हणून लिनक्स वापरले जात.. त्यांच्यावर केलेला "हल्ला" जास्त मोठा व्याप करेल.. परंतु

(हे बर्‍याच लोकांना जरा विचित्रच वाटेल) मुळातच व्हायरस डेव्हलपर्स किंवा हॅकर्स सारख्या लोकांच्या मनात लिनक्स बद्दल ओढ (किंबहुना आदर, प्रेम म्हणले तरी वावगे ठरणार नाही) तर विंडोज बद्दल द्वेष आहे.... विंडोजसाठी जास्त व्हायरस तयार होणे आणी मुळातच विंडोजला टारगेट करण्या मागे हे एक महत्वाचे कारण आहे.....

विन्डोज मध्ये तयार केलेली वर्डमधली डॉक फाईल लिनक्समध्ये उघडली नाही (म्हणए दिसलीच नाही, डिटेक्टच झाली नाही.)पण ती आर एफ टी मध्ये कन्व्हर्ट केल्यावर उघडली. कारण काय?

व्हायरस तर अ‍ॅन्टीव्हायरस कम्पन्याच तयार करून सोडतात ना. ? म्हनजे त्या व्हायरसपासून रक्षण होण्यासाठी यांचे अ‍ॅन्टीव्हायरस वापरा. विन्डोज वापरण्याचे प्रमाण जास्त असल्याने तिथे धन्दा जास्त म्हणून तिकडे अ‍ॅटॅक जास्त. उद्या लिनक्स बहुमतात आले तर तिकडेही व्हायरची व्यवस्था करतील असे पेन्डसे गुरुजी म्हणत होते.

छान माहिती...... मि ईतीहास- हितगुज मध्ये माझे लिखाण "परग्रहवासी आणि मनुष्यजन्म" प्रकाशीत केले परंतु ते दिसत नाही........ कृपया मदत करा.

Backdoor Win32\cybot.B नावाचा एक sever level चा virus आल्याचे दिसत आहे.Symantec Anti-Virus च्या स्कॅनमध्ये remove all म्हणले तरी परत परत मेसेज येत आहे.काय करता येईल?

पूर्वा, नेटवर गुगलुन पाहिले असता हा व्हायरस पुन्हा येत असतो असं दिसतं. तुम्ही Turn Off System Restore करुन पाहिलं कां??

ईथे काही माहिती आहे ती पहा. http://www.bleepingcomputer.com/forums/topic358581.html

>>>> विंडोजवरच व्हायरस येतो? मग मॅक ओ एस ला येत नाही वाटते? आणि linux ला?
>>>> झक्की उबंटू लिनक्स वापरा. एकदम सोपे आहे, फुकट आहे,
बस्के, अगदी अगदी,
एक्स्पी किन्वा काहीही... येवढे स्लो होत जाते की विचारता सोय नाही.
विन्डोजला (अन त्यामागुन व्हायरसना) वैतागुन शेवटी आमच्या लिम्बोटल्याने हे "उबन्टू" लोड केलय, मस्त चालतय. काही ड्रायवर्स लोड करुन घ्यायला लागतात, पण ठीके.
(शिवाय ते "फुक्कट" आहे Proud )

मला कोणी सांगू शकेल का Kaspersky Internet Security 2010 & Norton Internet Security २०१० दोघामाधला चांगला कुठला आणि त्याची किमत किती आहे कोणास माहित असेल तर कृपया सांगा...........

महेशराव, क्विक हील २०११ टोटल सिक्युरिटी या दोन्हिंपेक्षा चांगला आहे.

कॅस्परस्काय आणि नॉर्टन या दोहोंत कॅस्परस्काय चांगला आहे.

कॅस्परस्काय ची किंमत $59.95 इतकी आहे १ पीसी १ वर्षासाठी.

नॉर्टन ची एक वर्षासाठी १ पीसी साठी किंमत आहे Rs1534.99

महेश, दोन्हीही तसे चांगलेच आहेत. पण system resources खूप खातात. तुम्ही mwti.net ईथुन e-scann Internet Security डाऊनलोड करुन Trial version चालवुन बघा. जर चांगलं वाटलं तर ते घ्या असं मी सांगेन. Net Protector 2011 हा देखिल एक चांगला पर्याय आहे.

लिनक्सवर व्हायरस नाहीत. पण शेवटी व्हायरस म्हणजे काय कमांडयुक्त स्क्रिप्ट. जी लिनक्ससाठीही तयार करता येते. फक्त विंडोजवर डबल क्लिक केल्यावर प्रोग्राम रन होतो. लिनक्समध्ये कुठलाही प्रोग्राम रन करण्याअगोदर चेक करता येतो. त्यामुळे सुरक्षितता वाढते.

- (लिनक्सवाला) पिंगू

महेश मालंडकर >> कॅस्परस्काय खुप स्लो करतो कॉम्प्युटर ला.
मायक्रोसॉफ्ट इसेंसियल मिळेल ऑनलाईन ते वापरुन पहा. फुकट आहे.