निसर्ग

ऋतुचक्र

Submitted by अवल on 10 February, 2013 - 23:51

उन्हाच्या झळा, आता तीव्र होऊ लागतात
कोकिळाला आपला सूर, बरोब्बर सापडू लागतो
आसमंतात आंब्याचा गंध, दरवळू लागतो
वाळक्या सुक्या फांद्यात, हिरवा रंग घुमू लागतो
अन रानातल्या झाडांमधून, "वसंत" पिंगा घालू लागतो

आभाळात काळे-निळे ढग, डोकावू लागतात
मधूनच वा-याच्या अंगात, वादळ घुमू लागते
भूमीची तृषा अजूनच, भेगाळत वाढत जाते
कोकिळाची लकेर, आता अधिकच तीव्र होऊ लागते
अन त्या तिथे, नैऋत्येकडून "ग्रीष्मा"ची चाहूल येऊ लागते

आता फुटतो, आवाज "पेर्ते व्हा" ला
शेता शेतात, लगबग वाढीस लागते
झाडांच्या निष्पर्ण टोकांना, उभारी येऊ लागते
अन आकाशातून जीवन, अक्षरशः कोसळू लागते

शब्दखुणा: 

एकला चलो...

Submitted by pulasti on 10 February, 2013 - 01:10

मूळ आकार १६" बाय २०". आक्रेलिक ने स्ट्रेच्ड कॅनव्हासवर.

trek.jpg

भूतान बद्दल माहिती हवी आहे

Submitted by भानुप्रिया on 31 January, 2013 - 04:47

नमस्कार!

जुलै १५ नंतर भूतान ला जाण्याचा विचार आहे, पण टिपिकल ट्रिप करायची नाहीये! हनीमूनसाठी जाणार आहे. आम्हा दोघांनाही टूरिस्ट टॅग असलेल्या जागा सोडून जरा ऑफ-बीट ठिकाणं बघायची आहेत. शांत निसर्ग हवा आहे, फोटोग्राफी करायची आहे, लोकल मार्केट बघायचं आहे आणि तिथली जीवनशैली जवळून अनुभवायची आहे!

कोणाला काही माहिती असेल तर प्लीज सांगा!

धन्स इन अ‍ॅड्व्हान्स!! Happy

निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 January, 2013 - 02:12

निसर्गाच्या गप्पांच्या १२ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,

विषय: 
शब्दखुणा: 

कोकणातला सुर्यास्त!

Submitted by मुग्धमानसी on 22 January, 2013 - 02:20

या सप्ताहांताला कुटुंबासोबत कोकणात फिरायला जाण्याचा योग (अखेर!) आला.

ते निसर्गसौंदर्य आणि भुरळ पाडणारा समुद्रकिनारा आणि अप्रतिम सुर्यास्त पाहताना ते सर्व कॅमेरात टिपण्याचा मोह आवरता आला नाही. आणि जे टिपले ते मायबोलीकरांशी शेअर करण्याचा मोहही आवरता आला नाही....

शब्दखुणा: 

निसर्गाचीये 'कास' धरोनी..

Submitted by वरुण on 30 December, 2012 - 23:52

निसर्गाचीये 'कास' धरोनी..

जणु निसर्गाचीये 'कास' धरोनी
लिवले मथळ्यांवर मथळे भरोनी
प्रसारमाध्यमे राहिली अतिरेक करोनी
पुरे करा आता ही प्रसिद्धी थांबवोनी

'' अहो या शनिवार-रविवार सुट्टीचे काय नियोजन आहे !?'' ''थोडं गुगलून काही नवीन पिकनिक स्पॉट हुडकून ठेवा.''
''अरे विन्या, या विकेंडला सॉलिड धुमाकूळ घालूया., तु, मी, तुष्या, अभ्या आणि आपल्या गेंग बरोबर राडा करू तिकडे...
सगळ्यांनी बाईक काढायच्या की पक्याची XUV काढायला लावायची !? ठीके ठरलं मग.. ओल्या सुक्याच पण बघा रे लेको ..''
'' शोभाताई कधी सुरु होतोय सिझन !? या वेळची भिशी तिकडेच घेवू जवळच्या resort मध्ये,

एक मेघ

Submitted by अमेलिया on 5 October, 2012 - 07:58

ढग मग येतात आभाळाची कावड भरून
हवेत एक हळवा गारवा हलकेच देतात पसरून

आत्ममग्न थेंबांची आवर्तने होत राहतात काही काळ
हिरवेलेसे गढूळ पाणी साचत जाते सभोवताल

मौनात शांत थरथरत झाडं जगून घेतात हिरवेपण
धुरकट हवेत चुकार शीळ ओलावलेले पंख पण

पिवळ्या प्रकाशाची नक्षी आता ढगांच्याही पाठीवर
निथळणाऱ्या क्षितिजाच्याही पल्याड घुमते एक सर

टिपून घेतो काचेवरचा एक थेंब अस्पर्शसा
एक मेघ आत दडलेला बरसाया आतूरसा

रान स्वप्न

Submitted by अमेलिया on 13 September, 2012 - 02:25

इथे कसा मातीला या हिरवा ओला रंग मिळे
निळ्या नभा वाहू नेत निळे जळ झुळझुळे

रानभर पक्षी करे नाच नाचरी धिटाई
घर त्याचे वागवीत तरुवर सळसळे

चंद्रवेडे स्वप्न पडे लाजणाऱ्या लतिकेला
चांदण्याच्या चुंबनाने काया तिची हुळहुळे

कळीवरी रानभऱ्या भ्रमराची गुणगुण
रोमांचून उमलणे कसे काय तिला कळे?

धावणारी पायवाट करीतसे काय गूज
बांधून घे संगतीस मखमाली तृण-मळे

आसमंती चहूकडे रंग कसे वर्णू जावे
दिठीतले स्वप्न त्याचे माझ्या मनी येऊ मिळे!

शब्दखुणा: 

नभ!

Submitted by अमेलिया on 26 August, 2012 - 01:26

नभ मेघांचे भांडार
नभ अव्यक्ताच्या पार
नभ जळात ओले बिंब
नभ तुझे नि माझे रंग...

नभ ना भिजले काळोखी
नभ तेही जे ना देखी
नभ दिशांत ना मिटलेले
नभ तुझे नि माझे डोळे…

नभ तेजाचा कल्लोळ
नभ अरुपाचेही भाळ
नभ आविष्कृत निर्गुण
नभ तुझा नि माझा कण…

नभ अथांग ना थकलेले
नभ नेत्री-गात्री मितुले
नभ आरंभी अन अंती
नभ तुझी नि माझी प्रीती!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - निसर्ग