'चांदोबा'तील हार, गजरे आणि माटुंगा मार्केट

Submitted by मामी on 14 November, 2014 - 22:49

'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्‍याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.

तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.

नविन नविन शक्कल लढवून फुलांच्या अत्यंत सुरेख रचना करून किती सुंदर सुंदर हार बनवले आहेत पहा :

(सर्व प्रचि त्या त्या दुकानदारांची परवानगी घेऊनच घेतली आहेत.)

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

माणसापेक्षाही उंच हार :

प्रचि ७

ताडाच्या पात्यांपासून बनवलेले हे झुंबर :

प्रचि ८

हार, गुच्छं, झुंबरं आणि खाली पात्यांचीच बनवलेली चटई :

प्रचि ९

अजून झुंबरं. सुकलेल्या पात्यांपासूनही बनवली आहेत :

प्रचि १०

जरा जवळून बघुयात. हार कसे गुंफले आहेत ते बघा. गुलाबाच्या पाकळ्यांत मोगर्‍याची फुलं, फुलांच्या रंगांचा, गुलाबाच्या पाकळ्यांच्या शेडिंगचा खुबीनं वापर करून किती मस्त रंगसंगती साधली आहे. तीच फुलं घेऊन प्रत्येक हाराला वेगळं रुप दिलंय. कमाल आहे की नाही!

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

भरतनाट्यमच्या वेळी डोक्यात घालतात ती वेणी :

प्रचि १५

पात्यांपासून बनवलेले हार :

प्रचि १६

ही एक वेगळीच रचना - ताडाच्या पात्यांचीच आहे.

प्रचि १७

हे हातावर मोजून विकण्याचे गजरे. यातही किती छान रंगसंगती आहे.

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

माटुंगा मार्केटमधली दाक्षिणात्य भाजीचा स्टॉल :

प्रचि २३

प्रचि २४

टॅपिओका आणि केळीचे गाभे :

प्रचि २५

ही मुळं कसली ते माहित नाही. नाव सांगितलं त्या माणसानं पण कळलं नाही.

प्रचि २६

बाळ कांदे :

प्रचि २७

खाऊचा स्टॉल :

प्रचि २८

गोड अप्पम :

प्रचि २९

हलवा, पापड (अप्पलम) आणि वेफर्स :

प्रचि ३०

लाल उकडे तांदूळ :

प्रचि ३१

केरळी परकर पोलकं

प्रचि ३२

लेटेस्ट फेरीतून अजून काही

ताडपातींपासून बनवलेली अजून दोन डेकोरेशन्स

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोळे, मन अगदी भरून पाहिलं. बरीक सुवास पण पाठवून दे .
ते गुलाबाच्या पाकळीत लपवलेले मोग-याचे हार फार सुंदर दिसतात नै.
धन्यवाद ग मस्त सुरुवात झाली दिवसाची Happy

हार सुपर्ब आहेत!! ते पांढरे,हिरवे, लाल हार सगळ्यात सुंदर वाटले.

खाऊच्या फोटोसाठी Angry भूक लागली.. Happy

मस्त फोटो, मामी Happy

माझीही एक फेरी होत असते इथे. Happy
दादरच्या फुलबाजारापेक्षा इथे हार-गजर्‍याच्या व्हरायटी जास्त असतात. Happy

खूप मस्त आणि अगदी चांदोबा मधून बाहेर पडलेले .....

देवाचे वेगवेगळ्या प्रकारच्या हारांनी केलेले असे लाड गोव्यात देखिल बघायला मिळतात.

अप्रतिम ! रंगांची उधळण, रंगसंगति व कल्पकतेने आणलेली विविधता !! अर्थात, असलं सौंदर्य टीपायचं भान हवं, हें आहेच.

<< 'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. >> १००% सहमत. माझ्या या वयातही मनावर त्याची भुरळ कायम आहे !

धन्यवाद, हें टीपून इथं पोस्ट केल्याबद्दल.

मस्त फोटो फीचर.

माटुंग्यात आलं की नेहमी, सेलम किंवा त्रिचीला आल्यासारखं होमली वाटतं. बॅग घेउन मार्केटमध्ये जावं आणि क्या तुम्हारा सी फॉर्म अभितक नहीं आया. वो पेमेंट कब भेजोगे . अब कांचका बॉटल है फूटेगा ना तुम्हारा ट्रान्स्पोर्टर चेक करो. ये देखो कुछ नया. असे डीलर मार्केट चे खास संवाद टाकावेत अशी उर्मी मनात जागते.
हवेतच सांबार मसाल्याचा वास असेल असं उगीचच वाटतं. वरचे हार आणि डेकोरेशन्स लग्न समारंभात वापरले जातात. ती वेणी नववधूची खास आहे. अश्या कित्येक लग्नांना जाउन आम्ही आहेर देउन मग केळीच्या पानावर सांबार भात ओरपले आहे. लई मज्जा. खरेच मिनी साउथ इंडिया आहे. मल्लीगे गजरे पण किलोच्या हिशेबाने घेउन घालतात बहुतेक दाक्षिणात्य वहिनी.

माटुंग्यात डीपी स्नॅक्सच्या बाजूला एक बारके दुकान आहे. मराठी बाई चालवतात. तिथे कोथिंबीर वडी वगिअरे मिळते.

लेखाच्या शीर्षकात "चांदोबा" नाम पाहाताच माऊसने लागलीच त्यावर क्लिक केले आणि दोनेक मिनिटात दाक्षिणात्य सौंदर्याचा समुद्रच समोर उलगडत गेला. हारांची रचना, मांडणी, ताजेपणा, फुलांची निवड, आगळेपण या सार्‍यांची आपली नजर खिळवून घेणारी शक्ती पाहताक्षणीच जाणवते....नयन, मन, हृदय अगदी प्रसन्न होऊन गेले. केवळ चित्रावरूनच त्यांचा सुवास जाणवत गेला आणि वाटू लागले की इतकी फोटो घेत राहिलेली व्यक्ती अगदी वेडीच होऊन गेली असेल. सुंदर.

चांदोबाच्या उल्लेखावरून हार पाहता पाहता मला आठवल्या तिकडील अभिनेत्रींचे...विशेषतः ५०-६० च्या दशकातील... कृष्णधवल छायाचित्र.... पद्मिनी, रागिणी, वैजयंतीमाला, सावित्री, जमुना, सरोजादेवी....या सार्‍यांच्या सौंदर्याना उठाव दिला होता तो अशाच हारानी, फुलांच्या माळांनी....जवळपास प्रत्येक फोटोमध्ये या अप्सरा अशाच चांदोबाचित्राप्रमाणे दिसत असत त्या ह्या हारांच्या जादूमुळेच.

आपले आभार मामी.

मामी तुझ्या नजरेला दाद दिली पाहिजे. मस्त शोधले आहेस. बाजारातून आणि बरोबरीने जुन्या दिवसांतून कसली मस्त चक्कर मारून आणलीस.

माटुंग्याला हे इतकं सगळं मिळतं किंवा एवढं मोठं मार्केट आहे हे माहीतच नव्हतं.... मला फक्त नल्लीज दुकानाबद्दल ऐकीव माहिती होती.. ती सुद्धा मैत्रिणींकडून मिळालेली...
मामी थँक्स ही ओळख करून दिल्याबद्दल! फोटो फार सुंदर आलेत...

मस्त मस्त. माझे फार लाडके प्रकरण म्हणजे चांदोबा आणि हे दाक्षिणात्य पध्दतीचे हार, गजरे म्हणूनच आवडत असावेत. माटुंग्याच्या फुलबाजारातून फेरफटका मारायचा म्हणजे नेत्रसुख व घ्राणेंद्रियांची तृप्ती. किती सुख हार, गजरे सुबकपणे मांडलेले असतात तिथे! दाक्षिणात्य खाऊही खासम् खास!

पुण्यात असे हार, गजरे, खाऊ रास्ता पेठेतल्या अय्यप्पा मंदिराजवळ मिळतात आणि सारसबागेजवळच्या मठांपाशी असलेल्या दुकानांतही असे हार पाहिलेत. पण मुंबईतील हार, गजरे गुंफणारे लोक ज्या कल्पकतेने त्यांत फुले, पाकळ्या, पाने वगैरेंच्या रंगसंगतीचा सुरेख वापर करतात त्याला तोड नाही!

हे हे मामी दिल खुष हो गया.

मस्त. मी पण काही गजर्‍या वेण्यांच्या फोटोचे कलेक्शन केले आहे. पुर्ण झाले की टाकेन.

मामी कधी पुन्हा मार्केटमध्ये गेलीस की त्या विक्रेत्यांना विचारशील का की ते झुंबर व माळी नारळाच्या पत्यांचे आहेत की ताडाचे? ते ताडाच्या पात्यांचे असावेत. कारण माझ्या लहानपणी मी ताडाच्या पात्यांपासून तयार केलेल्या वेण्या, हार पाहीले आहेत. नारळ्याच्या पात्या एवढ्या पांढर्‍या नसतात. ताडाच्या कोवळ्या झावळीच्या फांद्या अशा पांढर्‍या असतात आणि कलाकृती करण्यासाठी कडकही असतात.

सुंदर, कलात्मक व ताजे हार, गजरे, भाजी पाहून मन प्रसन्न जाहले!>>++११

नारळ्याच्या पात्या एवढ्या पांढर्‍या नसतात.>> हो जागु

मस्त मस्त वाटल....

छान, कॉलेजच्या दिवसात इथूनच जाणेयेणे व्हायचे, त्या आठवणी चाळवल्या. अगदी तेव्हापासून हे सगळे असेच आहे. तामिळनाडूमधल्या नेत्यांचे जे भलेमोठे हार घातलेले फोटो असत, तसले हारही तिथे मिळतात.
(ते बांबू नाहीत केळीचे गाभे आहेत.)

तिथे गुजराथी वस्ती पण आहेच. आणि त्यांचे काही खास तिथे मिळते ( ओल्या लाल मिरच्या, ओले मिरीदाणे )
वरदाच्या गणपतीच्या वेळी तर ते वातावरण आणखीनच खुलायचे. अजूनही तो गणपती असतो पण तिथेच पोलिस चौकी झाल्याने त्याचा पसारा आटपता असतो. स्टेशनमधला गणपती पण आमचा फेव्हरीट. रेल्वेतून उतरल्यावर सर्व पब्लिक आधी तिथे जायचे.

तिथेच कोपर्‍यावर एक पूजा साहित्य विकणारे दुकान आहे. एरवी सहज कुठे न मिळणारे साहित्य ( रुद्राक्ष वगैरे ) तिथे मिळते.

उल्लेख अस्थानी आहे पण मृतदेहासाठी काही हार हवे असल्यास ते विक्रेते अगदी पटकन ताजा हार बनवून देतात, इतकेच नव्हे तर असलेले हारही स्वस्त देतात. हा अनुभव मी स्वतः दोनवेळा घेतला आहे.

एकेकाळी खादाडी साठी आणि रुईया पोद्दारची हिरवळ बघायला भटकंती व्हायची या परिसरात. पण तेव्हाच्या गरजे आणि आवडीनुसार गजबजलेला मार्केट विभाग नकोसाच वाटायचा. त्यामुळे तिथले हारांफुलांचे एवढे प्रकार नवीनच. Happy

मस्त सफर मामी.
अमा, मल्लिगेचे गजरे किलोने Lol
हवेतल्या सांबाराच्या सुवासाबद्दल सहमत Happy त्या नववधूच्या वेणीवर एक लेख पाडाच.

नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेले हे झुंबर :>>> हे ताडाच्या झाडापासून बनवतात. आमच्याकडॅ प्रत्येक सणाला दारोदार विकाय्ला येतात. दरवाज्याला तोरणासारखं दोन्ही बाजूंनी हे लावायची पद्धत आहे. एक्झॅक्ट नाव विचारून सांगते.

धन्यवाद मंडळी! Happy

>>>> मी पण काही गजर्‍या वेण्यांच्या फोटोचे कलेक्शन केले आहे. पुर्ण झाले की टाकेन. >>> नक्की टाक जागू.

जागू अन नंदिनी सारख्या एक्स्पर्ट सांगताहेत म्हणजे बरोबरच असणार. ती झुंबरं ताडाच्या पात्यांची असणार. धन्यवाद. लेखात बदल करते.

>>>>> Pic : 25 - banana stem with tapioca / (ते बांबू नाहीत केळीचे गाभे आहेत.) >>>> धन्यवाद राजसी आणि दिनेशदा. लेखात करेक्शन करते. हे जेवणात वापरतात का?

>>> Pic : 26 - I think it's Arabi >>>> नाही ती अरबी नाहीये. अरबी वेगळी असते. ही मुळं आणखी लहान होती.

मार्केटवरून महेश्वरी उद्यानाच्या दिशेने निघाल्यास वळणार रामाश्रय हॉटेलच्या शेजारी कॉफीचं दुकान आहे. त्यात बिया दळत असतात. तो वास आसमंतात दरवळत असतो.

मामी. मेरेको एक्स्पर्ट क्या बुलाते Happy

हे जेवणात वापरतात का?:>>> हो. त्याचे बरेच प्रकार बनवतात, माझा फेवरेट म्हनजे शेजारीण मूग घालून एक सुकी भाजीबनवते तो. चव वेगळीच आणि मस्त असते.

याची भाजी करायची म्हणजे एक दिव्य काम असतं, इतकं याला स्वच्छ करावं लागतं तस्मात तमिळ शेजार असलेला बरा.

सर्वच फोटो मस्त आहेत. इकडे नॉर्थ चेन्नईमध्ये एक फ्लॉवर मार्केट आहे तिथे असले हार वगैरे असतात. पण फोटो काढणं शक्य नसतं इतकी गर्दी आसते. तिथे खरंच बाया किलोकिलोनं फुलं घेताना सहज दिसतात. आमची गजरा पण त्यातलीच एक.

मामी, लगे हाथ कॉर्नरच्या फेमस 'गिरी'चाही फोटो टाकायचा. दुकानाच्या आतून घ्यायला दिला असता की नाही माहित नाही म्हणा!

माझ्या माटुंग्याच्या घरी जाताना ह्याच रस्त्यावरुन जावे लागते. भाजी मार्केटमध्येच नल्ली शिवाय एक अजून टिपिकल मद्रासी साड्यांचं दुकान आहे तू ते भाज्यांचे फोटो टाकले आहेस त्याच फुटपाथला. तसेच आतमध्ये मार्केट आहे तिथेही चित्रविचित्र भाज्या दिसतात.

फुलमार्केटावरुन नल्लीच्या रस्त्याला दाक्षिणात्य मंदिरं पण आहेत टिपिकल कळस असलेली. महेश्वरी उद्यानाच्या दिशेनेही आहेत. अगदी तामिळनाडूमध्ये आल्यासारखं वाटतं.

नल्ली समोरच्या टपरीवर अगदी चविष्ट दाक्षिणात्य स्नॅक्स मिळतात. पार्सल, रस्त्यावर उभं राहून, गाडीत बसून कसंही खातात लोक्स. मी मोस्टली पार्सल घेऊन जाते.

येस अश्विनी.

ते साड्यांचं दुकान म्हणजे सोलंकी ब्रदर्स. Happy

नल्लीज समोरच्या मणीज लंच होममध्ये अप्रतिम थाली मिळते. केवळ रु. ६०/- ला. तो स्टॉलवाला आमचाही आवडता.

काय सुंदर सफर. मला नाव वाचून वाटल कि लेख असावा.पण काय सुंदर फोटो बघायला मिळाले. लहानपणी वाटायचं कि असेच गजरे घालावेत. पण जावूदे

Pages