निसर्ग

रविंद्रनाथांच्या कविता - ४ - जादुगार !

Submitted by vaiddya on 3 September, 2010 - 14:24

नाही हरवत कोणीही
आपल्या स्वतःच्याच सावलीत ..
नाही जात हृदयच
स्वतःनेच उसळवलेल्या रक्तामधे वाहून ..

जीवनाला नसते प्रतीक्षा
दुसर्‍या कोणत्याही
जादुगाराची ..
कारण जीवनच आहे एक जादूचा पेटारा !

जीवनाची जादूची कांडी
फिरतच असते ..

काळजात जमा होत जाणारं
भुरकट राखाडी रसायन
हिरवंशार बनवून
पांचूसारखं चमकत ठेवणारी ही जादू
निसर्ग चैत्राला जसा चेतवतो
तशीच नित्य चेतवावी लागते !

मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मी केलेला हा मराठी मुक्त अनुवाद चैत्र नाटकासाठी.

गुलमोहर: 

नाणेघाट - नानाचा अंगठा ... !

Submitted by सेनापती... on 17 August, 2010 - 04:26

सह्याद्रीमधल्या अगणित अश्या नितांत नयनरम्य स्थळांपैकी एक आहे कोकण आणि घाट यांना जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट. आजपर्यंत अनेकदा जाऊन देखील इकडे जायची उर्मी कमी होत नाही. मात्र गेली २-३ वर्षे इकडे येणे न झाल्याने ह्यावर्षी मान्सून मधला पहिला ट्रेक नाणेघाट हाच करायचा हे मी आधीच ठरवले होते. शनिवारी पहाटे-पहाटे माझ्या 'छोट्या भीम' (गल्लत करू नका... छोटा भीम हे आमच्या गाडीचे नाव आहे..) सोबत आम्ही ५ जण मुरबाडमार्गे नाणेघाटाच्या दिशेने निघालो. पहिला थांबा अर्थात मुरबाड मधले रामदेव हॉटेल होते. तिकडे भरगच्च नाश्ता झाला आणि आम्ही पुढे निघालो.

एका कोळीयाने

Submitted by हिम्सकूल on 16 August, 2010 - 06:26

आपल्या सगळ्यांकडे छोट्या आकाराचे कोळी कधी ना कधी दिसतातच... जंगलात तर मोठ्ठे कोळी दिसतात.. कोळ्याचे जाळे हे सगळ्यांसाठीच एक कुतूहल आहे...

अशाच एका कोळ्याने विणलेले हे जाळे.. आमच्या घराच्या गॅलरीत काही गोष्टींचा आधार घेऊन त्याने हे जाळे बनविले होते....

रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात काढले हे काही फोटो...

DSC06177_1.JPGDSC06183_1.JPGDSC06176_1.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"पर्यावरण" संर्दभात झकास पंच लाईन पाहिजे आहे...

Submitted by श्रीवर्धन on 16 July, 2010 - 02:16

नमस्कार,

सध्या कंपनी मध्ये Go Green Go Green चे वातावरण आहे. त्यासाठी कंपनीत एक गट तयार केला आहे. आणि आता सर्वांना t-Shirt वर "पर्यावरण" संर्दभात झकास पंच लाईन पाहिजे आहे. यासाठी आपली मदत आवश्यक आहे.
- वाक्य शक्यतो मराठीतच पाहिजे आहे.
मला आतापर्यंत मिळालेली वाक्ये:
१) हिरवा साज, हिरवा बाज
भूमाईची राखू लाज

२) झाडे लावा झाडे जगवा...
३) कमीत कमी पोल्युशन
हेच उत्तम सोल्युशन
४) झाडे लावा आणि झाडे जगवा
पुढच्या पिढीला द्या स्वच्छ हवा
५) निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका

विषय: 

Pages

Subscribe to RSS - निसर्ग