इथे कसा मातीला या हिरवा ओला रंग मिळे
निळ्या नभा वाहू नेत निळे जळ झुळझुळे
रानभर पक्षी करे नाच नाचरी धिटाई
घर त्याचे वागवीत तरुवर सळसळे
चंद्रवेडे स्वप्न पडे लाजणाऱ्या लतिकेला
चांदण्याच्या चुंबनाने काया तिची हुळहुळे
कळीवरी रानभऱ्या भ्रमराची गुणगुण
रोमांचून उमलणे कसे काय तिला कळे?
धावणारी पायवाट करीतसे काय गूज
बांधून घे संगतीस मखमाली तृण-मळे
आसमंती चहूकडे रंग कसे वर्णू जावे
दिठीतले स्वप्न त्याचे माझ्या मनी येऊ मिळे!
नभ मेघांचे भांडार
नभ अव्यक्ताच्या पार
नभ जळात ओले बिंब
नभ तुझे नि माझे रंग...
नभ ना भिजले काळोखी
नभ तेही जे ना देखी
नभ दिशांत ना मिटलेले
नभ तुझे नि माझे डोळे…
नभ तेजाचा कल्लोळ
नभ अरुपाचेही भाळ
नभ आविष्कृत निर्गुण
नभ तुझा नि माझा कण…
नभ अथांग ना थकलेले
नभ नेत्री-गात्री मितुले
नभ आरंभी अन अंती
नभ तुझी नि माझी प्रीती!
तुझ्या रंगांचं एक बरंय
ते झेलणारी फुले आहेत त्यांच्याकडे
स्वतःचं अस्तित्व विसरून
रंगच होऊन जाणारी..
आणि मग भिजली दवांत
की लाजणारी, जपणारी तुझ्या रंगांना
हळुवार पाकळ्यांत
डोलणारी, झुलणारी तुझ्या कवेत
मलाही होता आलं असतं
तुझ्या रंगांत न्हालेलं एक फूल
तर किती छान!
मग भेटले असते मी तुलाच
तुझ्यातून
अन हसला असतास तू
माझ्याच आतून
खरंच तुझ्या रंगांचं हे फार बरंय
अस्पर्श कळीलाही माझ्यामधल्या
भास देतात ते फुलाचा!
दिनांक : 8 ऑगस्ट 201२

कै. एस. आर. उर्फ आप्पासाहेब भागवत जयंतिनिमित्त
निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)
मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||
Owl Butterfly (Caligo memnon)

पडू द्या सरिवर सरी
(चालीसाठी शिर्षकावर क्लिक करा.)
वीज कन्यका तळपत पाहुनी,
मेघ गर्जना करी ।
पडू द्या सरिवर सरी हो सरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥धृ॥
आकाशाशी नाते जोडी धरतीशी हो सरी,
पर्जन्याच्या सरी ।
पर्जन्याचे तांडव मांडी कृष्णमेघ अंबरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥१॥
घेऊनी तांडा मेघांचा हो आला शिरावरी,
भरुनी पाण्याच्या घागरी
सह्याद्रीचा कृष्ण अडवितो, धो धो पडती सरी,
पडू द्या सरिवर सरी हो सरी ॥२॥

"The butterfly effect" ...