होतोय विकास

Submitted by धनि on 28 October, 2022 - 20:57

पक्षी पळाले
चिवचिव संपले
कुठे हो गेले
होतोय विकास

रस्ते वाढले
मोठे जाहले
पुरात गेले
होतोय विकास

झाडे तोडली
घरे वाढली
ऊन काहिली
होतोय विकास

निसर्ग रडला
समतोल बिघडला
हाहाकार माजला
पण ... होतोय ना विकास

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्!

निसर्गासाठी रडू नका. रडायचे असेल तर मनुष्याच्या भवितव्यासाठी रडा. Nature is supreme and humans are pests on this planet. योग्य वेळ आली की निसर्ग त्याची ताकद दाखवेल किंवा स्वतःला बदलेल. तेव्हा कदाचित मनुष्याला या निसर्गात जागा नसेल.