सवंगडी

Submitted by ---पुलकित--- on 25 March, 2023 - 06:19

अविरत सरिता गुणगुणती
श्रोतसे रसिक ते नभ वरती
चंचल जलदही स्वैर विहरती
अचलाभवती सलगी करती

विश्रांत चराचर, शीत प्रकृती
शास्त्र, कला, क्रीडा करिती
सृष्टीचे हे कुशल सारथी
गणिताची भाषा वदती

हिमकण घेवूनी आले वारे
खगही म्हणती सुट्टी घ्या रे
सवंगडी परी चिंतित सारे
कुठे राहिला मित्र बरे?

Group content visibility: 
Use group defaults

छान !
मायबोलीवर स्वागत.
पुलेशु !

अरे वा!!! खूपच सुंदर. गडकरी आठवले. जरी बालकवि निसर्गकवि आहेत तरी मला गडकरी आठवले.
मित्र शब्दाने तर मजा आली. ते लक्षात आलेले नव्हते. श्लेष आहे तो.

स्वागत आहे. खूप लिहा, वाचा. इथे आवडेल.

छानच